(फोटो सौजन्य – Pinterest)
मागील काही काळापासून किडनी खराब होण्याच्या समस्या फार वाढल्या आहेत. असं झाल्यास, शरीरातील विषारी घटक बाहेर पडत नाही आणि ते शरीराच्या आतच साठू लागतात. यामुळे आपले आरोग्य धोक्यात येऊ शकते. यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या एका अभ्यासानुसार, अँटीऑक्सिडंट्स आणि काही दाहक-विरोधी संयुगे असलेले पोषक घटक किडनीसाठी फायदेशीर ठरू शकतात. आज आम्ही तुम्हाला या लेखात काही अशा पदार्थांची नावे सांगणार आहोत ज्यांचे सेवन किडनीच्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरते.
ब्लूबेरी
आकाराने लहान असणारे हे फळ किडनीच्या निरोगी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. ब्लूबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि पोटॅशियम असते, जे रक्तवहिन्यासंबंधी कार्य सुधारते. किडनीचे आरोग्य राखण्यासाठी, तुम्ही दररोज अर्धा कप इतक्या ब्लूबेरीचे सेवन करू शकता. याचे सेवन शरीरात क्रिएटिनिनची पातळी कमी करते ज्यामुळे सीकेडी, डायलिसिस किंवा किडनी स्टोन सारख्या समस्या आपल्यापासून दूर राहतात.
फॅटी फिश
चरबीयुक्त मासे जसे की, सॅल्मन, मॅकेरल, आणि सार्डिन यांमधील ओमेगा-3 फॅटी ॲसिडस अधिक प्रमाणात असते ज्याचा किडनीवर चांगला परिणाम होतो. याचे सेवन शरीरात जळजळ कमी करते आणि रक्तदाब नियंत्रणात आणते. यामुळे दीर्घकाळ चालणाऱ्या किडनीच्या आजाराचा (CKD) धोका कमी होतो. फिश लव्हर्स असाल तर आपल्या रोजच्या जीवनात फॅटी फिशचा जरूर समावेश करा.
लाल शिमला मिरची
लाला शिमला मिरची किंवा लाला ढोबळी मिरची एक अशी भाजी आहे ज्याचे सेवन किडनीच्या आरोग्यासाठी भरपूर फायद्याचे ठरते. शाकाहारी खाणाऱ्यांनी आपल्या आहारात लाल शिमला मिरची आवर्जून खावी. यात पोटॅशियम आणि फॉस्फरस असते, जे किडनीच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. लाल शिमला मिरचीमध्ये कॅप्सेसिन आढळते, जे किडनीतील रक्तप्रवाह नियंत्रित करण्यास मदत करते. तुम्ही याची भाजी बनवू शकता किंवा तव्यावर भरून केलेली शिमला मिरची देखील फार चवदार लागते.
किडनीच्या आजाराची लक्षणे :






