शरीरावर वाढलेली सूज कमी करण्यासाठी नियमित करा 'या' पेयांचे सेवन, नेहा धुपियाने सांगितला प्रभावी आणि सोपा उपाय
धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. यामुळे काहीवेळा वजन वाढणे, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब इत्यादी अनेक आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू लागतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करून आरोग्याची काळजी घेतली जाते. मात्र कालांतराने पुन्हा एकदा आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू लागतात. धावपळीच्या जीवनशैलीमुळे काहीवेळा शरीरात थकवा, अशक्तपणा, वजन वाढणे इत्यादी अनेक लक्षणे शरीरात दिसून येतात. चुकीचा डाएट प्लॅन फॉलो केल्यामुळे शरीराचे वजन कमी होण्याऐवजी आणखीनच वाढू लागते. त्यामुळे कायमच हेल्दी आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. शरीरावर वाढलेली अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी आणि शरीराला आलेली सूज कमी करण्यासाठी नैसर्गिक पेयांचे सेवन करावे. बॉलिवूड अभिनेत्री नेहा धूपिया यांनी कायमच फिट आणि हेल्दी राहिल्यासाठी नैसर्गिक एंटी-इंफ्लेमेटरी ड्रिंक बनवण्याची सोपी रेसिपी शेअर केली आहे. या ड्रिंकच्या सेवनामुळे शरीराला आलेली सूज कमी होण्यासोबतच थकवा, अशक्तपणापासून सुटका मिळेल आणि शरीरात ऊर्जा टिकून राहील.(फोटो सौजन्य – istock)
अँटी-इंफ्लेमेटरी ड्रिंक तयार करण्यासाठी कच्ची हळद, ताजे आले, ५–७ काळ्या मिरीचे दाणे आणि एक चमच कलौंजीचा वापर करून हेल्दी ड्रिंक तयार होईल. हेल्दी ड्रिंक बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात काळीमीरीचे दाणे, कलौंजी आणि थोडस पाणी घालून बारीक वाटून घ्या. त्यानंतर तयार केलेले मिश्रण आईस ट्रेमध्ये भरून ठेवा. एक ग्लास कोमट पाण्यात एमसीटी ऑइल किंवा नारळ तेल, घी किंवा ऑलिव्ह ऑइल टाकून तयार केलेला आईस क्यूब टाका. या ड्रिंकच्या २१ दिवस सेवन केल्यास शरीरात अनेक बदल दिसून येतात. अँटी-इंफ्लेमेटरी ड्रिंकचे नियमित सेवन केल्यास पचनक्रिया सुधारते, वजन नियंत्रणात राहते, त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो.
शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात काळीमीरीचे दाणे, कलौंजीचे सेवन केल्यास आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाण्यास मदत होते. याशिवाय पोट आणि संपूर्ण शरीर डिटॉक्स होते. गट हेल्थ सुधारण्यासाठी काळीमिरी पावडर अतिशय गुणकारी ठरते. याशिवाय हेल्दी ड्रिंक बनवताना तुम्ही त्यात लिंबाचा रस, ओवा किंवा आलं घालू शकता. यामुळे शरीराला असंख्य फायदे होतील. आरोग्यवर्धक गुणकारी पेयांचे सेवन केल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि शरीरातील घाण बाहेर पडून जाते.
उभं राहिल्यानंतर अचानक डोळ्यांसमोर अंधार येऊन चक्कर का येते? जाणून घ्या यामागील कारण आणि घरगुती उपाय
वजन कमी करण्यासाठी काय करावे?
तुमच्या शरीराला आवश्यक असलेल्या कॅलरीजपेक्षा कमी कॅलरीजचे सेवन करा. कमी कॅलरीज असल्या तरी त्या पौष्टिक पदार्थांमधून येत आहेत याची खात्री करा.
वजन कधी मोजावे?
आठवड्यातून एकदा वजन करणे योग्य असते, जेणेकरून तुम्हाला साप्ताहिक बदल दिसू शकतील. वजन मोजण्यासाठी सकाळची वेळ सर्वोत्तम मानली जाते, जेव्हा पोट रिकामे असते.
आदर्श वजन कसे ठरवावे?
वय आणि उंचीनुसार व्यक्तीचा बीएमआय तपासावा. निरोगी बीएमआय साधारणपणे १८.५ ते २४.९ दरम्यान असतो. निरोगी वजन वाढवण्यासाठी ऊर्जेचे सेवन योग्यरीत्या वाढवणे आवश्यक आहे.