सकाळी जोर लावून सुद्धा पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? मग रात्री झोपण्याआधी करा 'या' बारीक दाण्यांचे सेवन
बद्धकोष्ठता होण्याची कारणे?
ओवा खाण्याचे फायदे?
ऍसिडिटी नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाय?
धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. सतत काम करत राहिल्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होते आणि शरीरात अनेक बदलजाणवू लागतात. सकाळच्या घाईगडबडीमध्ये पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही. पोटात कायमच जडपणा जाणवू लागतो. सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ न झाल्यास संपूर्ण दिवस खराब होऊन जातो. यामुळे शरीरात ऍसिडिटी वाढते. दैनंदिन आहारात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम आरोग्यावर दिसून येतो. पोट स्वच्छ न होण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचन झाल्यानंतर शरीरात अनेक वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. ऍसिडिटी झाल्यानंतर अनेक लोक मेडिकलमधील गोळ्यांचे सेवन करतात. पण सतत गोळ्यांचे सेवन केल्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे घरगुती उपाय करून अपचनाच्या समस्येपासून आराम मिळवावा. आज आम्ही तुम्हाला पोट स्वच्छ होण्यासाठी रात्री झोपताना कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचनाच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी ओवा खावा. प्रत्येक स्वयंपाक घरात ओवा असतोच. ओव्याचे सेवन केल्यामुळे आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाते आणि पोट स्वच्छ होते. रात्री झोपण्याआधी ओव्याचे पाणी प्यायल्यास आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाते. याशिवाय ओव्याच्या पाण्याचे शरीराला अनेक फायदे होतात. ओव्याचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारते. यामध्ये असलेले थायमोल नावाचा गुणकारी घटक शरीरासाठी फायदेशीर आहे. पोटफुगी, गॅस आणि अपचनाची समस्या कमी करण्यासाठी ओव्याचे पाणी फायदेशीर ठरते. जुनाट बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी ओव्याचे पाणी किंवा ओवा चावून खावा.
वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि पोटात साचून राहिलेला गॅस बाहेर काढून टाकण्यासाठी ओव्याचे सेवन करावे. यामुळे मेटाबॉलिझम बूस्ट होते आणि पोटावर जमा झालेला चरबीचा थर कमी होण्यास मदत होते. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित ओव्याचे पाणी प्यायल्यास शरीरात जमा झालेली घाण बाहेर पडून जाईल.
‘या’ फळांचे एकत्र सेवन केल्यास आरोग्यावर होतील विपरीत परिणाम, सकाळच्या नाश्त्यात अजिबात करू नका सेवन
थंडीच्या दिवसांमध्ये काहींना वारंवार सर्दी, खोकला होतो. सतत होणाऱ्या सर्दी खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी ओव्याचे पाणी प्यावे किंवा ओव्याच्या पाण्याची वाफ घ्यावी. ओव्याच्या पाण्याची वाफ घेतल्यामुळे फुफ्फुसांमध्ये जमा झालेला कफ पातळ होऊन बाहेर पडून जातो. दमा असलेल्या रुग्णांसाठी ओव्याचे पाणी फायदेशीर आहे. ओव्याची वाफ घेतल्यास नाक, घशाच्या वेदनांपासून कायमचा आराम मिळेल. ओव्यात असलेले अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म शरीरातील सूज कमी करतात. संधिवात किंवा सांध्यांच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी ओव्याचे पाणी नियमित प्यावे. पण अतिप्रमाणात ओव्याचे सेवन केल्यास शरीराला हानी पोहचू शकतो.
Ans: आतड्यांमध्ये राहणाऱ्या अब्जावधी सूक्ष्मजंतू, बुरशी आणि विषाणूंच्या समुदायाला 'गट मायक्रोबायोम' म्हणतात, ज्यामुळे आतड्यांचे आरोग्य ठरते.
Ans: सफरचंद, बेरी, पालेभाज्या, चणे, मसूर, बिया खा.
Ans: प्रक्रिया केलेले अन्न, जास्त साखर आणि चरबीयुक्त पदार्थ टाळा.






