पायांच्या तळव्यांमध्ये खूप जास्त जळजळ आणि आग होते? मग 'हे' घरगुती उपाय करून मिळवा कायमचा आराम
रात्री झोपताना पायांमध्ये जळजळ का होते?
कोणत्या विटामिनच्या कमतरतेमुळे पाय दुखतात?
पायांमधील वेदना- जळजळ कमी करण्यासाठी घरगुती उपाय?
कामाचा वाढलेला तणाव, आहारात सतत होणारे बदल, पाण्याची कमतरता, पोषक घटकांचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. वाढत्या धावपळीमुळे शरीराकडे लक्ष देण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. दिवसभर काम करून थकून घरी आल्यावर सगळ्यांचं आरामाची आवश्यकता असते. पाय झोपल्यानंतर पायांमध्ये अचानक गोळे येणे, तळव्यांमध्ये वाढलेली जळजळ आग किंवा पायांमध्ये वाढलेल्या वेदना इत्यादी समस्यांमुळे व्यवस्थित झोप होत नाही. झोपेची कमतरता निर्माण झाल्यानंतर संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. याशिवाय चुकीच्या चप्पल वापरल्यामुळे पायांमध्ये खूप जास्त जळजळ आणि वेदना होतात. ही लक्षणे शरीरातील नसा कमकुवत होणे, विटामिन बी १२ किंवा लोहाच्या कमतरतेमुळे उद्भवू शकतात. त्यामुळे पायांमध्ये वाढलेल्या वेदनांकडे दुर्लक्ष न करता योग्य उपचार करून आराम मिळवावा.(फोटो सौजन्य – istock)
मानवी शरीरात तीन दोष आढळून येतात. त्यातील कोणताही एक दोष वाढल्यानंतर शरीराला हानी पोहचण्यास सुरुवात होते. शरीरात पित्ताचे प्रमाण वाढल्यानंतर ऍसिडिटी, गॅस, अपचन इत्यादी बऱ्याच समस्या उद्भवू लागतात. वाढलेले पित्त शरीराच्या खालच्या भागात साचून राहते. ज्यामुळे उष्णता, जळजळ आणि काहीवेळा पायांमध्ये जळजळ सुद्धा जाणवू लागते. पित्त वाढण्यास अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात.आहारात अतिमसालेदार पदार्थांचे सेवन करणे, मानसिक तणाव, झोपेची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर झाल्यानंतर शरीराच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे कायमच थंड आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे.
दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी शरीराला पौष्टीक घटकांची आणि आवश्यक विटामिनची खूप जास्त आवश्यकता असते. पण बऱ्याचदा शरीरात निर्माण झालेला पोषक घटकांचा अभाव आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरतो. विटामिन बी १२ आणि लोह शरीरासाठी अतिशय महत्वाचे आहे. पण या विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर पायांमध्ये खूप जास्त जळजळ आणि वेदना जाणवू लागतात. पायांमध्ये वाढलेला सुन्नपणा आणि जळजळ कमी करण्यासाठी आहारात अंडी, दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या आणि सुका मेवा इत्यादी पदार्थांचा समावेश करावा.
हाडे कडकड वाजतायेत? आयुर्वेद बाबांनी सांगितला 10 रुपयांचा उपाय, 206 हाडांमध्ये भरेल मजबूती
रात्री झोपण्याआधी नियमित पाण्यात बुडवून ठेवावेत. गुलाबपाणी, त्रिफळा किंवा कोरफडीचा रस मिक्स करून तयार केलेल्या पाण्यात पाय ठेवल्यास पायांमधील जळजळ कमी होईल आणि वेदनांपासून आराम मिळेल. तसेच नियमित तुळस, कोरफड आणि शतावरीचे पेय प्यायल्यास शरीरात वाढलेले पित्ताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. कोरफड जेल आणि नारळाच्या तेल एकत्र मिक्स करून पायांवर मसाज केल्यास पायांमध्ये वाढलेल्या वेदना आणि जळजळ कमी होईल. कोरफड, गिलॉय, शतावरी, नारळ पाणी आणि टरबूज, कलिंगड इत्यादी थंड पदार्थांचे सेवन केल्यास शरीरात वाढलेली उष्णता कमी होऊन थंड कायम राहील.
Ans: व्हिटॅमिन बी १२ किंवा इतर बी व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे जळजळ होऊ शकते.
Ans: हा त्रास सहसा रात्रीच्या वेळी वाढतो, ज्यामुळे झोप लागण्यास अडचण येते.
Ans: खोबरेल तेल, निलगिरी किंवा पुदिन्याच्या तेलाने पायांची मालिश केल्यास थंडावा मिळतो.






