Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 2 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

त्वचेसंबंधित समस्यांपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी करून पहा ‘हे’ सोपे उपाय, त्वचा होईल ग्लोइंग

त्वचेसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेक महिला बाजारात उपलब्ध असलेले महागडे प्रॉडक्ट वापरतात. मात्र हे प्रॉडक्ट वापरण्याऐवजी तुम्ही घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घेऊ शकता. त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी सोपे उपाय.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 27, 2025 | 09:38 AM
त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी हे प्रभावी उपाय

त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी हे प्रभावी उपाय

Follow Us
Follow Us:

धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेक महिला स्किन केअर रुटीन फॉलो करण्याचा कंटाळा करतात. मात्र योग्य स्किन केअर रुटीन फॉलो न केल्यामुळे त्वचेला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे नियमित त्वचेची काळजी घेण्यासाठी स्किन केअर रुटीन फॉलो करावे. स्किन रुटीनसोबत आहारात बदल करून त्वचेच्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी. त्वचेचे गुणवत्ता कायम टिकवून ठेवण्यासाठी अनेक महिला बाजारात उपलब्ध असलेले महागडे प्रॉडक्ट वापरतात. मात्र हे महागडे प्रॉडक्ट काहीवेळा त्वचेला सूट न झाल्यामुळे त्वचेची गुणवत्ता आणखीनच खराब होऊन जाते. त्वचेची काळजी घेण्यासाठी केमिकलयुक्त प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करावा.(फोटो सौजन्य – iStock)

लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा

महिलांच्या शरीरात सतत बदल होत असतात. या बदलांचा परिणाम आरोग्यासह त्वचेवर सुद्धा लगेच दिसून येतो. शरीरात होणारे हार्मोनल असंतुलन, मासिक पाळी, मानसिक शारीरिक समस्या इत्यादी गोष्टींचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे महिलांनी आरोग्यासह त्वचेची योग्य काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला त्वचेच्या समस्यांपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी कोणते उपाय करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी हे प्रभावी उपाय:

पपई खाणे आरोग्यासाठी अतिशय चांगले आहे. मात्र मासिक पाळीच्या दिवसांमध्ये पपईचे सेवन करू नये. पपई खाल्यामुळे त्वचेला आवश्यक असलेले विटामिन सी मिळते. याशिवाय शरीरात साचून राहिलेली घाण स्वच्छ होते आणि त्वचा सुधारते. पपईमध्ये जीवनसत्त्व ए, बी आणि सी इत्यादी घटक मुबलक प्रमाणात आढळून येतात. यासाठी दही आणि पपई मिक्स करून मिश्रण तयार करावे. तयार केलेले मिश्रण त्वचेवर लावून 10 ते 15 मिनिटं तसेच ठेवून घ्या. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे त्वचे उजळदार आणि सुंदर होईल.

थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा अधिक निस्तेज आणि काळवंडलेली दिसू लागते. त्वचा काळी झाल्यानंतर ती उजळ्वण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. काही महिला त्वचा उजळ्वण्यासाठी ब्रिटनिंग क्रीमचा वापर करतात. मात्र असे करण्याऐवजी बटाट्याचा रस काढून त्वचेवर आणि डोळ्यांखाली आलेल्या काळ्या वर्तुळांवर लावावा. यामुळे काळवंडलेला भाग स्वच्छ होऊन त्वचा उजळदर दिसते. चेहऱ्यावर आलेली सूज कमी करण्यासाठी तुम्ही बटाट्याच्या रसाचा वापर करू शकता.

लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा

केसांसंबधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. मात्र केमिकल युक्त शँम्पू किंवा इतर प्रॉडक्ट लावण्याऐवजी घरगुती उपाय करून केसांची गुणवत्ता सुधारावी. केस कोरडे किंवा निस्तेज झाल्यास खोबऱ्याचे तेल कोमट करून केसांवर लावून हलक्या हाताने मसाज करावी. यामुळे केस सुंदर आणि घनदाट होतील.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Try these simple remedies to get rid of skin related problems permanently home remedies for glowing skin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2025 | 09:38 AM

Topics:  

  • home remedies

संबंधित बातम्या

पावसाळ्यात फॉलो करा सोपे स्किन केअर रुटीन! नियमित खा ‘हे’ गुणकारी पदार्थ, त्वचेवर टिकून राहील चमक
1

पावसाळ्यात फॉलो करा सोपे स्किन केअर रुटीन! नियमित खा ‘हे’ गुणकारी पदार्थ, त्वचेवर टिकून राहील चमक

हेअर स्पा करण्यासाठी हजारो रुपये खर्च करत असाल तर थांबा! शाम्पूमध्ये मिक्स करा ‘ही’ २ रुपयांची पावडर
2

हेअर स्पा करण्यासाठी हजारो रुपये खर्च करत असाल तर थांबा! शाम्पूमध्ये मिक्स करा ‘ही’ २ रुपयांची पावडर

वयाच्या पन्नशीत चेहऱ्यावर टिकून राहील तारुण्य! स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा फेस सीरम
3

वयाच्या पन्नशीत चेहऱ्यावर टिकून राहील तारुण्य! स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा फेस सीरम

थोडं खाल्ल्यानंतर सुद्धा पोटात जडपणा किंवा गॅस झाल्यासारखे वाटते? दैनंदिन जीवनशैलीतील ‘या’ सवयींमुळे वाढतो अपचनाचा त्रास
4

थोडं खाल्ल्यानंतर सुद्धा पोटात जडपणा किंवा गॅस झाल्यासारखे वाटते? दैनंदिन जीवनशैलीतील ‘या’ सवयींमुळे वाढतो अपचनाचा त्रास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.