घरगुती फेसवॉश बनवण्याची कृती:
उन्हाळ्यात धूळ, मातीमुळे खराब झालेली त्वचा स्वच्छ करण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या प्रॉडक्टचा वापर करतात, कधी महागडे फेसवॉश आणून लावले जातात तर काहीवेळा वेगवेगळ्या क्रीमचा वापर केला जातो. केमिकल युक्त क्रीम किंवा इतर प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे त्वचेचे नुकसान होण्याची जास्त शक्यता असते. दिवसभर काम करून घरी आल्यानंतर सगळ्यात आधी फ्रेश होऊन महिला स्किन केअर रुटीन फॉलो करतात. स्किन केअर करताना सगळ्यात आधी त्वचा पाण्याने स्वच्छ केली जाते. त्यानंतर त्वचेला सूट होणाऱ्या प्रॉडक्टचा वापर केला जातो. मात्र काहीवेळा त्वचेला सूट न होणारे फेसवॉश किंवा इतर कोणत्याही क्रीम लावल्यामुळे त्वचा अतिशय नितेज आणि कोरडी होऊन जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला खराब झालेली त्वचा स्वच्छ करण्यासाठी कोणत्या घरगुती पदार्थांचा वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
घरगुती पदार्थांचा वापर करून बनवलेला फेसवॉश त्वचेसाठी अतिशय उत्तम आहे. यामध्ये असलेले गुणकारी घटक त्वचेवर नैसर्गिक चमक कायम टिकवून ठेवतात. त्वचा अधिक उजळदार आणि सुंदर करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या क्रीम किंवा कोणत्याही फेसवॉशचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थानी बनवलेल्या फेसवॉशचा वापर करावा. यासाठी वाटीमध्ये बेसन घेऊन त्यात दही मिक्स करा. तयार करून घेतलेले मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार होईल.
निस्तेज आणि अस्वच्छ त्वचा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही कच्च्या दुधाचा वापर करू शकता. कच्च्या दुधात असलेले गुणधर्म त्वचेवरील घाण स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. यामुळे त्वचेवरील हरवलेली चमक वाढण्यास मदत होते. कच्च्या दुधाचा वापर तुम्ही नैसर्गिक क्लींजर म्हणूनसुद्धा करू शकता. कच्चे दूध सकाळ आणि संध्याकाळ चेहऱ्यावर लावून त्वचा स्वच्छ केल्यास चेहरा अतिशय सुंदर दिसेल.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचा अतिशय कोरडी आणि निस्तेज होऊन जाते. याशिवाय त्वचेवर अनेक पिंपल्स किंवा फोड येऊ लागतात. अशावेळी त्वचा स्वच्छ करण्यासाठी काकडीच्या रसात दही मिक्स करून त्वचेवर लावल्यास चेहरा उजळदार आणि स्वच्छ होईल . यामुळे चेहऱ्याची हरवलेली गुणवत्ता पुन्हा परत येईल.