
आतड्यांमध्ये साचलेली विषारी घाण क्षणार्धात पडून जाईल बाहेर! 'या' पदार्थांचा वापर करून बनवा डिटॉक्स ड्रिंक, वजन होईल कमी
वजन कमी करण्यासाठी उपाय?
डिटॉक्स पेयांचे सेवन करण्याचे फायदे?
आतडे स्वच्छ करण्यासाठी उपाय?
जीवनशैलीत होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, कमी पाण्याचे सेवन, शारीरिक हालचालींचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. बऱ्याचदा दैनंदिन आहारात होणाऱ्या बदलांमुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळत नाही. ज्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर लगेच दिसून येतो. अपचन, लठ्ठपणा, मधुमेह, खराब कोलेस्ट्रॉल इत्यादी गंभीर आजार झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसू लागतात. पण सुरुवातीच्या दिवसांमध्ये दिसून येणाऱ्या बदलांकडे लक्ष दिले जात नाही, कालांतराने आजार वाढतो आणि शरीराचे गंभीर नुकसान होते. आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक वेळीच बाहेर पडून न गेल्यामुळे शरीरात घाण तशीच साचून राहते. यामुळे ऍसिडिटी आणि अपचनाच्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढतात.(फोटो सौजन्य – istock)
Belly Fat: सुटलेले पोट होईल फ्लॅट! जिमचीही गरज नाही, घरीच करा ‘हे’ सोपे व्यायाम
वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक लोक दिवसाची सुरुवात वेगवेगळ्या डिटॉक्स पेयांनी करतात. तर काहींना सतत कोणती ना कोणती सप्लिमेंट्स पिण्याची खूप जास्त सवय असते. शरीरावर वाढलेला चरबीचा अनावश्यक घेर कमी करण्यासाठी कायमच महागड्या डिटॉक्स पेय पिण्याऐवजी घरी बनवलेले नॅचरल हेल्दी ड्रिंक प्यावे. यामुळे आतड्यांमध्ये साचून राहिलेली विषारी घाण सुद्धा बाहेर पडून जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी आणि आतडे डिटॉक्स करण्यासाठी कोणत्या पदार्थांचा वापर करून बनवलेले डिटॉक्स पेय प्यावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
शरीरावर वाढलेला चरबीचा अनावश्यक घेर कमी करण्यासाठी जिरे, बडीशेप आणि धणे एकत्र करून बनवलेले पेय प्यावे. यामुळे आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि शरीर स्वच्छ होण्यास मदत होईल. जिरे, बडीशेप आणि धणे पचनक्रिया सुधारण्यासोबतच पोटात साचून राहिलेला गॅस, पोट फुगणे इत्यादी सर्वच समस्यांपासून आराम मिळेल. प्रत्येक स्वयंपाक घरात मसाले उपलब्ध असतात. त्यामुळे जेवणातील विविध पदार्थ बनवण्यासाठी मसाल्यांचा वापर केला जातो. नियमित डिटॉक्स पेयाचे सेवन केल्यास आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाण्यासोबतच शरीर सुद्धा डिटॉक्स होईल आणि आरोग्य सुधारेल.
मसाल्यांच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. बडीशेपमधील असलेले गुणकारी घटक स्नायू शिथिल करण्यास मदत करतात. जेवणानंतर होणारा गॅस, पोट फुगणे आणि अस्वस्थता कमी करण्यासाठी बडीशेपचे पाणी प्यावे. जिऱ्यामध्ये असलेले पाचक एन्झाईम्स अन्न अधिक कार्यक्षमतेने पचन करण्यास मदत करतात. धण्याचे दाणे सौम्य ऍसिडिटी किंवा अपचनाच्या वाढत्या समस्यांपासून आराम मिळवून देतात. त्यामुळे दैनंदिन आहारात विविध मसाल्यांचा वापर करण्यासोबतच डिटॉक्स पेय सुद्धा बनवून प्यावे. यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात.
पावसाळ्यात नकळत करता का या 5 चुका? पायांपासून वाढू शकतो संसर्गाचा धोका; वेळीच व्हा सावध
एक ग्लास पाणी टोपात गरम करून त्यात जिरे, बडीशेप आणि धणे घालून पाण्याला उकळी काढा. टोपातील पाणी अर्धा होईपर्यंत पाण्याला उकळी काढून घ्या. त्यानंतर गॅस बंद करून पाणी गाळून घ्या. त्यानंतर तयार केलेले पाणी उपाशी पोटी सेवन केल्यास आतड्यांमध्ये जमा घाण बाहेर पडून जाण्यास मदत होईल. वारंवार अपचनाच्या समस्या उद्भवू लागल्यास विविध मसाल्यांपासून बनवलेल्या डिटॉक्स पेयांचे सेवन करावे.
Ans: डिटॉक्स ड्रिंक हे फळे, भाज्या, लिंबू, आले, पुदिना यांसारख्या नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले पेय.
Ans: नाही. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे मुख्य काम यकृत (लिव्हर) आणि मूत्रपिंड (किडनी) करतात. डिटॉक्स ड्रिंक पचन सुधारण्यास, शरीराला हायड्रेट ठेवण्यास आणि फायबरचे सेवन वाढवण्यास मदत करू शकते.
Ans: लिंबू, काकडी, आले, पुदिना, तुळस, सफरचंद, दालचिनी, चिया बिया आणि कोथिंबीर यांचा वापर करून हेल्दी डिटॉक्स ड्रिंक तयार करता येते.