
उतार वयात ज्येष्ठांच्या आरोग्यासाठी आवश्यक ठरतात 'ही' जीवनसत्वे
आपण आयुष्य जगताना कसलीच चिंता नसावी, शरीराने साथ द्यावी आणि आपण आपल्या कुटुंबियांसमवेत आणि मित्रांसोबत आनंदाने दीर्घायुष्य जगावं असं वाटतं. पण जसजसं वय वाढतं तसतसं शरीर थकत जातं. पण काळजी करु नका, अशा वाढत्या वयातही आपली तब्येत ठणठणीत राहील ह्यासाठी ह्या काही गोष्टी लक्षात घ्या. वाढत्या वयासाठी काही विशेष जीवनसत्तव अधिक आवश्यक असतात. पण बऱ्याचदा शरीरातील विटामिनची पातळी कमी झाल्यानंतर संपूर्ण आरोग्याला हानी पोहचते. त्यामुळे कामासोबतच शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल झाल्यांनतर संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे रोजच्या आहारात कायमच सहज पचन होणाऱ्या आणि विटामिनने समृद्ध असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. आज आपण काही व्हिटामिनविषयी जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)
विटामिन डी स्नायू मज्जातंतू आणि रोगप्रतिकारक यंत्रणा योग्यरित्या काम करायला मदत करते. विटामिन डीचा सर्वोत्तम स्त्रोत सूर्यप्रकाश आहे, परंतु वाढत्या वयानंतर सूर्याची किरणे शरीरात व्हिटॅमिन डी तयार करायला सक्षम नसतात.
विटामिन बी १२ रक्त आणि मज्जातंतू पेशी बनवण्यास मदत करते. हे विटामिन मांस, मासे, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये आढळते. हे विटामिन बी १२ टॅब्लेट आणि फोर्टिफाइड पदार्थांद्वारे देखील घेतले जाऊ शकते. ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ३० टक्के लोकांना अॅट्रोफिक गॅस्टूरिटिस असतो ज्यामुळे शरीराला अन्नाद्वारे विटामिन बी १२ योग्यरित्या मिळत नाही.
प्रोबायोटिक्स आतड्यांसाठी सर्वोत्तम मानले जातात. प्रोबायोटिक्स आंबवलेले अन्न, दही आणि कोबी सारख्या पूरकांपासून घेतले जाऊ शकते. ते अतिसारापासून आणि एलर्जीपासून शरीराचे रक्षण करते. जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असेल किंवा तुम्हाला कोणतीही वैद्यकीय समस्या असेल तर प्रोबायोटिक्स टॅबलेट घेण्यापूर्वी डॉक्टरांशी नक्की संपर्क साधा.
वाढत्या वयाबरोबर कॅल्शियम खूप महत्वाचं आहे. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होतात, ज्यामुळे ऑस्टियोपोरोसिस होऊ शकतो. खियांमध्ये रजोनिवृत्तीनंतर ही समस्या जास्त वाढते.
हे विटामिन शरीराला जंतूंशी लढायला आणि ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करते. वयोमानानुसार, विटामिन बी ६ शरीरासाठी खूप महत्वाचे बनतं. काही अभ्यासामध्ये असे आढळून आलं आहे की विटामिन बी ६ वृद्ध लोकांमध्ये स्मरणशक्ती योग्य ठेवते. ह्या विटामिनचा उत्तम सोत म्हणजे चणे.
ओमेगा ३ फॅटी अॅसिड शरीरासाठी खूप महत्वाचे मानले जातात कारण ते आपले शरीर ते नैसर्गिकरित्या बनवू शकत नाही. डोळे, मेंदू आणि शुक्राणू पेशींसाठी ओमेगा -3 आवश्यक आहेत, अल्झायमर आणि आर्थराईटिस सारख्या वयोमानानुसार होणाऱ्या रोगांपासून संरक्षण करण्यास देखील हे मदत करते.
सेलेनियम पेशींना संसर्गापासून वाचवते. यामुळे थायरॉईड व्यवस्थित काम करत राहतो. सेलेनियम स्नायूंना मजबूत बनवते. या व्यतिरिक्त, हे डिमेशिया, थायरॉईड आणि कर्करोगासारख्या वयाशी संबंधित आजारांपासून संरक्षण करते.
Ans: शरीराला योग्यरित्या कार्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या जीवनसत्त्वांची (Vitamins) कमतरता म्हणजे व्हिटॅमिनची कमतरता होय, ज्यामुळे विविध आरोग्य समस्या निर्माण होतात.
Ans: थकवा आणि अशक्तपणा, श्वास लागणे, रातांधळेपणा
Ans: व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी12, व्हिटॅमिन सी