जपानी लोक चमकदार आणि सुंदर त्वचेसाठी नियमित करतात 'या' सीक्रेट पेयाचे सेवन
सर्वच महिलांना चमकदार आणि सुंदर त्वचा हवी असते. त्वचेची गुणवत्ता कायम टिकवून ठेवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पेयांचे, पदार्थांचे सेवन केले जाते. मात्र तरीसुद्धा त्वचेवर हवी तशी चमक दिसून येत नाही. वातावरणात सतत होणारे बदल, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, तणाव इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यासह त्वचेवर सुद्धा दिसून येतो. त्यामुळे दैनंदिन आहारात शरीराला पचन होईल अशा पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे.थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर अनेक महिला बाजारात उपलब्ध असलेले महागडे प्रॉडक्ट लावतात. मात्र तरीसुद्धा त्वचेवर कोणताच परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे महागडे स्किन केअर प्रॉडक्ट वापरण्याऐवजी घरगुती पदार्थांचे योग्य पद्धतीने सेवन केल्यास चेहऱ्यावर सकारात्मक बदल दिसून येतील.(फोटो सौजन्य – iStock)
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
जपानी आणि कोरियन महिलांची चमकदार आणि सुंदर त्वचा सगळ्यांचं खूप आवडते. भारतासह जगभरात सगळीकडे जपानी महिलांच्या त्वचेचे विशेष कौतूक केले जाते. जपानी महिला त्वचेची गुणवत्ता कायम टिकवून ठेवण्यासाठी सीक्रेट वॉटरचे सेवन करतात. आज आम्ही तुम्हाला जपानी महिलांप्रमाणे सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी कोणत्या सीक्रेट वॉटरचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
जपानी महिला सुंदर आणि गोऱ्यापान त्वचेसाठी लिंबू पाण्याचे सेवन करतात. लिंबू पाणी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय गुणकारी पेय आहे. आल्याच्या पाण्यामध्ये जिंजरोल नावाचे तत्व आढळून येते. ज्यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. शिवाय शरीर निरोगी राहते. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक स्वच्छ करण्यासाठी आहारात लिंबू पाण्याचे सेवन केले जाते. लिंबामध्ये मुबलक प्रमाणात विटामिन सी आढळून येते, ज्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. लिंबू आणि आल्याचे एकत्र सेवन केल्यामुळे आरोग्यासह त्वचेला अनेक फायदे होतात.
बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी दैनंदिन आहारात लिंबू पाण्याचे सेवन करावे. लिंबू पाण्यात आलं मिक्स करून प्यायल्यास शरीर स्वच्छ होईल आणि शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जाण्यास मदत होईल. आलं आणि लिंबूमध्ये अॅंटी-इन्फ्लामेटरी गुणधर्म आढळून येतात. ज्यामुळे त्वचा आणि आरोग्यासंबंधित अनेक समस्या बऱ्या होतात.
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात प्रोटीन शेक किंवा इतर कोणत्याही पदार्थांचे सेवन करण्याऐवजी लिंबू पाण्याचे सेवन करावे. उपाशी या पाण्याचे सेवन केल्यास शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाईल. तसेच अतिरिक्त चरबी कमी होईल. आल्याच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे लवकर भूक लागत नाही आणि पोट दीर्घकाळ भरलेले राहते.