शरीरातील गंभीर आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी सद्गुरूंनी सांगितलेल्या 'या' रसाचे नियमित करा सेवन
कायम निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी सद्गुरू सतत काहींना काही उपाय सांगत असतात. नुकतंच त्यांनी निरोगी शरीर डिटॉक्स करण्यासाठी आणि निरोगी आरोग्यासाठी कोहळ्याच्या रसाची सोपी रेसिपी आणि कोहळ्याच्या रसाचे सेवन केल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगितली आहे. कोहळ्याचा रस आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. यामध्ये प्रथिनं , फायबर, जस्त, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस इत्यादी अनेक घटक आढळून येतात. त्यामुळे तुम्ही कोहळ्याच्या भाजीचे किंवा रसाचे नियमित सेवन करू शकता. या भाजीमध्ये अतिशय कमी कॅलरीज असतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर तुम्ही कोहळ्याच्या रसाचे सेवन करू शकता. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर तुम्ही कोहळ्याच्या रसाचे सेवन केल्यास शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघेल. चला तर जाणून घेऊया कोहळ्याच्या रसाचे सेवन केल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे.(फोटो सौजन्य – iStock)
कोहळ्याच्या रसाचे सेवन केल्यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. याशिवाय यामध्ये असलेले घटक शरीरातील ऍसिडिटीचे प्रमाण कमी करतात. पचनसंस्था निरोगी राहण्यासाठी कोहळ्याच्या रसाचे सेवन करावे. गॅस, पोटफुगी, बद्धकोष्ठता आणि आम्लपित्त इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर कोहळ्याच्या रसाचे सेवन करावे.
वाढलेले वजन कमी करताना महिलांसह पुरुष देखील अनेक वेगवेगळ्या पेयांचे सेवन करतात. मात्र कोणत्याही हानिकारक पेयांचे सेवन करण्याऐवजी आहारात कोहळ्याच्या रसाचे सेवन करावे. या रसाच्या सेवनामुळे शरीरावर वाढलेली चरबी झपाट्याने कमी होण्यास मदत होते. यामध्ये कमी कॅलरीज आणि भरपूर फायबर आढळून येतात. कोहळ्याच्या रसाचे सेवन केल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते.
वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती काहीशी कमी होऊन जाते. अशावेळी शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कोहळ्याचा रस अतिशय प्रभावी ठरेल. यामध्ये असलेले विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे आजारांपासून बचाव करण्यासाठी कोहळ्याचा रस प्रभावी आहे.
कोहळ्याचा रस बनवण्यासाठी सर्वप्रथम, कोहळ्याच्या आतील बिया आणि साल काढून बारीक तुकडे करून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात कोहळ्याचे तुकडे आणि पाणी घालून सरबत तयार करा. तयार केलेला रस गाळून त्यात चवीनुसार मीठ टाका. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला कोहळ्याचा रस. या रसाचे नियमित सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील.