Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhandara News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! २२ ऑक्टोबरपासून देशभरात ‘खेत बचाओ अभियान, केंद्र सरकारची नवी मोहीम

२२ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत देशभरात 'खेत बचाओ अभियान राबविण्यात येणार आहे. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. खतांच्या विक्रीसंबंधी नियमांबाबत जनजागृती करून शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 16, 2026 | 03:00 PM
Bhandara News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! २२ ऑक्टोबरपासून देशभरात ‘खेत बचाओ अभियान, केंद्र सरकारची नवी मोहीम

Bhandara News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! २२ ऑक्टोबरपासून देशभरात ‘खेत बचाओ अभियान, केंद्र सरकारची नवी मोहीम

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतही ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येणार
  • २२ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत देशभरात ‘खेत बचाओ अभियान
  • तेलबिया, कडधान्ये आणि फळपिकांच्या लागवडीला प्रोत्साहन देऊन पीक विविधीकरणावर भर
भंडारा: मातीची सुपीकता टिकवून शेती अधिक शाश्वत बनविणे, रासायनिक खतांचा संतुलित वापर वाढविणे आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या वतीने २२ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत देशभरात ‘खेत बचाओ अभियान राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतही ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येणार असून, यासंदर्भात कृषी आयुक्तालयाने विभागीय आणि जिल्हास्तरीय कार्यालयांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.

Raigad News: ५-६ वर्षे आंदोलने, कोट्यवधींचा खर्च… तरीही कालव्याची कामे अपूर्ण; रोह्यातील शेतकऱ्यांचा संताप

जमिनीचे आरोग्य सुधारणे, पिकांना आवश्यक अन्नद्रव्यांचा योग्य पुरवठा करणे आणि शेतीतील संसाधनांचा कार्यक्षम वापर वाढविणे, ही या अभियानाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. माती परीक्षणाच्या आधारे खतांचा वापर करणे, मृदा आरोग्यपत्रिकेतील शिफारशींचे पालन करणे आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा अवलंब करणे याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. तेलबिया, कडधान्ये आणि फळपिकांच्या लागवडीला प्रोत्साहन देऊन पीक विविधीकरणावर भर दिला जाणार आहे. भातपिकानंतर पडीक राहणाऱ्या जमिनीचा प्रभावी वापर करून अतिरिक्त पीक घेण्याच्या संधींबाबतही जनजागृती केली जाईल. याव्यतिरिक्त, पीक अवशेषांच्या योग्य व्यवस्थापनामुळे, शेतकऱ्यांना कापसाची धसकटे आणि पेंढा जाळण्यापासून रोखता येईल.

पीकविम्याबाबत मार्गदर्शन

अभियानादरम्यान शेतकरी ओळखपत्र तयार करणे व अद्ययावत ठेवणे, तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग नोंदविणे याबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली जाणार आहे. खतांच्या विक्रीसंबंधी नियमांबाबत जनजागृती करून शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. ही मोहीम केवळ शासकीय कार्यक्रमापुरती मर्यादित न ठेवता लोकचळवळ म्हणून राबवावी, असे आवाहन कृषी आयुक्तालयाने केले आहे.

गोरेगावात १८ महिन्यांच्या चिमुकलीचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू; सोबत होती १० वर्षांची मुलगी, सीसीटीव्हीमुळे गूढ वाढले

जलसंधारणासह नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन

शेतीसाठी पाण्याचा काटकसरीने वापर, पावसाच्या पाण्याचे संकलन, भूजल पुनर्भरण आणि जलसाठ्यांचे संवर्धन याबाबत शेतक-यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. ‘प्रति थेब अधिक पीक’ या संकल्पनेतून सूक्ष्म सिंचन पद्धतींच्या वापरालाही प्रोत्साहन दिले जाईल. सेंद्रिय व नैसर्गिक शेती पद्धती, एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि कीटकनाशकांचा संतुलित वापर याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. शेतावरील प्रत्यक्ष प्रात्यक्षिके, क्षेत्रीय भेटी आणि शेतकरी मेळाव्यांच्या माध्यमातून या पद्धतींचे फायदे समजावून सांगितले जातील. कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्रे, आत्मा आणि कृषी विद्यापीठांच्या समन्वयातून हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Khet bachao campaign to begin on october 22 across india maharashtra farmers to benefit hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Bhandara
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Khadi Mahotsav 2026 in Mumbai: खादी आणि ग्रामोद्योग आयोग म्हणजे काय? MSME मंत्रालयाअंतर्गत आयोगाची भूमिका जाणून घ्या…
1

Khadi Mahotsav 2026 in Mumbai: खादी आणि ग्रामोद्योग आयोग म्हणजे काय? MSME मंत्रालयाअंतर्गत आयोगाची भूमिका जाणून घ्या…

CJP Lehra Do Tiranga Rally: आम्ही गप्प बसण्यास नकार देतो म्हणून…; अराजकतेच्या टिकेला अभिजीत दिपकेंचं उत्तर
2

CJP Lehra Do Tiranga Rally: आम्ही गप्प बसण्यास नकार देतो म्हणून…; अराजकतेच्या टिकेला अभिजीत दिपकेंचं उत्तर

Chandrapur News: महाराष्ट्रात पहिलाच प्रयोग! धूळ-कचऱ्यापासून होणार महामार्गाची सुटका, स्वच्छतेसाठी होणार आधुनिक यंत्राचा वापर
3

Chandrapur News: महाराष्ट्रात पहिलाच प्रयोग! धूळ-कचऱ्यापासून होणार महामार्गाची सुटका, स्वच्छतेसाठी होणार आधुनिक यंत्राचा वापर

School Admission Age Limit 2027-28: पालकांनो, प्रवेशापूर्वी वयाची अट तपासा! नर्सरीसाठी ३, पहिलीसाठी ६ वर्षे बंधनकारक
4

School Admission Age Limit 2027-28: पालकांनो, प्रवेशापूर्वी वयाची अट तपासा! नर्सरीसाठी ३, पहिलीसाठी ६ वर्षे बंधनकारक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.