Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diabetes: कॅन्सर रुग्णांनो सावधान! अनियंत्रित डायबिटिजमुळे शस्त्रक्रियेनंतर वाढतो संसर्गाचा धोका; डॉक्टरांचा महत्त्वाचा इशारा

Uncontrolled Diabetes Increases Cancer Surgery Infection : कर्करोगाच्या रुग्णांना मधुमेह असल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनियंत्रित डायबेटिसमुळे शस्त्रक्रियेनंतर संसर्गाचा धोका वाढू शकतो आणि जखम भरून येण्यास विलंब होऊ शकतो, असा डॉक्टरांनी इशारा दिला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 16, 2026 | 05:16 PM
Diabetes Increases Cancer Surgery Infection

Diabetes Increases Cancer Surgery Infection

Follow Us
Follow Us:
  • कॅन्सरच्या शस्त्रक्रियेपूर्वी रक्तातील साखर तपासा
  • अनियंत्रित डायबेटिसमुळे वाढतो संसर्गाचा धोका
  • डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला
Diabetes: कर्करोगाचे निदान झालेल्या रुग्णांसाठी शस्त्रक्रिया हा उपचारांचा एक महत्त्वाचा भाग असतो. मात्र, अशा रुग्णाला मधुमेह देखील असल्यास शस्त्रक्रियेनंतर अधिक काळजी घेणे आवश्यक असते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात नसल्यास शस्त्रक्रियेनंतर संसर्ग होण्याचा धोका वाढतो, जखम भरून येण्यास विलंब होतो आणि काही गुंतागुंत निर्माण होऊ शकते. यामुळे रुग्णाला रुग्णालयात अधिक दिवस राहावे लागू शकते.

 

जागतिक मधुमेह दिनानिमित्त डॉक्टरांनी कर्करोगावरील उपचारांपूर्वी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. यामुळे शस्त्रक्रिया अधिक सुरक्षित होण्यास आणि रुग्णाची लवकर रिकव्हरी होण्यास मदत होऊ शकते. मधुमेहामुळे शरीरातील रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. तसेच शरीराची नैसर्गिकरित्या जखम भरून काढण्याची क्षमताही कमी होऊ शकते.

Protein Side Effects: जास्त प्रोटीन म्हणजे जास्त ताकद? हेल्दी डाएटचा किडनीवर होतोय परिणाम? अति सेवनाचे दुष्परिणाम जाणून घ्या

मुंबईतील एसएसओ रूग्णालयातील हेड अँड नेक कॅन्सर डॉ. अमित चक्रवर्ती म्हणाले, “रक्तातील साखरेची पातळी दीर्घकाळ जास्त राहिल्यास शरीरातील रक्ताभिसरणावर परिणाम होतो. तसेच संसर्गाशी लढण्याची शरीराची क्षमता कमी होते आणि शरीरातील खराब झालेल्या पेशी व ऊतींची दुरुस्ती होण्याची प्रक्रिया मंदावते. कर्करोगाच्या शस्त्रक्रियेनंतर या कारणांमुळे जखमेशी संबंधित गुंतागुंत होण्याची शक्यता वाढते. यामध्ये जखमेला संसर्ग होणे, शस्त्रक्रियेनंतरची जखम भरून येण्यास विलंब होणे आणि काही वेळा अतिरिक्त वैद्यकीय उपचारांची गरज भासणे यांचा समावेश होतो.”

डॉ. अमित पुढे म्हणाले, “त्यामुळे कर्करोगावरील उपचार सुरू करण्यापूर्वी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे हा शस्त्रक्रियेच्या तयारीचा महत्त्वाचा भाग आहे. मधुमेह किती नियंत्रणात आहे, हे समजून घेण्यासाठी रुग्णांनी रक्तातील साखरेची तपासणी तसेच HbA1c चाचणी करून घेणे आवश्यक आहे. तपासणीच्या निष्कर्षांनुसार डॉक्टर मधुमेहाची औषधे, इन्सुलिनचे डोस, आहाराचे नियोजन आणि रक्तातील साखरेची तपासणी किती वेळा करावी यामध्ये आवश्यक बदल करू शकतात.

रक्तातील साखरेचे योग्य व्यवस्थापन गरजेचे

शस्त्रक्रियेपूर्वी आणि शस्त्रक्रियेनंतर रक्तातील साखरेचे योग्य व्यवस्थापन केल्यास गुंतागुंत होण्याचा धोका कमी होण्यास आणि रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होते. मात्र, रक्तातील साखरेची पातळी अगदी योग्य होईपर्यंत कर्करोगावरील उपचार विनाकारण पुढे ढकलू नयेत. रुग्णाच्या परिस्थितीनुसार उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या टीमने योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे आहे.

याशिवाय, रुग्णांनी आपल्या वैद्यकीय इतिहासाची संपूर्ण माहिती शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांना देणे आवश्यक आहे. रुग्णाला किती वर्षांपासून मधुमेह आहे, अलीकडील रक्तातील साखरेची पातळी किती आहे, HbA1c चाचणीचे निष्कर्ष काय आहेत, कोणती औषधे सुरू आहेत, इन्सुलिन घेतले जाते का, तसेच मधुमेहामुळे किडनीचे आजार, नसांचे नुकसान, हृदयविकार किंवा जखम भरून येण्यास होणारा विलंब अशा काही समस्या आहेत का, याची माहिती डॉक्टरांना द्यावी. यापूर्वी शस्त्रक्रियेनंतर संसर्ग झाला असल्यास किंवा कोणत्याही औषधाची ॲलर्जी असल्यास त्याबद्दलही डॉक्टरांना सांगावे. तसेच सध्या सुरू असलेल्या इतर औषधांची माहिती देणेही महत्त्वाचे आहे.”

अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील एंडोक्रिनोलॉजिस्ट डॉ.भाविक सगलानी म्हणाले, “शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णांनी स्वतःहून मधुमेहाची औषधे बंद करू नयेत किंवा त्यांचे डोस बदलू नयेत. शस्त्रक्रियेच्या वेळी औषधांमध्ये कोणते बदल करायचे, किती वेळ उपाशी राहायचे आणि रक्तातील साखरेची तपासणी कशी करायची, याबाबत उपचार करणारी डॉक्टरांची टीम योग्य सूचना देते.

शस्त्रक्रियेनंतर काही लक्षणांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. जखमेभोवती वाढणारा लालसरपणा, सूज, जखमेतून असामान्य द्रव बाहेर येणे, ताप येणे, वेदना वाढणे किंवा जखम भरून येण्यास विलंब होणे ही धोक्याची लक्षणे असू शकतात. अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांना कळवावे. यामुळे सुरुवातीच्या टप्प्यातील गुंतागुंत गंभीर होण्यापासून रोखता येऊ शकते. शस्त्रक्रियेपूर्वी योग्य तयारी, डॉक्टरांशी नियमित संवाद आणि रक्तातील साखरेची वेळोवेळी तपासणी केल्यास शस्त्रक्रियेची सुरक्षितता आणि रुग्णाची रिकव्हरी अधिक चांगली होण्यास मदत होते.”

Diabetes: वारंवार तहान, थकवा अन् भूक लागतेय! शरीरातील ‘या’ बदलांकडे दुर्लक्ष नको; असू शकतो मधुमेहाचा धोका

💡

Frequently Asked Questions

  • Que: डायबेटिसचा कॅन्सर शस्त्रक्रियेवर काय परिणाम होतो?

    Ans: रक्तातील साखर नियंत्रणात नसल्यास शस्त्रक्रियेनंतर संसर्ग आणि इतर धोका वाढू शकतो.

  • Que: कॅन्सर शस्त्रक्रियेपूर्वी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे का महत्त्वाचे आहे?

    Ans: यामुळे संसर्गाचा धोका कमी होण्यास आणि जखम लवकर भरून येण्यास मदत होते.

  • Que: मधुमेह नियंत्रणात आहे की नाही हे कसे तपासावे?

    Ans: रक्तातील साखरेची तपासणी आणि HbA1c चाचणीद्वारे मधुमेहाचे नियंत्रण तपासता येते.

Web Title: Uncontrolled diabetes increases cancer surgery infection risk pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 05:15 PM

Topics:  

  • Cancer prevention
  • cancer risks
  • diabetes
  • world diabetes day

संबंधित बातम्या

Diabetes: गोड खात नाही, तरीही शुगर लेव्हल वाढतेय? डायबिटीज कंट्रोलसाठी रोजच्या ‘या’  चुका टाळा
1

Diabetes: गोड खात नाही, तरीही शुगर लेव्हल वाढतेय? डायबिटीज कंट्रोलसाठी रोजच्या ‘या’ चुका टाळा

World Diabetes Day: रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘हे’ पदार्थ ठरतील उपयुक्त, अन्यथा वाढेल मधुमेह
2

World Diabetes Day: रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘हे’ पदार्थ ठरतील उपयुक्त, अन्यथा वाढेल मधुमेह

Blood Sugar Control: रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी सकाळी चालावे की रात्री, तज्ज्ञांचा खुलासा
3

Blood Sugar Control: रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी सकाळी चालावे की रात्री, तज्ज्ञांचा खुलासा

World Diabetes Day 2026: मुलांनाही होऊ शकतो मधुमेह, सुरूवातीच्या ७ लक्षणांकडे दुर्लक्ष करणं बेतू शकतं जीवावर
4

World Diabetes Day 2026: मुलांनाही होऊ शकतो मधुमेह, सुरूवातीच्या ७ लक्षणांकडे दुर्लक्ष करणं बेतू शकतं जीवावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.