रक्तात साचलेल्या Uric acid मुळे सांध्यांमध्ये जळजळ होते? मग आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन
हल्ली लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं अंग दुखणे, हातापायांमध्ये मुंग्या येणे, कंबर दुखणे, हाडांमधून कटकट आवाज येणे, संधिवात इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागल्या आहेत. रक्तात वाढलेल्या युरिक अॅसिडच्या पातळीमुळे सांध्यांमध्ये वेदना होतात आणि बोटांमध्ये किंवा पायांमध्ये गाऊट तयार होतात. गाऊट झाल्यानंतर हाडांमध्ये अतिशय तीव्र वेदना होतात. याशिवाय शरीरसंबंधित अनेक गंभीर आजारांची लागण होण्याची शक्यता असते. चुकीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, तेलकट पदार्थ, जास्त मांसाहार, कमी पाणी पाण्याचे सेवन, व्यायामाचा अभाव, मानसिक तणाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीराची काळजी घेणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)
शरीरात युरिक अॅसिडची पातळी वाढल्यानंतर हाडांमध्ये असह्य वेदना वाढू लागतात. शरीरात प्युरिनची पातळी वाढल्यानंतर युरिक अॅसिड जमा होण्यास सुरुवात होते. हे युरिक अॅसिड बाहेर पडून न गेल्यामुळे हातापायांच्या बोटांना सूज येते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रक्तात वाढलेले युरिक अॅसिड कमी करण्यासाठी कोणत्या भाज्या आणि फळांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि तुम्ही कायमच फ्रेश राहाल.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर काकडी उपलब्ध असतात. काकडीचे सेवन केल्यामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होते आणि आरोग्य सुधारते. काकडीमध्ये असलेल्या पाण्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक लघवीवाटे बाहेर पडून जातात आणि आरोग्य सुधारते. यामध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे सांध्यांमध्ये वाढलेली सूज कमी होते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. त्यामुळे जेवणाच्या वेळी काकडी सॅलड किंवा काकडी रायता खावा.
जेवणातील सर्वच पदार्थ बनवण्यासाठी टोमॅटोचा वापर केला जातो. आंबट गोड चवीचे टोमॅटो आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. यामध्ये असलेले अल्कलायझिंग गुणधर्म शरीराला पोषण देतात. याशिवाय विटामिन सी आणि लायकोपीनमुळे शरीराला आलेली सूज कमी होते. युरिक अॅसिडची पातळी वाढल्यानंतर टोमॅटो सूप किंवा कच्चे टोमॅटो चावून खावा.
पुलाव, बिर्याणी इत्यादी अनेक वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी शिमला मिरची वापरली जाते. शिमला मिरचीपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. यामध्ये विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात, ज्यामुळे सांध्यांमध्ये वाढलेली सूज कमी होऊन आराम मिळतो. गाऊट आणि संधिवाताच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी शिमला मिरची खावी.
रोजच्या आहारात नियमित एक तरी पालेभाजी खावी. पालेभाज्या खाल्ल्यामुळे आरोग्य सुधारते आणि शरीराला अनेक फायदे होतात. शरीरात निर्माण झालेली हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढण्यासाठी पालक स्मूदी किंवा पालक सूपचे नियमित सेवन करावे. यासोबतच तुम्ही कारली, गाजर इत्यादी भाज्यांचे आहारात सेवन करू शकता.
युरिक ऍसिड म्हणजे काय?
युरिक ऍसिड हे शरीरात तयार होणारे ‘प्युरिन’ या पदार्थांच्या विघटनातून तयार होणारे एक टाकाऊ रसायन आहे. हे सामान्यतः किडनीद्वारे शरीराबाहेर टाकले जाते.
उच्च युरिक ऍसिडची कारणे काय आहेत?
प्युरिन जास्त असलेले पदार्थ खाणे, जसे की रेड मीट, काही सीफूड, अल्कोहोल आणि फ्रुक्टोज-युक्त पेये. जास्त वजन असणे, लठ्ठपणा आणि पुरेसे पाणी न पिणे. गाउट किंवा किडनी स्टोन यांसारख्या समस्यांमुळे युरिक ऍसिडची पातळी वाढू शकते.
उच्च युरिक ऍसिडवर नियंत्रण कसे मिळवावे?
प्युरिनचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ (रेड मीट, सीफूड, काही मद्य) टाळा किंवा कमी करा. टोमॅटो, लिंबू, संत्री, पेरू आणि आवळा यांसारख्या व्हिटॅमिन सी असलेल्या फळांचा आहारात समावेश करा