गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करून 'या' पद्धतीने बनवा सुंदर गुलाबी लिपस्टिक
सर्वच महिला सुंदर दिसण्यासाठी सतत काहींना काही उपाय करत असतात. त्वचेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वेगवेगळे फेसपॅक, फेसमास्क, क्रीम्स इत्यादी अनेक गोष्टी लावल्या जातात. मात्र ओठ किंवा चेहऱ्यावरील इतर अवयवांची जास्त काळजी घेतली जात नाही. उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये ओठ फाटणे किंवा ओठांवरील त्वचा काळी पडणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवल्यानंतर सुद्धा महिला दुर्लक्ष करतात. मात्र ओठांच्या आरोग्याची काळजी घेणे सुद्धा आवश्यक आहे. उन्हाळा वाढल्यानंतर ओठ काळे आणि कोरडे पडून जातात. अशावेळी बाजारात मिळणारे व्हॅसलिन किंवा इतर कोणत्याही गोष्टी लावल्या जातात. यामुळे काहीवेळा ओठ आणखीनच खराब होऊन जातात.(फोटो सौजन्य – iStock)
सुंदर दिसण्यासाठी महिला बाहेर जाताना किंवा ऑफिसला जाताना किंवा इतर वेळी लिपस्टिक लावली जाते. लिपस्टिक लावल्यामुळे ओठ सुंदर आणि उठावदार दिसतात. मात्र कोणत्याही चुकीच्या ब्रॅण्डच्या लिपस्टिक लावल्यामुळे ओठ खराब होण्याची जास्त शक्यते असते. बाजारात उपलब्ध असलेल्या हानिकारक लिपस्टिक लावण्यापेक्षा घरी बनवलेल्या लिपस्टिकचा वापर नियमित करावा. केमिकल युक्त प्रॉडक्ट ओठांचे सौंदर्य कमी करून टाकतात. याशिवाय नारळाचे तेल आणि गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये असलेले गुणधर्म ओठ सुंदर आणि चमकदार करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला गुलाबी ओठांसाठी सोप्या पद्धतीमध्ये लिपस्टिक बनवण्याची कृती सांगणार आहोत. या पद्धतीने तयार केलेली लिपस्टिक ओठांसाठी हानिकारक ठरणार नाही. यामुळे तुमचे ओठ अधिक सुंदर आणि चमकदार दिसतील.
उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घेणार? ऍलर्जी होण्याचे प्रकार आणि कारणे कोणती? जाणून घ्या उपचार