उन्हामुळे चेहऱ्यावर झालेले टॅनिंग घालवण्यासाठी महागडे बोटॉक्स न करता घरीच तयार करा फेसस्क्रब
बदलत्या ऋतूनुसार वातावरणात अनेक बदल होऊ लागतात. या बदलांचा परिणाम आरोग्यासह त्वचेवरसुद्धा दिसून येतो. त्यामुळे सर्वच ऋतूंमध्ये आरोग्यासह त्वचेची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचा अतिशय कोरडी आणि निस्तेज होऊन जाते. याशिवाय त्वचेवर वाढलेल्या टॅनिंगमुळे त्वचेवर मेकअप केल्यानंतर सुद्धा त्वचा चांगली दिसत नाही. उन्हाळा वाढल्यानंतर घामाच्या धारांमुळे त्वचा अतिशय तेलकट आणि चिकट होऊन जाते. चेहरा तेलकट किंवा चिकट झाल्यानंतर योग्य वेळी स्वच्छ न केल्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स आणि मोठे मोठे फोड येऊ लागतात. याशिवाय काहीवेळा पिंपल्स, त्वचेचा कोरडेपणा, टॅनिंग आणि पिग्मेंटेशन इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात.(फोटो सौजन्य – iStock)
सद्गुरूंनी सांगितला जादुई उपाय, याच्या वापराने चाळीशीतही दिसाल 20 वर्ष तरुण; आजारही होतील छूमंतर
उन्हाळ्यात त्वचेसंबंधित समस्या वाढू लागल्यानंतर काही महिला दुर्लक्ष करतात. मात्र वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते. त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार केले जातात. मात्र काहीवेळा डॉक्टरांच्या सल्ल्याने केलेले उपचार यशस्वी ठरत नाही. अशावेळी घरगुती उपाय करून त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्याचा प्रयत्न करावा. बाजारात उपलब्ध असलेल्या बोटोक्स, हायड्रा फेशियल इत्यादी ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचा सुधारावी.
कॉफी मास्क तयार करण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये कॉफी पावडर घेऊन त्यात पाणी घालून कॉफी व्यवस्थित उकळवा.
त्यानंतर तयार करून घेतलेली कॉफी गाळून कॉर्न स्टार्च घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
त्यानंतर त्यात कोरफड जेल आणि विटामिन ई कॅप्सूल टाकून जाडसर पेस्ट तयार करा.
सद्गुरूंनी सांगितला जादुई उपाय, याच्या वापराने चाळीशीतही दिसाल 20 वर्ष तरुण; आजारही होतील छूमंतर
तयार करून घेतलेला कॉफी फेसमास्क लावण्याआधी त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर तयार केलेला मास्क संपूर्ण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करून घ्या. त्यानंतर चेहऱ्यावर काहीवेळ फेसमास्क तसाच ठेवा. यामुळे त्वचेवरील डेड स्किन निघून जाईल. त्वचा सुंदर आणि चमकदार होण्यासाठी फेसमास्क लावून चेहरा काहीवेळ ठेवल्यास डेड स्किन पूर्णपणे निघून जाईल.