छातीमध्ये जमा झालेला कफ करण्यासाठी घरगुती उपाय
वातावरणात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. साथीचे आजार वाढू लागल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. सर्दी, खोकला, ताप, कफ, घसा दुखणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. छातीमध्ये कफ जमा झाल्यानंतर छातीमध्ये दुखणे, घुरघुरण्याचा आवाज येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. व्हायरल किंवा बॅक्टेरियाचे श्वसन संक्रमण झाल्यानंतर छातीमध्ये कफ जमा होण्यास सुरुवात होते. छातीमध्ये जमा झालेल्या कफावर वेळीच औषध उपचार केले नाहीतर आरोग्यासंबंधित गंभीर आजार होण्याची भीती असते. त्यामुळे साथीचे आजार वाढू लागल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. छातीमध्ये जमा झालेल्या कफाचा रंग पांढरा, पिवळा किंवा हिरवा असण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला छातीमध्ये जमा झालेला कफ स्वच्छ करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यास छातीमधील कफ कमी होईल आणि आराम मिळेल.(फोटो सौजन्य-istock)
लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
छातीमध्ये जमा झालेला कफ कमी करण्यासाठी काळीमिरी मधाचे सेवन करावे. यासाठी काळीमिरी पावडर मधात मिक्स करून सेवन करा. हे चाटण दिवसभरातून दोन ते तीन वेळा सेवन केल्यास छातीमध्ये जमा झालेला कफ कमी होईल आणि छातीत दुखणे थांबेल. सर्दी, घसा खवखवणे, सूज आणि कफ इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी काळीमिरी आणि मधाचे सेवन करावे.
आरोग्यासंबंधित अनेक आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी तुळस आणि आल्याच्या चहाचे सेवन करावे. आल्यामध्ये दाहक विरोधी गुणधर्म आढळून येतात. ज्यामुळे घशाच्या समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होईल. तुळशीमध्ये दाहक-विरोधी, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म आढळून येतात, जे आरोग्यासंबंधित सर्वच समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी मदत करतात.
छातीमध्ये जमा झालेला कफ कमी करण्यासाठी लिंबाचा रस आणि मध मिक्स करून चाटण खावे. लिंबाच्या रसात असलेले गुणधर्म शरीरासाठी आवश्यक आहेत. छातीमध्ये आलेली सूज कमी करण्यासाठी या मिश्रणाचे सेवन करावे. यामुळे फुफ्फुसांमधील संसर्ग कमी होण्यास मदत होईल. घशाला सुद्धा आराम मिळेल.
लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
तीव्र खोकला
खोकल्याबरोबर घरघर आवाज येणे
नाक वाहणे
खोकताना छातीत दुखणे
खोकला
खोकल्यातून रक्त येणे.