सतत स्क्रिन पाहून डोळ्यांवर वाढलेला तणाव कमी करण्यासाठी 'हा' घरगुती उपाय ठरेल प्रभावी
धावपळीची जीवनशैली, कामाचा तणाव, सतत लॅपटॉप मोबाईलचा वापर, अपुरी झोप, मानसिक तणाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यासोबतच शरीरातील छोट्या अतिशय नाजूक अवयवांवर सुद्धा लगेच दिसून येतो. शरीरातील अतिशय नाजूक अवयव म्हणजे डोळे. सतत काम, मोबाईल आणि तासनतास लॅपटॉप पाहिल्यामुळे डोळ्यांवर तणाव येतो. डिजिटल युगात मोबाईल आणि लॅपटॉपचा खूप जास्त वापर केला जात आहे. जास्त वेळ स्क्रिन पाहिल्यामुळे डोळे अतिशय कोरडे पडतात. याशिवाय डोळ्यांमधून पाणी येणे, डोळे कोरडे पडणे, डोळे लाल होणे, डोळे झोंबणे इत्यादी अनेक लक्षणे दिसून येतात. डोळ्यांच्या समस्या वाढू लागल्यानंतर सतत दुर्लक्ष केले जाते. डोळ्यांच्या समस्या वाढू लागल्यानंतर काहीवेळा डोकेदुखीची समस्या उद्भवते.(फोटो सौजन्य – istock)
स्क्रीनमधून येणाऱ्या ब्लू रेजमुळे डोळ्यांच्या नसांवर अतिरिक्त तणाव येतो, ज्यामुळे डोळ्यांखाली वर्तुळ येणे, डोळ्यांखाली त्वचा काळी पडणे, डोळे अतिशय बारीक होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. याशिवाय डोळ्यांच्या दृष्टीवर परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे डोळ्यांची जास्त काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला डोळ्यांवर वाढलेला तणाव कमी करण्यासाठी आठवड्यातून दोनदा कोणते घरगुती उपाय करावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. याशिवाय डोळ्यांना विश्रांती देणे सुद्धा आवश्यक आहे.
डोळ्यांभोवती वाढलेला काळेपण कमी करण्यासाठी काही महिला महागडे स्किन केअर, क्रीम इत्यादी अनेक गोष्टींचा वापर केला जातो. पण केमिकल ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती उपाय करून डोळ्यांची काळजी घ्यावी. घरगुती उपाय केल्यामुळे डोळ्यांची नैसर्गिक चमक कायम टिकून राहते. यासाठी अतिशय सोपा उपाय म्हणजे आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा डोळ्यांवर काकडी किंवा काकडीचा रस लावणे. काकडीमध्ये असलेल्या पाण्यामुळे डोळ्यांमधील उष्णता कमी होते आणि डोळे कायमच सुंदर दिसतात. रात्री झोपण्याआधी काकडीचे पातळ तुकडे करून डोळ्यांवर ठेवावे. यामध्ये असलेल्या पाण्यामुळे डोळ्यांवर वाढलेला तणाव कमी होतो. काकडी डोळ्यांवर ठेवल्यामुळे डोळ्यांभोवती आलेली सूज, काळे डाग आणि त्वचा अतिशय मुलायम होण्यास मदत होते.
डोळ्यांसाठी अतिशय प्रभावी मानला जाणारा पदार्थ म्हणजे गुलाब पाणी. गुलाब पाणी त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी केला जातो. गुलाब पाणी डोळ्यांवर लावल्यामुळे डोळ्यांच्या स्नायूंना आराम मिळतो. याशिवाय डोळ्यांभोवती असलेली त्वचा हायड्रेट राहते आणि काळे डाग कमी होण्यास मदत होते. यासाठी वाटीमध्ये गुलाब पाणी घेऊन त्यात कापूस बुडवून डोळ्यांवर ठेवावा. रात्री झोपण्याआधी हा उपाय केल्यास डोळ्यांवर आलेला अतिरिक्त तणाव कमी होऊन जाईल.