लिव्हरसाठी दारूचं नाहीतर 'हे' पदार्थ सुद्धा ठरतात अतिशय भयानक
शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे लिव्हर. लिव्हर शरीर डिटॉक्स करण्याचे काम करते. याशिवाय शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्याचे, पचनक्रिया सुधारण्याचे काम लिव्हर करते. पण लिव्हरच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. दैनंदिन आहारात सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला ताण, शरीरात होणारे छोटे मोठे बदल, बिघडलेली पचनक्रिया इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. लिव्हरसबंधित आजार केवळ दारू किंवा मद्यपान केल्यामुळेच नाहीतर रोजच्या आहारात शरीरास हानिकारक असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे सुद्धा होतो.(फोटो सौजन्य – iStock)
फॅटी लिव्हरची समस्या प्रामुख्याने दैनंदिन आहारात सतत हानिकारक पेयांचे सेवन केल्यामुळे उद्भवण्याची शक्यता असते. फॅटी लिव्हरची समस्या उद्भवू लागल्यानंतर लिव्हरमध्ये चरबी तयार होण्यास सुरुवात होते. शरीरात जमा झालेल्या अनावश्यक चरबीमुळे लिव्हरवर ताण येण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला लिव्हरच्या आरोग्यासाठी कोणती पेय घातक ठरतात, याबद्दल सविस्तर माहितीने सांगणार आहोत. या पदार्थाचे सेवन न केल्यामुळे लिव्हरचे कार्य निरोगी राहील.
जेवल्यानंतर किंवा घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बऱ्याचदा सॉफ्ट ड्रिंक विकत आणले जाते. कोल्ड ड्रिंक्स, फिझी पेये किंवा गॅसवाले ड्रिंक्स, पेप्सी इत्यादी पेय चवीला गोड लागत असली तरीसुद्धा आरोग्यासाठी अतिशय घातक आहेत. या पेयांचे नियमित सेवन करू नये. या पेयांमध्ये भरपूर प्रमाणात साखर असते. त्यामुळे हीच साखर लिव्हरमध्ये जमा होऊ लागते. ज्यामुळे ‘नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर’ आजार होऊ शकतो. फॅटी लिव्हरची समस्या उद्भवू लागल्यानंतर लिव्हरच्या कार्यावर अतिरिक्त तणाव येतो. मात्र रोज रोज सॉफ्ट ड्रिंक पिणाऱ्यांना लिव्हर सिरॉसिससारखे गंभीर आजार होऊ शकतात.
शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात अनेक लोक एनर्जी ड्रिंकचे सेवन करतात. पण या एनर्जी ड्रिंक्समध्ये मोठ्या प्रमाणावर कॅफीन, आर्टिफिशियल फ्लेवर्स आणि शुगर इत्यादी अनेक घटक आढळून येतात. पण सतत एनर्जी ड्रिंकचे सेवन केल्यामुळे लिव्हरवर ताण येऊ लागतो. याशिवाय नियमित एनर्जी ड्रिंक प्यायल्यामुळे लिव्हर एन्झाइम्स होण्याची शक्यता असते.
किडनीला सूज आल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, वेळीच व्हा सावध होऊन घ्या काळजी
आपल्यातील अनेकांना सकाळी उठल्यानंतर नाश्त्यात नेहमीच फळांचा रस पिण्याची सवय असते. ताज्या फळांचा रस आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे . पण बाजारात उपलब्ध असणारे पॅकिंग रस शरीरासाठी अतिशय घातक ठरतात. यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. या फळांच्या रसामध्ये अतिरिक्त साखर असते, ज्याचा परिणाम लिव्हरच्या कार्यावर लगेच दिसून येतो. यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स, फॅटी लिव्हर आणि यकृत विकार वाढू लागतात.