Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भगवान श्रीकृष्णाची पूजा करताना ‘ह्या’ गोष्टी महत्त्वाच्या

  • By Rashmi Dongre
Updated On: Aug 07, 2022 | 03:32 PM
भगवान श्रीकृष्णाची पूजा करताना ‘ह्या’ गोष्टी महत्त्वाच्या
Follow Us
Follow Us:

जन्माष्टमीला बाल गोपाळांची मनोभावी पूजा केली जाते, पण ही पूजा करतांना पूजेमध्ये काही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. कारण शास्रानुसार या गोष्टींशिवाय कृष्णपूजा ही अपूर्ण मानली जाते. हिंदू धर्मात कृष्ण जन्माष्टमीला खूप महत्त्व आहे. यावर्षी कृष्ण जन्माष्टमी १८ ऑगस्ट २०२२ रोजी गुरुवारी आहे. भगवान श्रीकृष्णांचा जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला आणि रोहिणी नक्षत्रात झाला, त्यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाची पूजा केली जाते. या दिवशी जे भक्त पूर्ण भक्तिभावाने कृष्णाची आराधना करतात, त्यांच्या सर्व मनोकामना देव पूर्ण करतात, असे मानले जाते.

बासरी ही श्रीकृष्णाची सर्वात आवडती वस्तू आहे. त्यामुळे पूजेत बासरी ठेवा. कृष्णाची बासरी ही साधेपणा आणि निरागसतेच प्रतीक आहे. पूजा करतांना श्रीकृष्णाच्या मूर्तीसोबत गायीची देखील मूर्ती ठेवावी. कारण हिंदू धर्मात गाय ही अत्यंत पूजनीय मानली जाते. गायीच्या पोटात ३३ कोटी देव-देवता वास करतात असे मानले जाते. भगवान श्रीकृष्णाच्या प्रसादात तुळशीचे पानं नसेल तर भोग दिला जात नाही. त्यामुळे प्रसादामध्ये तुळशीचे पानं अवश्य टाकावे.मोराच्या पिसाशिवाय भगवान श्रीकृष्णाची सजावट अपूर्ण राहते, म्हणून कृष्णाच्या मूर्तीसोबत मोराची पिसे ठेवावी. मोराचे पंख हे सप्तरंगाचे आणि भव्यतेचे प्रतीक आहे. माखन मिश्री कृष्णाला खूप आवडते आहेत. म्हणून आठवणीने जन्माष्टमीला माखन मिश्रीला लाडू गोपाळांना अर्पण करावा.

जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्ण लहान मुलाच्या रूपात प्रकट होतात आणि त्यांना झुलायला पाळणा लागतो .त्यामुळे पूजेत पाळणा ठेवा, यामुळे तुमच्या कुटुंबात देखील आनंद येऊ शकतो. जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला वैजयंतीला विशेष हार घालतात. त्यामुळे पूजेच्या वेळी श्रीकृष्णाला वैजयंती हार घालायला विसरू नका. हा श्रीकृष्णाला घातलेला वैजयंती हार घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते. जन्माष्टमीच्या दिवशी घरात राधा-कृष्णाचे चित्र किंवा फोटो लावावा. असे केल्याने पती पत्नीचे प्रेमसंबंध चांगले होतात. जन्माष्टमीच्या दिवशी पूजेमध्ये शंख ठेवावा, यामुळे धनाची प्राप्ती होईल. या दिवशी भगवान श्रीकृष्णाला पिवळे आणि चमकदार वस्त्रे परिधान करावे. आभूषणे घालून सजाववे.

Web Title: Things are important while worshiping lord krishna nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2022 | 03:32 PM

Topics:  

  • Janmashtami news
  • NAVARASHTRA
  • navarashtra news
  • updated news

संबंधित बातम्या

Chandrapur News: चंद्रपूरवर पाणीटंचाईचे संकट? जलप्रकल्पांमध्ये केवळ 55.85% जलसाठा, शेतकऱ्यांची चिंता वाढली
1

Chandrapur News: चंद्रपूरवर पाणीटंचाईचे संकट? जलप्रकल्पांमध्ये केवळ 55.85% जलसाठा, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Karjat: मिरचोलीत आदिवासी जमिनीवर अतिक्रमणाचा आरोप; बेकायदेशीर कंपाऊंड हटवण्याची मागणी
2

Karjat: मिरचोलीत आदिवासी जमिनीवर अतिक्रमणाचा आरोप; बेकायदेशीर कंपाऊंड हटवण्याची मागणी

Raigad News: रोहा तालुक्यातील तिसे गावावर दरडीचा धोका, संरक्षण भिंतीचे काम रखडले; ग्रामस्थांचा जीव टांगणीला
3

Raigad News: रोहा तालुक्यातील तिसे गावावर दरडीचा धोका, संरक्षण भिंतीचे काम रखडले; ग्रामस्थांचा जीव टांगणीला

गणेशोत्सवाच्या तयारीला गालबोट; भुलेश्वरमध्ये मूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू, पाच जखमी
4

गणेशोत्सवाच्या तयारीला गालबोट; भुलेश्वरमध्ये मूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू, पाच जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.