हिवाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होण्यासोबतच हाडांचे दुखणे वाढू लागते. हाडांचे दुखणे वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. हाडांमध्ये होणारी जळजळ, वेदना कमी करण्यासाठी आहारात बदल करून कॅल्शियम युक्त पदार्थांचे सेवन करावे. ऑस्टियोआर्थराइटिस, संधिवात इत्यादी समस्या वधू लागतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात या पदार्थांचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. आज आम्ही तुम्हाला हाडांच्या दुखण्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात या पदार्थांचे सेवन करावे.(फोटो सौजन्य-istock)
हाडांच्या दुखण्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात या पदार्थांचे सेवन
संधिवात आणि हाडांसंबंधित इतर समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात ओट्स, ब्राऊन राइस यांसारख्या संपूर्ण धान्यांचा आहारात समावेश करावा. यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतील.
विटामिन सी युक्त फळांचे किंवा भाज्यांचे सेवन केल्यास संधिवाताच्या समस्येपासून आराम मिळण्यास मदत होते. संत्रा आणि लिंबू यांसारख्या पदार्थांचा रोजच्या आहारात समावेश करावा.
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं चेरी हे फळं खूपच आवडते. चेरीचा रस प्यायल्यामुळे शरीरात होणारी जळजळ आणि वेदना कमी होण्यास मदत होते.
ऑलिव्ह तेलामध्ये ऑलिओकॅन्थल आढळून येते. याशिवाय दाहक-विरोधी गुणधर्म इबुप्रोफेनसारखे असतात. मोनोसॅच्युरेटेड फॅट्स आणि फिनोलिक गुणधर्मां समृद्ध असलेल्या ऑलिव्ह तेलाचे सेवन केल्यामुळे संधिवाताची समस्या कमी होते.
थंडीच्या दिवसांमध्ये हिरव्या पालेभाज्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. त्यात पालकचे सेवन केल्यास जीवनसत्त्वे, खनिजे, विटामीन ई आणि फ्लेव्होनॉइड्स आणि कॅरोटीनॉइड्स सारखे गुणधर्म आढळून येतात.