सकाळी उठल्यानंतर २ लिटरपेक्षा जास्त पाणी प्यायल्यास किडनीवर येतो दाब!
निरोगी आरोग्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. पाण्याच्या सेवनामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि पोट स्वच्छ होते. पाण्याचा सर्वच गोष्टींसाठी केला जातो. याशिवाय अनेकांना सकाळी उठल्यानंतर नियमित उपाशी पोटी पाणी पिण्याची सवय असते. उपाशी पोटी पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि शरीर डिटॉक्स होते. पाण्याच्या सेवनामुळे किडनी आणि लिव्हरचे कार्य सुरळीत चालू राहते. किडनी डिटॉक्स करण्यासाठी पाण्यासह नारळ पाणी आणि इतर पेयांचे सेवन करावे. पण सकाळी उठल्यानंतर जास्त पाणी प्यायल्यामुळे किडनीवर दाब येतो, असे अनेकांना वाटते.(फोटो सौजन्य – iStock)
किडनीचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरात साचलेले विषारी घटक लघवी आणि घामावाटे निघून जातात. त्यामुळे दिवसभरात 7 ते 8 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. मूत्रपिंड निरोगी ठेवण्यासाठी पाणी पिणे आवश्यक आहे. पण सकाळी उठल्यानंतर गरजेपेक्षा जास्त पाणी पिणे मूत्रपिंडासाठी धोकादायक ठरू शकते. अनेक लोक सकाळी उठल्यानंतर 2 लिटर पेक्षा जास्त पाण्याचे सेवन करतात. पण अतिपाण्याचे सेवन केल्यामुळे किडनीवर दाब निर्माण होतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला नियमित किती पाण्याचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
डॉ. संजीव सक्सेना (पीएसआरआयचे नेफ्रोलॉजी प्रमुख) यांनी सांगितल्यानुसार, दैनंदिन आहारात जास्त पाण्याचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. पाण्याच्या अतिसेवनामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीराला आवश्यक असलेल्या प्रमाणातच पाण्याचे सेवन करावे. जास्त पाण्याचे सेवन केल्यास मूत्रपिंडावर दाब येतो आणि शरीराचे कार्य बिघडते. मात्र निरोगी आरोग्यासाठी तुम्ही सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी 1 किंवा 2 ग्लास पाण्याचे सेवन करू शकता. या पाण्याच्या सेवनामुळे शरीरात साचलेले विषारी घटक बाहेर पडून जातील. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर अतिपाण्याचे सेवन करू नये.
तुम्हालाही या रंगाचा कफ येतो का? ते कोणत्या आजाराचे संकेत देतात जाणून घ्या….
किडनी शरीरातील रक्त शुद्ध करण्याचे काम करते. याशिवाय किडनीमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्याचे काम किडनी करते. त्यामुळे तुम्ही दिवसभरात ३ लिटर पाणी पिऊ शकता. तासनतास ऑफिसमध्ये बसून काम करणाऱ्या व्यक्तींनी स्वतःच्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. कारण भरपूर पाण्याचे सेवन केल्यास सतत लघवीला जावे लागेल. एसीमध्ये बसून काम करण्याऱ्या लोकांनी ३ लिटर पाण्याचे सेवन करावे.