वाढत्या वयात चेहऱ्यावर आलेल्या एजिंगच्या खुणा कमी करण्यासाठी खोबरेल तेलात मिक्स करून लावा 'हे' पदार्थ
वय वाढल्यानंतर महिलांच्या शरीरात सतत काहींना काही बदल होत असतात. या बदलांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. वय वाढल्यानंतर त्वचेवर मोठ्या प्रमाणात परिणाम दिसून येतात. चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, वांग येणे, त्वचेची गुणवत्ता खराब होणे, त्वचेवर पिंपल्स आणि मुरुमांची समस्या उद्भवू लागणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी अनेक महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या प्रॉडक्टचा वापर करतात. याशिवाय कधी फेशिअल करून घेतले जाते तर कधी वेगवेगळ्या स्किन ट्रीटमेंट करून घेतल्या जातात. मात्र या सगळ्याचा त्वचेवर फारसा परिणाम दिसून येत नाही. यामुळे त्वचा अधिकच खराब आणि निस्तेज होऊन जाते.(फोटो सौजन्य – iStock)
चेहऱ्यावर 2 आठवड्यापर्यंत रोज तांदळाचे पाणी लावल्याने काय होते? डॉक्टरने केला धक्कादायक दावा
चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्यांमुळे त्वचेवर म्हतारपणाची लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे सुरुवातीच्या दिवसांमध्ये अतिशय कमी आणि सामान्य असतात. मात्र कालांतराने चेहऱ्यावर सुरकुत्या वाढू लागतात आणि त्वचा अतिशय निस्तेज आणि काळवंडलेली वाटू लागते. त्वचेमध्ये होणाऱ्या बदलांकडे योग्य लक्ष देणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या आणि एजिंगच्या खुणा कमी करण्यासाठी खोबरेल तेलात कोणते पदार्थ मिक्स करून लावावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांचा वापर केल्यामुळे त्वचा अधिक सुंदर दिसेल.
त्वचेवर आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी खोबरेल तेलात कोरफड जेल मिक्स करा. यामुळे त्वचेवरील सर्व डाग आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होईल.तयार करून घेतलेले मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करून घ्या.यामुळे त्वचेचे रक्तभिसरण सुधारेल आणि त्वचा अधिक चमकदार आणि उठावदार होण्यास मदत होईल. कोरफड जेलमध्ये असलेले गुणधर्म त्वचेवरील डाग घालवण्यासाठी आणि त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करतात.
नैसर्गिक गुणधर्मांनी समृद्ध असलेले खोबरेल तेल आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. यामध्ये असलेले गुणधर्म त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करतात. वाटीमध्ये खोबरेल तेल आणि मध घालून मिक्स करा. त्यानंतर संपूर्ण मिश्रण चेहऱ्यावर लावून हाताने मसाज करा. यामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारेल आणि त्वचेवर आलेल्या सुरकुत्या कमी होऊन जातील.