
बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी गोवन पद्धतीमध्ये बनवा हिरव्यागार ओव्याच्या पानांची कढी
खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होण्यासाठी जेवणानंतर कायमच सोलकढी प्यायली जाते. कोकणातील प्रत्येक घरात सोलकढी हा पदार्थ आवडीने बनवला जातो. आंबटगोड कोकम आणि खोबऱ्याच्या दुधात बनवलेला पदार्थ चवीसोबत आरोग्यासाठी सुद्धा अतिशय गुणकारी आहे. त्यामुळे चिकन, मासे किंवा कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर तो व्यवस्थित पचन होण्यासाठी सोलकढी बनवावी. पण आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये हिरव्यागार ओव्याच्या पानांची कढी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ओव्याची पाने शरीरासाठी अतिशय पौष्टिक आहेत. ओव्याच्या पानांमध्ये असलेले घटक पचनक्रिया सुधारतात. अपचन, ऍसिडिटी, गॅस इत्यादी सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी ओव्याच्या पानांचे सेवन करावे. ओव्याच्या पानांपासून भजी सुद्धा बनवली जाते. ओव्याच्या पानांच्या सेवनामुळे पचन सुधारते, गॅस, बद्धकोष्ठता, सर्दी-खोकल्यावर आराम मिळतो, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शरीराला थंडावा मिळतो. ओव्याच्या पानांमध्ये असलेले थायमॉल जंतूनाशक सांधेदुखी किंवा जखमा भरण्यासाठी फायदेशीर ठरते. चला तर जाणून घेऊया ओव्याच्या पानांची कढी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)