Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हाडे बळकट आणि मजबूत होण्यासाठी प्रत्येक महिलेने आहारात करायला हवे ‘या’ पदार्थाचे सेवन, नोट करून घ्या रेसिपी

वय वाढल्यानंतर महिलांच्या शरीरात असंख्य बदल होतात. या बदलांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. शरीरातील सर्व हाडे मजबूत आणि बळकट करण्यासाठी मिक्स भाज्यांचे सूप बनवून प्यावे.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 27, 2026 | 08:00 AM
हाडे बळकट आणि मजबूत होण्यासाठी प्रत्येक महिलेने आहारात करायला हवे 'या' पदार्थाचे सेवन, नोट करून घ्या रेसिपी

हाडे बळकट आणि मजबूत होण्यासाठी प्रत्येक महिलेने आहारात करायला हवे 'या' पदार्थाचे सेवन, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

वय वाढल्यानंतर महिलांच्या शरीरात असंख्य बदल होतात. मासिक पाळी, हार्मोन्सचे संतुलन, मानसिक तणाव, कौटुंबिक जबाबदाऱ्या इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. वयाच्या चाळिशीनंतर महिलांच्या शरीरातील हार्मोन्सची पातळी बिघडून जाते. ज्याचा परिणाम शरीरातील हाडांवर सुद्धा होतो. हाडांची झीज होणे, हाडांमध्ये वाढलेल्या वेदना, चालताना किंवा खाली बसताना गुडघ्यांमध्ये वेदना जाणवणे इत्यादी अनेक लक्षणे दिसून येतात. त्यामुळे हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि हाडे मजबूत करण्यासाठी अभिनेत्री सोहा अली खानने शेअर केलेली रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ तुम्ही कमीत कमी साहित्यात झटपट बनवू शकता. शरीरातील हाडे मजबूत आणि बळकट करण्यासाठी दैनंदिन आहारात विविध पौष्टिक आणि शरीरास आवश्यक असलेल्या पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. दैनंदिन आहारात वेगवेगळ्या पालेभाज्या, फळे, सुका मेवा खाल्ल्यास संपूर्ण शरीराला खूप जास्त फायदे होतील. चला तर जाणून घेऊया सूप बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Ram Navami : राम नवमी निमित्त खास प्रसाद, झटपट घरी तयार करा स्वादिष्ट रव्याचा शिरा

साहित्य:

  • भोपळा
  • काळीमिरी पावडर
  • मीठ
  • शेवग्याच्या शेंगा
  • कांदा
  • आलं लसूण पेस्ट
  • टोमॅटो
  • तूप
  • बडीशेप
  • वेगवेगळ्या पालेभाज्या
  • भिजवलेले मूग
Ram Navami 2026: प्रभू श्रीरामांच्या नैवेद्यासाठी झटपट बनवा ‘केसर पनकम’, उन्हाळ्यासाठी प्रभावी थंडगार पेय

कृती:

  • सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम, कुकरच्या भांड्यात तूप गरम करून घ्या. त्यानंतर त्यात कांदा, लसूण, आलं, लाल भोपळा, दुधी भोपळा, गाजर, शेवगा, टोमॅटो आणि बारीक करून घेतलेल्या पालेभाज्या टाकून मिक्स करा.
  • सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालून चमच्याने मिक्स करा आणि २ वाट्या पाणी घालून कुकरचे झाकण लावून घ्या.
  • कुकरच्या ४ ते ५ शिट्ट्या काढून घ्या. यामुळे भाज्या व्यवस्थित शिजून निघतील. शिजलेल्या सर्व भाज्या थंड करण्यासाठी ठेवा.
  • थंड झाल्यानंतर ब्लेंडरच्या मदतीने भाज्यांची पातळी पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट कुकरच्या भांड्यात किंवा कढईमध्ये ठेवून गरम करण्यासाठी ठेवा.
  • आवश्यकतेनुसार पाणी घालून सूपला उकळी काढून घ्या. उकळी आल्यानंतर त्यात काळीमिरी पावडर आणि बडीशेप, धणे, जिरं पावडर घालून मिक्स करा.
  • सूपला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून सूप पिण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले मिक्स भाज्यांचे सूप.
 

Web Title: To make bones strong and strong every woman should consume this food in her diet note the recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेचा उपवास केल्यानंतर काय खावे आणि काय खाऊ नये? या पद्धतीने घ्या तब्येतीची काळजी
1

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेचा उपवास केल्यानंतर काय खावे आणि काय खाऊ नये? या पद्धतीने घ्या तब्येतीची काळजी

शेफ संजीव कपूर स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट उत्तपम सँडविच, सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी पदार्थ
2

शेफ संजीव कपूर स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट उत्तपम सँडविच, सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी पदार्थ

Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा महाराष्ट्रीयन कढी, गरमागरम भातासोबत लागेल चविष्ट
3

Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा महाराष्ट्रीयन कढी, गरमागरम भातासोबत लागेल चविष्ट

थंडगार वातावरणात सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा गरमागरम मिक्स व्हेज कटलेट, हिरव्या चटणीसोबत लागेल भारी चव
4

थंडगार वातावरणात सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा गरमागरम मिक्स व्हेज कटलेट, हिरव्या चटणीसोबत लागेल भारी चव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.