उन्हाळ्यात घामामुळे मान जास्त काळवंडलेली आहे? 'हे' घरगुती उपाय करून त्वचा करा स्वच्छ
राज्यभरात सगळीकडे कडक उन्हाळा वाढला आहे. या वाढत्या उन्हाळ्यात त्वचा आणि आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरातून घामाच्या धारा वाहू लागतात. घामाच्या धारा वाहू लागल्यानंतर काहीवेळा शरीरातील पाण्याची पातळी सुद्धा कमी होऊन जाते. पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर डिहायड्रेशनची समस्या उद्भवते. त्यामुळे नियमित भरपूर पाण्याचे सेवन करावे. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. कडक उन्हाळयात बाहेर फिरून आल्यानंतर त्वचा अधिक काळवंडून जाते. शिवाय घामामुळे शरीराच्या काही भागांमध्ये घाम तसाच साचून राहतो. यामुळे मानेवर खाज येणे, हातांवर खाज येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात.(फोटो सौजन्य – iStock)
उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घेणार? ऍलर्जी होण्याचे प्रकार आणि कारणे कोणती? जाणून घ्या उपचार
घामामुळे त्वचा खराब झाल्यानंतर काहीवेळा मान काळी होऊन जाते. काळवंडलेली मान स्वच्छ करण्यासाठी अनेक महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या क्रीम्स आणि इतर वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून घेतल्या जातात. मात्र काहीवेळा या क्रिम्सचा कोणताही वापर त्वचेसाठी होत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला घामामुळे काळवंडलेली मान स्वच्छ करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे त्वचेमध्ये अनेक बदल दिसून येतील. याशिवाय काळवंडलेली मान स्वच्छ होईल.
काळवंडलेली मान आणि त्वचा स्वच्छ करण्यासाठी कोणताही केमिकल ट्रीटमेंट करण्यापेक्षा घरगुती उपाय करून त्वचा स्वच्छ करावी. याशिवाय वाटीमध्ये लिंबाचा रस आणि बटाट्याचा रस, हळद एकत्र करून मिक्स करून घ्या. त्यानंतर तयार करून घेतलेले मिश्रण मान आणिकाळी झालेल्या त्वचेवर लावून हाताने मसाज करून घ्या. त्यानंतर पाण्याने मान स्वच्छ करून घ्या. हा उपाय नियमित केल्यास मान आणि शरीराच्या इतर भागावरील काळेपणा दूर होईल. लिंबू आणि बटाट्यामध्ये नॅचरल ब्लिचिंग एजंट आढळून येतात.
मागील अनेक वर्षांपासून कोरफडचा रस त्वचा आणि केसांसाठी वापरला जातो. यामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे त्वचा अधिक स्वच्छ आणि उजळदार होते. यासाठी कोरफड कॉफी पावडर वाटीमध्ये घेऊन त्यात बारीक केलेली साखर, कोरफड आणि तांदळाचे पीठ टाकून मिक्स करा. तयार केलेले मिश्रण मान आणि काळवंडलेल्या त्वचेवर लावून हलक्या हाताने मसाज करून घ्या. यामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारेल आणि त्वचा स्वच्छ होईल.हा उपाय नियमित किंवा आठवड्यातून तीनदा केल्यास लवकर फरक दिसून येईल.