Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: ५-६ वर्षे आंदोलने, कोट्यवधींचा खर्च… तरीही कालव्याची कामे अपूर्ण; रोह्यातील शेतकऱ्यांचा संताप

रोहा तालुक्यातील आंबेवाडी ते निवी कालव्याच्या दुरुस्तीचा प्रश्न पूर्णपणे मार्गी लागला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. पाले गाव हद्दीसह अन्य ठिकाणी झालेली कामे निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 16, 2026 | 02:29 PM
Raigad News: ५-६ वर्षे आंदोलने, कोट्यवधींचा खर्च... तरीही कालव्याची कामे अपूर्ण; रोह्यातील शेतकऱ्यांचा संताप

Raigad News: ५-६ वर्षे आंदोलने, कोट्यवधींचा खर्च... तरीही कालव्याची कामे अपूर्ण; रोह्यातील शेतकऱ्यांचा संताप

Follow Us
Follow Us:
  • कालव्याच्या दुरुस्तीचा प्रश्न पूर्णपणे मार्गी लागलेला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी
  • कालव्याच्या दुरुस्ती व नवीन कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर
  • पाले गाव हद्दीसह अन्य ठिकाणी झालेली कामे निकृष्ट दर्जाची असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
रोहा: रोहा तालुक्यातील आंबेवाडी ते निवी कालव्याला पाणी मिळावे यासाठी बळीराजा फाउंडेशनने दिलेला लढा रोहा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरला आहे. गेल्या ५ ते ६ वर्षांपासून उपोषण, मोर्चे आणि आंदोलने करूनही कालव्याच्या दुरुस्तीचा प्रश्न पूर्णपणे मार्गी लागलेला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. हा लढा उभा राहिला नसता तर आज ‘एक होता कालवा’ असे म्हणण्याची वेळ आली असती, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

Nagpur News : अतिक्रमण हटविण्याची कारवाई केवळ दिखावा? काही तासांतच पुन्हा जैसे थे स्थिती; वाहतूक कोंडीने नागपूरकर त्रस्त!

या आंदोलनाची दखल विधानसभा आणि विधान परिषदेत घेतल्यानंतर कालव्याच्या दुरुस्ती व नवीन कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला. मात्र, बारसोली येथील ड्रेनेज, सायफन आणि गळतीची कामे पूर्ण करण्यासाठी दोन ते तीन वर्षे लागली. मागील वर्षाच्या अखेरीस कालव्यातून पाणी सुरू झाले असले तरी संभे आणि पाले हद्दीतील कालवा अस्तरीकरणाची (लायनिंग) कामे अद्याप अपूर्ण आहेत. त्यामुळे सुमारे ३०% पाणी वाया जात असल्याचा दावा बळीराजा फाउंडेशनने केला आहे.

निकृष्ट कामांमुळे नुकसान

पाले गाव हद्दीसह अन्य ठिकाणी झालेली कामे निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करूनही कालव्याची कामे अपूर्ण असल्याने संबंधित कामांची सखोल चौकशी करून दोषी ठेकेदार आणि अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच कालव्याला नियमित पाणी सोडण्यासाठी आवश्यक कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणीही फाउंडेशनने केली आहे.

आंबेवाडी ते निवी कालवा रोडपर्यंत गावांचा समावेश

आंबेवाडी, संभे, पाले, महाबले पाले, बाकाडे पाले, वाशी, लांढर, बोरघर, निवि, निवि ठाकूरवाडी, निवि आदिवासीवाडी, भुवनेश्वर, तळाघर, कारिवणे, किल्ला, धाटाव, वरसगाव, बारसोली इत्यादी प्रमुख जवळपास २० गावांचा समावेश आहे.

ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर संबंधित सर्व अभियंता व अधिकाऱ्यांनी तातडीने संपर्क केला असून ३ दिवसांत कालव्याची साफसफाई सुरू होईल. लाइनिंग व दुरुस्ती कामे वेळेत पूर्ण करून पाणी हगामी डिसेंबरपर्यंत पूर्ववत होईल. – राकेश धाकतोडे, कार्यकारी अभियंता, कोलाड पाटबंधारे विभाग

Mumbai News: प्रकाशातील अदृश्य बदल आता टिपणार ग्राफीन! आयआयटी मुंबईच्या संशोधनातून अचूक मापनाची नवी दिशा

आंबेवाडी ते निवी कालवा दुरुस्तीसाठी पाट बंधारे विभागाने आतापर्यंत करोडो रुपये खर्ची घातले आहेत. तरी देखील काही ठिकाणी कामे प्रलंबित आहे. प्रलंबित कामे येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण न केल्यास या भागातील शेतकरी व बळीराजा फाऊंडेशन संघटना संबंधित अधिकाऱ्यांना घेराव घातल्याशिवाय राहणार नाही. पाणी आमच्या हक्काचा असून आमचे पाणी कोणी रोखणार नाही. – राजेंद्र जाधव, संस्थापक, बळीराजा फाऊंडेशन

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Ambewadi nivi canal issue farmers give authorities deadline to complete pending work hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 02:29 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Khadi Mahotsav 2026 in Mumbai: खादी आणि ग्रामोद्योग आयोग म्हणजे काय? MSME मंत्रालयाअंतर्गत आयोगाची भूमिका जाणून घ्या…
1

Khadi Mahotsav 2026 in Mumbai: खादी आणि ग्रामोद्योग आयोग म्हणजे काय? MSME मंत्रालयाअंतर्गत आयोगाची भूमिका जाणून घ्या…

CJP Lehra Do Tiranga Rally: आम्ही गप्प बसण्यास नकार देतो म्हणून…; अराजकतेच्या टिकेला अभिजीत दिपकेंचं उत्तर
2

CJP Lehra Do Tiranga Rally: आम्ही गप्प बसण्यास नकार देतो म्हणून…; अराजकतेच्या टिकेला अभिजीत दिपकेंचं उत्तर

Bhandara News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! २२ ऑक्टोबरपासून देशभरात ‘खेत बचाओ अभियान, केंद्र सरकारची नवी मोहीम
3

Bhandara News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! २२ ऑक्टोबरपासून देशभरात ‘खेत बचाओ अभियान, केंद्र सरकारची नवी मोहीम

Chandrapur News: महाराष्ट्रात पहिलाच प्रयोग! धूळ-कचऱ्यापासून होणार महामार्गाची सुटका, स्वच्छतेसाठी होणार आधुनिक यंत्राचा वापर
4

Chandrapur News: महाराष्ट्रात पहिलाच प्रयोग! धूळ-कचऱ्यापासून होणार महामार्गाची सुटका, स्वच्छतेसाठी होणार आधुनिक यंत्राचा वापर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.