उन्हामुळे टॅन झालेली त्वचा उजळ्वण्यासाठी स्वयंपाक घरातील 'या' पदार्थांचा करा नियमित वापर
वाढत्या उन्हाळ्यात शरीरासह त्वचेची योग्य काळजी घ्यावी. कारण ऊन वाढल्यानंतर त्वचेमध्ये अनेक बदल दिसू लागतात. या बदलांकडे लक्ष देऊन आरोग्याची काळजी घ्यावी. उन्हाळा वाढल्यानंतर त्वचा काळवंडून जाणे, त्वचा टॅन होणे, पिंपल्स, मुरूम इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर बऱ्याच महिला बाजारात मिळणाऱ्या वेगवेगळ्या क्रिम्सचा वापर करतात. मात्र चुकीचे क्रीम त्वचेवर लावल्यामुळे चेहऱ्यावर आणखीनच मुरूम येऊ लागतात. मुरुमांच्या समस्येने अनेक महिला त्रस्त आहेत. उन्हामुळे टॅन झालेली त्वचा सुधारण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करावा. यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या सुंदर आणि चमकदार दिसू लागते.(फोटो सौजन्य – iStock)
पातळ भुवयांमुळे चेहऱ्याचा लूक खराब होतोय? जाड आणि काळ्या भुवयांसाठी करा हे घरगुती उपाय
उन्हामुळे काळवंडलेली त्वचा सुधरण्यासाठी स्वयंपाक घरातील पदार्थांचा वापर करावा. यामुळे त्वचा अधिककाळ सुंदर राहते. आज आम्ही तुम्हाला उन्हामुळे काळवंडलेली त्वचा सुधारण्यासाठी कोणत्या पदार्थांचा वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांचा वापर त्वचेवरील काळे डाग आणि टॅन स्किन काढून टाकण्यासाठी मदत होईल. स्वयंपाक घरातील पदार्थ त्वचेवर नैसर्गिक ग्लो टिकवून ठेवण्यासाठी मदत करतात.
त्वचेवर वाढलेले टॅनिंग आणि डेड स्किन घालवून टाकण्यासाठी तुम्ही टोमॅटोच्या रसाचा वापर करू शकता. टोमॅटोमध्ये असलेले गुणधर्म त्वचेसाठी अतिशय फायदेशीर ठरतात. यासाठी वाटीमध्ये टोमॅटोचा रस घेऊन त्यात तांदळाचे पीठ, कॉफी आणि चमचाभर दही घालून मिक्स करा. तयार केलेली पेस्ट चेहऱ्यावर लावून काहीवेळ तशीच ठेवा. त्यानंतर पाणी लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचेवरील डेड स्किन निघून जाईल आणि चेहरा उजळदार होईल. टोमॅटोच्या रसात असलेले गुणधर्म त्वचा सुधारण्यासाठी मदत करतात.
घरगुती पदार्थांचा वापर केल्यास त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार होते. यासाठी वाटीमध्ये दह्यामध्ये लिंबू मिक्स करून त्वचेवर मालिश करून घ्या. तयार केलेली पेस्ट चेहऱ्यावर लावा. काहीवेळ झाल्यानंतर हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येईल आणि चेहरा सुंदर होईल. उन्हामुळे काळवंडलेली त्वचा सुधारण्यासाठी त्वचा अधिक सुंदर होईल.
कच्च्या दुधात कॉफी पावडर मिक्स करून चेहऱ्यावर लावून घ्या. त्यानंतर हलक्या हाताने चेहरा मसाज करा. यामुळे त्वचेवर वाढलेली डेड स्किन निघून जाईल आणि चेहरा स्वच्छ होईल. काहीवेळा ठेवून नंतर त्वचा पाण्याने धुवून घ्या. यामुळे तुमची त्वचा गोरीपान आणि सुंदर दिसेल.