Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चिकन, मटण खाऊन कंटाळा आलाय? मग घरी बनवा मसालेदार अंडा बिर्याणी

खास अंडाप्रेमींसाठी आज आम्ही घेऊन आलो आहोत सुगंधित आणि मसालेदार अंडा बिर्याणी रेसिपी! बिर्याणी लव्हर्स असाल तर अंड्याची ही झणझणीत बिर्याणी तुम्ही एकदा ट्राय करायलाच हवी.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 02, 2025 | 02:00 PM
चिकन, मटण खाऊन कंटाळा आलाय? मग घरी बनवा मसालेदार अंडा बिर्याणी

चिकन, मटण खाऊन कंटाळा आलाय? मग घरी बनवा मसालेदार अंडा बिर्याणी

Follow Us
Follow Us:

बिर्याणी म्हटलं की, अनेकदा आपल्या मनात चिकन बिर्याणी, मटण बिर्याणीचा विचार येतो मात्र सारखं सारखं चिकन, मटण खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही यंदा अंड्याची बिर्याणी बनवू शकता. ही बिर्याणी चवीला फार अप्रतिम लागते, शिवाय झटपट बनून तयारही होते. अंडा आपल्या आरोग्यासाठी फार फायद्याचा असतो, यात अनेक पोषक घटक असतात जे आपल्या आरोग्यासाठी फायदेकारक ठरतात.

आषाढी एकादशीच्या उपवासानिमित्त घरी बनवा शिंगाड्याचे पिठाचे चविष्ट लाडू, नोट करून घ्या रेसिपी

अंड्याची भाजी खायला आवडत नसेल तर तुम्ही अशावेळी याची मसालेदार आणि गरमा गरम बिर्याणी तयार करू शकता. तांदळाचे सुगंध, मसाल्यांचे मिश्रण आणि परतलेली अंडी यांचा अप्रतिम संगम असलेली अंडा बिर्याणी चवीला अप्रतिम लागते. खास करून तुमच्या विकेंड मेन्यूमध्ये तुम्ही याला सामील करू शकता आणि तुमच्या विकेंडची मजा आणखीन द्विगुणित करू शकता. चला लगेच नोट करूयात अंडा बिर्याणीसाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

अंडी शिजवण्यासाठी:

  • अंडी – 4 ते 6 (उकडलेली)
  • हळद – ¼ टीस्पून
  • लाल तिखट – ½ टीस्पून
  • तेल – १ टेबलस्पून
भातासाठी:
  • बासमती तांदूळ – २ कप (१ तास भिजवलेले)
  • पाणी – ४ कप
  • मीठ – चवीनुसार
  • तमालपत्र, लवंग, दालचिनी, मोठी वेलदोडा – प्रत्येकी १
बिर्याणी मसाला:
  • कांदा – २ मोठे (स्लाइस केलेले)
  • टोमॅटो – १ मोठा (चिरलेला)
  • हिरव्या मिरच्या – २
  • आले-लसूण पेस्ट – १½ टेबलस्पून
  • दही – ½ कप
  • लाल तिखट – १ टीस्पून
  • हळद – ¼ टीस्पून
  • गरम मसाला – ½ टीस्पून
  • बिर्याणी मसाला – १ टीस्पून (ऐच्छिक)
  • मीठ – चवीनुसार
  • बारीक चिरलेली कोथिंबीर व पुदिना – प्रत्येकी २ टेबलस्पून
  • तेल – ३ टेबलस्पून
  • तूप – १ टेबलस्पून

कृती

  • अंडा बिर्याणी बनवण्यासाठी सर्वप्रथम बासमती तांदळाला पाणी, मीठ व गरम मसाले घालून ८०% शिजवा व गाळून थंड होऊ द्या.
  • उकडलेली अंडी सोलून त्यावर हळद व तिखट लावून तेलात थोडी कुरकुरीत होईपर्यंत परतून बाजूला ठेवा.
  • कढईत तेल गरम करून कांदे सोनेरी रंगावर परतून घ्या. नंतर त्यात हिरव्या मिरच्या, आले-लसूण पेस्ट घालून परता.
  • टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत परता. मग हळद, तिखट, मीठ, गरम मसाला, बिर्याणी मसाला घालून परतावे.
  • त्यात दही, कोथिंबीर, पुदिना घालून मिश्रण एकजीव करा.
  • परतलेली अंडी या तयार मसाल्यात घालून २-३ मिनिटे परता.
  • एका मोठ्या भांड्यात आधी भाताचा थर, मग अंड्याचा मसाला, पुन्हा भात, थोडे तूप, पुदिना आणि कोथिंबीर अशा थरांनी बिर्याणी सेट करा.
  • झाकण लावून १०-१५ मिनिटे मंद आचेवर दम द्या.
  • गरमागरम एग बिर्याणी रायता, कोशिंबीर किंवा पापडासोबत सर्व्ह करा.
  • अधिक झणझणीत हवी असल्यास अंड्याला थोडा चाट मसाला लावूनही परतता येते.
  • तुमच्याकडे वेळ कमी असल्यास कुकरमध्ये एकत्रित एक पॉट बिर्याणीही करता येते.

Web Title: Tired of eating chicken and mutton then make spicy egg biryani at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2025 | 02:00 PM

Topics:  

  • biryani
  • food recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड
1

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड

Recipe : जेवणात तोंडी लावायला घरी बनवा झणझणीत आणि चटकदार चवीची लसणाची चटणी, रेसिपी नोट करा
2

Recipe : जेवणात तोंडी लावायला घरी बनवा झणझणीत आणि चटकदार चवीची लसणाची चटणी, रेसिपी नोट करा

चिमुकल्यांसाठी बनवा स्पेशल पदार्थ! वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करुन बनवा मसालेदार चटपटीत चिप्स, नोट करुन घ्या रेसिपी
3

चिमुकल्यांसाठी बनवा स्पेशल पदार्थ! वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करुन बनवा मसालेदार चटपटीत चिप्स, नोट करुन घ्या रेसिपी

Coconut Halwa Recipe: तोंडात टाकताच सहज विरघळेल! तामिळनाडूतील पारंपरिक पद्धतीने बनवा टेस्टी कोकोनट हलवा, नोट करुन घ्या रेसिपी
4

Coconut Halwa Recipe: तोंडात टाकताच सहज विरघळेल! तामिळनाडूतील पारंपरिक पद्धतीने बनवा टेस्टी कोकोनट हलवा, नोट करुन घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.