सतत उलट्या मळमळ होते? महिलांमध्ये हार्ट अटॅक येण्याआधी शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे
निरोगी आरोग्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे, व्यायाम, शारीरिक हालचाली, भरपूर पाण्याचे सेवन इत्यादी अनेक गोष्टी फॉलो करणे आवश्यक आहे. मात्र वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे आणि आहारात होणाऱ्या बदलांमुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. जगभरात हार्ट अटॅकच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल हृदयाच्या आरोग्याला हानी पोहचवते. कारण कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जातात. त्यामुळे हृदयाच्या आरोग्याची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – iStock)
महिलांमध्ये हार्ट अटॅकचा धोका जास्त दिसून येतो. कारण महिला कामाच्या धावपळीमध्ये स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. ज्यामुळे हार्ट अटॅक किंवा आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला महिलांना हार्ट अटॅक येण्याआधी शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
महिला शरीराची जास्त काळजी घेत नाहीत. सतत काम करत राहिल्यामुळे शरीराचे कार्य बिघडते आणि शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे छातीत दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करतात, डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. महिलांना हृदयविकाराचा झटका येण्याआधी जबडा किंवा छातीमध्ये वेदना दिसून येतात. या वेदनांकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते. तर काहीवेळा हार्ट अटॅक येण्याआधी पोटात तीव्र वेदना होऊ शकतात. याशिवाय अन्न विषबाधा, फ्लू किंवा छातीत जळजळ इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागल्यास योग्य ती काळजी घ्यावी.
कामाच्या वाढलेल्या तणावामुळे शरीरात अनेक बदल दिसून येतात. अनेकदा आराम करूनसुद्धा शरीरात थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. छातीत वेदना, अस्वस्थता, जळजळ आणि दाब निर्माण झाल्यासारखे वाटू लागल्यास डॉक्टरांचा सल्ल्या घेऊन योग्य ते औषध उपचार करावे. हार्ट अटॅक येण्याआधी छातीमध्ये होणाऱ्या वेदना या केवळ छातीमध्येच नाही तर संपूर्ण शरीरासाठी धोकादायक ठरतात.