Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hair Care Tips: झाडूसारखे रुक्ष केस होतील मुलायम आणि चमकदार! स्वयंपाक घरातील ‘हे’ पदार्थ केसांसाठी ठरतील वरदान

वातावरणात निर्माण झालेल्या बदलांमुळे केसांची गुणवत्ता खराब होऊन जाते. अशावेळी केसांच्या निरोगी वाढीसाठी आणि चमकदार केसांसाठी कांदा, कोरफड जेल आणि लवंगाचे मिश्रण केसांवर लावावे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 26, 2026 | 05:30 AM
झाडूसारखे रुक्ष केस होतील मुलायम आणि चमकदार! स्वयंपाक घरातील 'हे' पदार्थ केसांसाठी ठरतील वरदान

झाडूसारखे रुक्ष केस होतील मुलायम आणि चमकदार! स्वयंपाक घरातील 'हे' पदार्थ केसांसाठी ठरतील वरदान

Follow Us
Follow Us:

वर्षाच्या बाराही महिने महिलांसह पुरुषांना केसांच्या समस्या उद्भवतात. केस गळणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. पण वय वाढल्यानंतर किंवा तरुण वयात मोठ्या प्रमाणावर केस गळत असतील तर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे फार आवश्यक आहे. अन्यथा केसांमध्ये टक्कल पडू शकते. तसेच वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे केस खूप जास्त निस्तेज आणि झाडूसारखे कोरडे होऊन जातात. कोरडे केस पुन्हा एकदा चमकदार आणि सुंदर करण्यासाठी केराटिन ट्रिटमेंट, रिबॉन्डिंग, स्ट्रेटनिंग यांसारख्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून केसांची चमक वाढवली जाते. पण ट्रीटमेंट केल्यानंतर काही काळापुरतेच केस सुंदर दिसतात आणि पुन्हा एकदा केसांची गुणवत्ता खराब होऊन जाते.(फोटो सौजन्य – istock)

Hair Care: पातळ झालेले केस महिनाभरात होतील घनदाट आणि मजबूत! खोबरेल तेलात मिक्स करा ‘हे’ स्वयंपाक घरातील पदार्थ

केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी कायमच महागडे शाम्पू किंवा कंडिशनरचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. यामुळे केस नैसर्गिकरित्या सॉफ्ट आणि मुलायम होण्यास मदत होते. वारंवार केमिकल युक्त हेअर केअरचा वापर केल्यास केस आणखीनच खराब होऊन जातात. त्यामुळे घरगुती उपाय करावेत. आज आम्ही तुम्हाला केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी स्वयंपाक घरातील कोणत्या पदार्थांचा वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ केस आतून मुलायम करण्यास मदत करतात आणि केसांची नैसर्गिक चमक कायम टिकवून ठेवतात.

साहित्य:

  • लवंग
  • कांदा
  • कोरफड जेल

कृती:

वाटीमध्ये पाणी घेऊन त्यात ३ ते ४ लवंग रात्रभर भिजत ठेवा. त्यानंतर कांद्याची साल काढून मध्यम आकारात तुकडे करा. मिक्सरच्या भांड्यात भिजवलेल्या लवंग आणि कांद्याचे तुकडे घालून पेस्ट तयार करा. तयार केलेल्या पेस्टमध्ये कोरफड जेल घालून व्यवस्थित मिक्स करा. पेस्ट बनवल्यानंतर केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत लावून काहीवेळ तशीच ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करा आणि केस असेच ठेवा. केस स्वच्छ करण्यासाठी सौम्य शाम्पूचा वापर करा. यामुळे केस अतिशय मऊ आणि चमकदार होतील. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा कांद्याचे मिश्रण केसांना लावल्यास केसांची नैसर्गिक चमक वाढेल आणि केस सुंदर होतील.

पावसाळ्यात केसांमध्ये खूप जास्त कोंडा होतो? केसांमधील चिकटपणा घालवण्यासाठी किती वेळा केस स्वच्छ करावे, जाणून घ्या सविस्तर

लवंगमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात, ज्यामुळे टाळूवर वाढलेला कोंडा किंवा इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते. केसांमध्ये खूप जास्त कोंडा झाला असेल तर लवंगाच्या मिश्रणाचा वापर करावा. कांद्याच्या रसात सल्फरचे प्रमाण जास्त असते. सल्फरमुळे केसांना आवश्यक पोषण मिळते आणि केसांची मूळ मजबूत होण्यास मदत होते. कोरफडीचा गर टाळूला हायड्रेट ठेवण्यास मदत करतो. त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा कांद्याच्या मिश्रणापासून बनवलेला हेअर मास्क केसांवर लावावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Transform coarse straw like hair into soft shiny locks these kitchen ingredients will prove to be a boon for your hair

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • hair beauty
  • hair care tips
  • home remedies

संबंधित बातम्या

Hibiscus Flower For Face: काळवंडलेला-निस्तेज चेहरा आठवडाभरात दिसेल तेजस्वी! ‘या’ पद्धतीने तयार करा जास्वदींच्या फुलांचे नॅचरल जेल
1

Hibiscus Flower For Face: काळवंडलेला-निस्तेज चेहरा आठवडाभरात दिसेल तेजस्वी! ‘या’ पद्धतीने तयार करा जास्वदींच्या फुलांचे नॅचरल जेल

Skin Care Tips: त्वचेवर अचानक पिंपल्स येऊन खड्डे पडतात? ‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे चेहऱ्यावर चमक होते कायमची गायब
2

Skin Care Tips: त्वचेवर अचानक पिंपल्स येऊन खड्डे पडतात? ‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे चेहऱ्यावर चमक होते कायमची गायब

Skin Care Tips: सकाळी उठल्यानंतर नियमित प्या Beauty Shot! महिनाभरात त्वचेमध्ये दिसून येतील सकारात्मक बदल, चेहरा होईल उजळदार
3

Skin Care Tips: सकाळी उठल्यानंतर नियमित प्या Beauty Shot! महिनाभरात त्वचेमध्ये दिसून येतील सकारात्मक बदल, चेहरा होईल उजळदार

Hair Care: शॅम्पू करूनही स्कॅल्प तेलकट? मग केस धुताना ‘या’ चुका आजच टाळा; जाणून घ्या योग्य पद्धत
4

Hair Care: शॅम्पू करूनही स्कॅल्प तेलकट? मग केस धुताना ‘या’ चुका आजच टाळा; जाणून घ्या योग्य पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.