दररोज चावून खा आयुर्वेदिक ओव्याचे पान! आरोग्यासंबंधित गंभीर आजार राहतील दूर
ओव्याच्या पानांचे शरीराला होणारे फायदे?
ओव्याची पाने कशी खावीत?
पचनाच्या समस्या दूर करण्यासाठी उपाय?
चुकीचा आहार, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, अपुरी झोप, वारंवार जंक फूडचे सेवन आणि वातावरणात होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे शरीराला हानी पोहचते. मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाबाच्या समस्या वाढू लागल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसू लागतात. त्यामुळे सर्वच ऋतूंमध्ये आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आजारी पडल्यानंतर कायमच मेडिकलमधील गोळ्या औषधांचे सेवन केले जाते. पण सतत चुकीच्या गोळ्यांचे सेवन केल्यामुळे किडनीच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे कायमच लहान मोठ्या सर्दी खोकल्यासाठी मेडिकलमधील गोळ्या आणून खाण्याऐवजी घरगुती उपाय करावेत.(फोटो सौजन्य – istock)
प्रत्येक घरात औषध म्हणून ओवा असतो. पोटात दुखणे, अपचन किंवा ऍसिडिटी झाल्यानंतर ओव्याचे सेवन केले जाते. चिमूटभर ओवा खाऊन त्यावर गरम पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे आतड्यांमध्ये जमा झालेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि पोटात वाढलेल्या वेदना कमी होण्यास मदत होते. ओव्यासोबतच तुम्ही ओव्याचे पानांचे नियमित सेवन करू शकता. सकाळी उठल्यानंतर नियमित एक ओव्याचे पान चावून खाल्ल्यास शरीराला भरमसाट फायदे होतात. आज आम्ही तुम्हाला नियमित ओव्याचे पान चावून खाल्ल्यास शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल जाऊन घेऊया सविस्तर माहिती.
भारतीय आयुर्वेदात ओव्याच्या पानांना खूप जास्त महत्व आहे. ओव्याच्या पानांना कर्पूरवल्ली असे सुद्धा म्हंटले जाते. ही पाने केवळ शोभेसाठी नाहीतर आरोग्यासाठी सुद्धा खजिना आहेत. ओव्याची पाने दिसायला जाड आणि आतून मऊ असतात. मागील अनेक पिढ्यांपासून आयुर्वेदात ओव्याच्या पानांचे सेवन केले जात आहे. अपचन, गॅस पोट फुगणं किंवा एसिडीटी इत्यादी समस्या उद्भवल्यास ओव्याच्या पानांचे सेवन करावे. यामुळे आतड्यांमध्ये जमा झालेला गॅस बाहेर पडून जातो. याशिवाय तुम्ही ओव्याच्या पानांचा रस सुद्धा पिऊ शकता.
सतत तिखट आणि तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे पोटात खूप जास्त जळजळ वाढते. पोटात वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी ओव्याचे सेवन करावे. थंडीच्या दिवसांमध्ये सर्दी खोकला इत्यादी साथीच्या आजारांची शरीराला लागण होते. अशावेळी ओव्याच्या पानांचा रस बनवून प्यायल्यास दोन दिवसात घशात साचून राहिलेला कफ बाहेर पडून जाईल. लहान मुलांसाठी ओव्याची पाने सुरक्षित मानली जातात. फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि श्वसनमार्ग मोकळा करण्यासाठी ओव्याच्या पानांचे सेवन करावे.
वाढत्या रक्तदाबाच्या रक्त दाबाला कंटाळला आहात! जाणून घ्या डाईट, ‘या’ गोष्टी खा
ओव्याच्या पानांमध्ये विटामिन ए, सी आणि ओमेगा-६ फॅटी एसिड्स शरीरातील घाण बाहेर काढून टाकतात. ओव्याच्या पानांचे सेवन केल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. थंडीत सांध्यांमध्ये वाढलेली जळजळ आणि स्नायूंच्या वेदना कमी करण्यासाठी ओव्याच्या पानांचा लेप सांध्यांवर लावावा. त्वचेसंबंधित समस्या वाढू लागल्यानंतर ओव्याच्या पानांचे सेवन किंवा ओव्याच्या पानांचा रस त्वचेवर लावल्यास चेहऱ्यावर आलेले काळे डाग नष्ट होऊन जातील.
Ans: पचन म्हणजे खाल्लेल्या अन्नाचे शरीराला शोषता येतील अशा पोषक तत्वांमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया, ज्यामध्ये कचरा बाहेर टाकला जातो.
Ans: कमी फायबर, जास्त मसालेदार, चरबीयुक्त किंवा प्रक्रिया केलेले अन्न, कॅफिन/अल्कोहोलचे जास्त सेवन.
Ans: अस्वस्थ पोट, अन्न असहिष्णुता, अचानक वजन बदलणे, पोट फुगणे.






