आतड्यांमधील जळजळ कमी करण्यासाठी दह्यात मिक्स करून खा 'हे' पदार्थ
चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, पाण्याची कमतरता, आहारात सतत होणारे बदल, वाढलेला मानसिक तणाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे आरोग्याची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. शरीरात वाढलेला मानसिक आणि शारीरिक तणाव आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. त्यामुळे दैनंदिन आहारात शरीराला पचन होणाऱ्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. मात्र अनेकदा शरीराची ऊर्जा कमी झाल्यानंतर किंवा आहारात झालेल्या बदलांमुळे पचनसंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. गॅस, अपचन, बद्धकोष्ठता किंवा ऍसिडिटी इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. मानसिक आरोग्य बिघडल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात.(फोटो सौजन्य – iStock)
शरीरात साचून राहिलेले विषारी घटक आरोग्यासाठी अतिशय घातक ठरतात. हे घटक शरीरामध्ये दीर्घकाळ साचून राहिल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. यामुळे आतड्यांचे सुद्धा आरोग्य बिघडते. त्यामुळे बिघडलेली पचनक्रिया आणि आतड्यांचे आरोग्य सुधरण्यासाठी आहारात दह्याचे सेवन करावे. दही खाल्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते. यामध्ये असलेले घटक शरीराला आवश्यक पोषण देतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला आतड्यांच्या निरोगी आरोग्यासाठी दह्यात कोणते पदार्थ मिक्स करून खावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
अनेकांना नेहमीच बाहेरचे तेलकट किंवा तिखट पदार्थ खाण्याची सवय असते. नेहमी नेहमी बाहेरचे जंक फूड खाल्यामुळे शरीराची पचनसंस्था बिघडते आणि पोटासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. बद्धकोष्ठता, गॅस, अपचन, आणि आम्लता इत्यादी समस्या उद्भवू लागल्यानंतर लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करतात. मात्र असे न करता घरगुती उपाय करून आरोग्याची काळजी घ्यावी.
आतड्यांचे कार्य सुधरण्यासाठी दह्यात केळ मिक्स करून खावं. यामुळे शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. केळी आणि दही मिक्स करून खाल्यामुळे पोट स्वच्छ होते आणि आतड्यांसंबंधित कोणतीही समस्या उद्भवत नाही.
खाल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. रोजच्या आहारात दह्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामध्ये असलेले प्रोबायोटिक्सयुक्त गुणधर्म आतड्याना आलेली सूज, पोटात होणारी जळजळ कमी करण्यासाठी प्रभावी ठरतात. मुळव्याधाचा त्रास असलेल्या लोकांनी आहारात दह्याचे सेवन करावे.
शरीरात साचून राहिलेली विषारी घाण बाहेर काढून टाकण्यासाठी सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात लिंबू पिळून त्यामध्ये जिऱ्याची पावडर टाकावी. या पाण्याचे उपाशी पोटी नियमित सेवन केल्यास शरीरातील सर्व घाण स्वच्छ होईल आणि आतड्यांसंबंधित कोणतीही समस्या उद्भवणार नाही. मुळव्याधापासून सुटका मिळवण्यासाठी जिऱ्याच्या पाण्याचे किंवा जिरं घालून बनवलेले ताक प्यावे.