
थंडीत हाडांना आलेली सूज आणि वेदना कमी करण्यासाठी स्वयंपाक घरातील 'हा' पिवळा पदार्थ ठरेल प्रभावी
थंडीच्या दिवसांमध्ये हाडे का दुखतात?
हळदीचे सेवन केल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात?
स्नायूंमधील लवचिकता सुधारण्यासाठी उपाय?
थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. कारण वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. रक्तप्रवाहात निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे शरीराला योग्य रक्तपुरवठा होत नाही, यामुळे स्नायूंमध्ये वेदना, कंबर दुखणे, हाडांमधून कटकट आवाज येणे, खाली बसताना किंवा वर उठताना हाडांमध्ये वेदना इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. हाडांमध्ये वाढलेल्या वेदना केवळ थंडीमुळेच नाहीतर कॅल्शियम, विटामिन डी किंवा विटामिन बी १२ च्या कमतरतेमुळे सुद्धा उद्भवतात. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्यावी. दैनंदिन आहारात शरीरस आवश्यक असलेल्या पौष्टीक आणि गुणकारी पदार्थांचे सेवन करावे. हाडांचे आरोग्य बिघडल्यानंतर रोजच्या कामात अनेक अडथळे निर्माण होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला थंडीत हाडांना आलेली सूज कमी करण्यासाठी कोणत्या पिवळ्या पदार्थाचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
जेवण बनवताना पदार्थाची चव, सुगंध आणि रंग वाढवण्यासाठी हळदीचा वापर केला जातो. हळदीच्या वापरामुळे पदार्थाची चव अतिशय सुंदर लागते. हळदीचा वापर जेवण बनवण्यसाठीच नाहीतर शरीर आणि त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी सुद्धा केला जातो. संधिवात आणि हाडांना आलेली सूज कमी करण्यासाठी हळदीचे सेवन करावे.कोमट पाण्यात हळद मिक्स करून प्यायल्यास शरीरातील हाडांना पोषण मिळेल. यासोबतच सुधारण्यासाठी मदत होईल. हळदीमधील कर्क्यूमिन हाडांमधील सूज कमी करण्यासोबतच दुखणे, कडकपणा आणि अस्वस्थता कमी करण्यासाठी सुद्धा मदत करते.
हळदीचे सेवन तुम्ही गरम दुधातून किंवा कोमट पाण्यातून सुद्धा करू शकता. रात्री झोपण्याआधी एक ग्लास कोमट दुधात हळद मिक्स करून प्यायल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील. काहींना कर्क्यूमिन सप्लिमेंट्स घेण्याची सवय असते. वारंवार हाडांच्या समस्या उद्भवू लागल्यास हळदीचे सेवन करावे. हळदीमुळे हाडांना आलेली सूज कमी होते आणि संधिवात, कंबर दुखी इत्यादी सर्वच समस्यांपासून आराम मिळतो. हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी हळदीच्या सेवनासोबतच नियमित चालणे, व्यायाम करणे, शारीरिक आहार, कॅल्शियम युक्त पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे.
थंडीच्या दिवसांमध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. साथीचे आजार, सर्दी, खोकला इत्यादी सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी हळद दुधाचे सेवन करावे. याशिवाय घशात वाढलेली खवखव कमी करण्यासाठी चमचाभर मधात चिमूटभर हळद मिक्स करून चाटण खाल्ल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील. +स्नायूंमधील कमी झालेली ऊर्जा वाढवण्यासाठी आणि हाडांमधील लवचिकता चांगली ठेवण्यासाठी हळदीचे सेवन करावे. थंडीत रक्तपुरवठा व्यवस्थित न झाल्यामुळे स्नायूंमध्ये कडकपणा वाढतो, या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी हळदीचे सेवन करावे.
Ans: डांच्या दुखण्याची अनेक कारणे असू शकतात, ज्यात दुखापत, जळजळ, पोषक तत्वांची कमतरता (विशेषतः कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी), संधिवात (Arthritis), ऑस्टिओपोरोसिस
Ans: हालचाल करताना किंवा वाकताना त्रास होणे
Ans: कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी युक्त पदार्थ जसे की दूध, दही, हिरव्या पालेभाज्या, आणि मासे यांचा आहारात समावेश करा.