
पोटावर वाढलेले चरबीचे टायर्स होतील नष्ट! रात्री झोपण्याआधी नियमित करा 'या' हिरव्या पदार्थाचे सेवन
वजन कमी करण्यासाठी प्रभावी उपाय?
वेलची खाण्याचे फायदे?
पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी उपाय?
जगभरात वाढलेले वजन आणि लठ्ठपणामुळे अनेक लोक त्रस्त आहेत. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. पोटावर किंवा शरीराच्या इतर अवयवांवर वाढलेला चरबीचा घेर बऱ्याचदा महिलांचा आत्मविश्वास कमी करून टाकतो. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी कायमच तासनतास जिम, महागडा डाएट, सप्लिमेंट्स, गोळ्या औषध इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. पण चुकीच्या पद्धतीने डाएट फॉलो केल्यामुळे आणि अतिव्यायाम केल्यामुळे वजन कमी होण्याऐवजी आणखीनच वाढत जाते. याचा संपूर्ण आरोग्यावर गंभीर परिणाम दिसून येतो. वजन कमी करणाऱ्या गोळ्या आणि सिप्लिमेंट्सचे सतत सेवन केल्यास किडनीचे आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे दैनंदिन आहारातील खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. (फोटो सौजन्य – istock)
वजन वाढल्यानंतर कायमचं बाजारात उपलब्ध असलेल्या गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी नैसर्गिक आणि घरगुती पदार्थांचे सेवन करून वजन कमी करावे. यामुळे शरीरावर सकारात्मक परिणाम दिसून येतात. आज आम्ही तुम्हाला रात्री झोपण्याआधी कोणत्या हिरव्या पदार्थाचे सेवन केल्यास वाढलेले वजन कमी होईल, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थाच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतील आणि तुम्ही कायमच हेल्दी आणि स्लिम राहाल. वजन कमी करण्यासाठी रात्री झोपण्याआधी वेलचीचे सेवन करावे. वेलची खाल्ल्यामुळे पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होण्यासोबतच शरीराला अनेक फायदे होतील. तसेच तुम्ही वेलची चहा किंवा वेलचीचा काढा सुद्धा पिऊ शकता.
पोटात वाढलेला जडपणा, आतड्याना आलेली सूज, ऍसिडिटी, गॅस इत्यादी सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी वेलची प्रभावी ठरते. वेलचीमध्ये असलेले पचनाचे एन्झाईम्स खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन करण्यासाठी मदत करतात. यामुळे पोटाच्या तक्रारी उद्भवत नाहीत. यासाठी रात्री झोपण्याआधी एक वेलची तोंडात टाकून चघळावी. नियमित वेलचीचे सेवन केल्यास पोटाच्या सर्वच समस्या दूर होतील.
उच्च रक्तदाब वाढल्यानंतर हृदय आणि मेंदूच्या आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. अशावेळी वेलची अतिशय गुणकारी ठरेल. वेलचीमध्ये प्रभावी अँटीऑक्सिडंट्स आढळून येतात, ज्यामुळे शरीरातील मिठाचे प्रमाण कमी होऊन जाते. याशिवाय हृदयाच्या रक्तवाहिन्या रिलॅक्स राहतात. रक्तदाब नियंत्रणात राहिल्यास हृदयावर वाढलेला अनावश्यक तणाव कमी होण्यास मदत होते.
अपचनाची समस्या उद्भवल्यानंतर तोंडाला वास येतो. तोंडाच्या दुर्गंधीपासून आराम मिळवण्यासाठी वेलची खावी. एक वेलची तोंडात टाकून सतत चघळत राहिल्या तोंडात वाढलेला दुर्गंधीचा वास कमी होईल. पूर्वीच्या काळी राजे महाराजे जेवणानंतर वेलचीचे सेवन करायचे. वेलची खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते, तोंडातील दुर्गंधीचा वास कमी होतो.
Ans: भरपूर फळे, भाज्या, पातळ प्रथिने (lean proteins) आणि संपूर्ण धान्य
Ans: धावणे, चालणे, झुंबा, पोहणे.
Ans: साध्य करण्यायोग्य उद्दिष्टे ठेवा.