हिवाळ्यात थंड पाण्याची अंघोळ करणे शरीरासाठी योग्य की अयोग्य?
राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे पावसाचा जोर कमी झाला आहे. राज्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूर देखील आला होता. मात्र आता पाऊस ओसरून थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. हलकीशी थंडी सगळीकडे जाणवू लागली आहे. थंडीच्या दिवसांमध्ये अनेकांना अंघोळ करण्याचा खूप जास्त कंटाळा येतो. अशावेळी गरम पाण्याची अंघोळ केल्यास हलकासा उबदारपणा जाणवू लागतो. पण काहींना वर्षाच्या बाराही महिने थंड पाण्याची अंघोळ करण्याची सवय असते. पाऊस असो वा थंडी सर्वच ऋतूंमध्ये थंड पाणी अंगावर घेतले जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यात थंड पाण्याची अंघोळ करणे योग्य की अयोग्य? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. दैनंदिन जीवनात फॉलो केलेल्या चुकीच्या सवयी शरीराचे गंभीर नुकसान करतात. त्यामुळे थंड पाण्याची अंघोळ करताना खूप जास्त विचार करावा.(फोटो सौजन्य – istock)
उभं राहिल्यानंतर अचानक डोळ्यांसमोर अंधार येऊन चक्कर का येते? जाणून घ्या यामागील कारण आणि घरगुती उपाय
आपल्यातील अनेकांना वर्षाच्या बाराही ऋतूंमध्ये थंड पाण्याने अंघोळ करण्याची सवय असते. ही सवय शरीरासाठी लाभदायी ठरते. थंड पाण्याची अंघोळ केल्यामुळे शरीराचे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते. याशिवाय अनेक लोक आइस बाथ सुद्धा घेतात. आइस बाथ घेतल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. शरीरात वाढलेला मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते.याशिवाय शरीराला आराम मिळून स्नायू रिलॅक्स होण्यास मदत होते. त्यामुळे महिन्यातून एकदा तरी आइस बाथ घ्यावा. मानसिक तणावापासून सुटका मिळवण्यासाठी आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी थंड पाण्याने अंघोळ करावी.
थंड पाण्याने नियमित अंघोळ केल्यास शरीराचे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते. याशिवाय रक्तप्रवाहात कोणतेही अडथळे निर्माण होत नाहीत. केसांच्या निरोगी आरोग्यासाठी थंड पाणी अतिशय गुणकारी आहे. गरम पाण्याने केस धुतल्यास केसांमधील नैसर्गिक ओलावा कमी होऊन जातो, ज्यामुळे केस अतिशय निस्तेज आणि कोरडे होतात. त्यामुळे केस धुवण्यासाठी गरम पाण्याचा वापर अजिबात करू नये. थंड पाण्याने केस स्वच्छ करावेत. थंड पाण्याची अंघोळ केल्यामुळे एंडॉर्फिन हार्मोन रिलीज होतात, ज्याचे शरीराला असंख्य फायदे आहेत.
थंड पाण्याने अंघोळ केल्यानंतर काहींना लगेच सर्दी, खोकला किंवा ताप येतो. त्यामुळे थंड पाण्याची अंघोळ करताना शरीराची काळजी घ्यावी. हृदयविकार किंवा उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी चुकूनही थंड पाण्याची अंघोळ करू नये. यामुळे रक्तदाब आणखीनच वाढून हृदय आणि मेंदूला हानी पोहचण्याची शक्यता असते. अचानक कोणत्याही वेळी थंड पाण्याची अंघोळ केल्यास शरीराला शॉक बसू शकतो, ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्याला हानी पोहचू शकते.
हिवाळ्यात अंघोळीसाठी महत्त्वाच्या टिप्स:
खूप गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेतील नैसर्गिक सीबम (तेलाचा थर) निघून जातो, ज्यामुळे त्वचा कोरडी आणि संवेदनशील होते. आंघोळ झाल्यावर लगेच त्वचेवर मॉइश्चरायझर लावा. यामुळे त्वचेतील आर्द्रता टिकून राहते आणि कोरडेपणा कमी होतो.
सर्दी-खोकल्याची लक्षणे कोणती?
थंडी वाजून ताप येणे, घाम येणे, खोकला, डोकेदुखी, स्नायू दुखणे, भूक न लागणे आणि थकवा.नाक वाहणे, घसा दुखणे, ताप, खोकला, डोकेदुखी आणि अंगदुखी.
हिवाळ्यात आहारात काय खावे?
मेथी, चवळी, मोहरीची पालेभाजी यांचा आहारात समावेश करा, यामुळे शरीराला उष्णता मिळते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. योग्य वेळी पेरू खाल्ल्याने सर्दी-खोकला टाळता येतो, परंतु चुकीच्या वेळी खाल्ल्याने आजारी पडू शकता.