पोटावर वाढलेली चरबी मेणासारखी जाईल वितळून! पोट स्वच्छ होण्यासाठी नियमित खा 'हा' २० रुपयांचा पदार्थ
वजन कमी करण्यासाठी उपाय?
मुळा खाण्याचे फायदे?
पचनक्रिया सुधारण्यासाठी काय करावे?
वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. पोटावर वाढलेला चरबीचा अनावश्यक घर संपूर्ण शरीरासाठी घातक ठरतो. शरीरातील सेरोटोनिन आणि मेलाटोनिन हार्मोन्सची पातळी वाढल्यानंतर खूप जास्त खाण्याची इच्छा होते आणि झोप आल्यासारखे वाटते. वारंवार खाण्याची इच्छा झाल्यानंतर तिखट आणि तेलकट अशा कोणत्याही पदार्थांचे सेवन केले जाते. या ऋतूंमध्ये कॅलरीज युक्त पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढते, पण खाल्लेल्या कॅलरीज बॅन केल्या जात नाही. यामुळे चरबीचा थर शरीरात साठू लागतो. शरीरात साचून राहिलेल्या चरबीमुळे आणि आतड्यांमध्ये जमा झालेली घाणीमुळे पोट खूप जास्त बाहेर आल्यासारखे वाटते. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात, पण तरीसुद्धा वजन कमी कमी होत नाही. त्यामुळे वाढलेले वजन कमी करण्यासाठी मुळ्याचे सेवन करावे. मुळा शरीरासाठी अत्यंत प्रभावी आहे.(फोटो सौजन्य – istock)
मुळ्यामध्ये ९३ ते ९५ टक्के पाणी आणि इतर कार्बोहायड्रेट्स कमी असतात. मुळ्यामध्ये असलेल्या फायबरमुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते. तसेच यामध्ये असलेल्या बायो-अॅक्टिव्ह संयुगांमुळे शरीरातील चयापचय क्रिया सुधारते आणि पोटावर साचलेला चरबीचा थर कमी होण्यास मदत होते. पोटावर जमा झालेली चरबी कमी करण्यासाठी महागड्या सप्लिमेंट्सचे सेवन करण्याऐवजी घरगुती पदार्थांचे सेवन करून आराम मिळवावा.
मुळ्यामध्ये असलेले अघुलनशील फायबर आतड्यांची हालचाल सुधारण्यास मदत करतात. याशिवाय बद्धकोष्ठता, गॅस, अपचन आणि ऍसिडिटी इत्यादी सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी मुळ्याचे सेवन करावे. मुळा खाल्ल्यामुळे आतड्यांमध्ये जमा झालेले विषारी घटक सहज बाहेर पडून जातात. पोटात आलेली सूज कमी करण्यासाठी आणि पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी मुळ्याचे सेवन करावे.
शरीराला गंभीर आजारांची लागण होऊ नये म्हणून शरीर डिटॉक्स करणे अतिशय महत्वाचे आहे. यासाठी आहारात मुळा खावा. सॅलड किंवा मुळ्याच्या भाजीचे सेवन केल्यास संपूर्ण शरीरात जमा झालेली घाण बाहेर पडून जाईल आणि शरीर स्वच्छ होईल. शरीरातील अतिरिक्त पाणी आणि घाण बाहेर पडून काढून टाकण्यासाठी मुळा उत्तम आहे. यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म यकृताचे आरोग्य सुधारतात.
कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाबासारख्या गंभीर समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी मुळा खावा. चवीला तिखट असलेले मुळा खाण्यास अनेक लोक नकार देतात. पण मुळ्याचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये असलेले पोटॅशियम आणि अँटी-ऑक्सिडंट्स रक्तदाब नियंत्रणात ठेवून हृदयाचे आरोग्य कायमच चांगले ठेवतात.
Ans: फळे, भाज्या, प्रथिने आणि संपूर्ण धान्यांचा आहारात समावेश करा; साखर आणि प्रक्रिया केलेले अन्न टाळा.
Ans: भरपूर फायबर असलेले पदार्थ, पातळ प्रथिने
Ans: संतुलित आहार आणि व्यायामावर लक्ष केंद्रित करा, विशेषतः पोटावरील चरबी कमी करण्यासाठी






