चेहरा पुन्हा नव्या सारखा सुंदर करण्यासाठी महागडा फेशिअल करण्यापेक्षा ५० रुपयांमध्ये करा चेहरा सुंदर
सुंदर त्वचेसाठी महिला सतत काहींना काही करत असतात. प्रत्येक महिन्याला पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून घेतल्या जातात. फेशिअल, वॅक्सिंग, आयब्रो, क्लीनअप इत्यादी अनेक गोष्टी करून घेतल्या जातात. मात्र बऱ्याचदा संवेदनशील त्वचा किंवा अतितेलकट त्वचेवर कोणत्याही क्रीम्स किंवा फेशिअल सूट होत नाहीत. त्यामुळे चेहऱ्यावर लाल डाग, फोड, मुरूम किंवा त्वचेसंबंधित इतरही समस्या उद्भवण्याची शक्यता असते. याशिवाय बाजारात त्वचा सुंदर आणि चमकदार करण्यासाठी वेगवेगळ्या ट्रीटमेंट उपलब्ध झाल्या आहेत. या ट्रीटमेंट केल्यानंतर त्वचा अतिशय सुंदर आणि उठावदार दिसते. त्वचेवरील हरवलेले तारुण्य पुन्हा परत येते.(फोटो सौजन्य – iStock)
बोटोक्स फेशिअल, हायड्र फेशिअल इत्यादी अनेक फेशिअलचे नवनवीन प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. हायड्रा फेशिअल केल्यानंतर त्वचा अतिशय चमकदार आणि सुंदर दिसते. त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी हायड्रा फेशिअल करून घेतले जाते. मात्र नेहमीच एवढ्या महाग ट्रीटमेंट करणे शक्यत होत नाही. अशावेळी तुम्ही 50 रुपयांमध्ये घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये फेशिअल करून घेऊ शकता. वारंवार फेशिअल करून घेतल्यामुळे त्वचेची गुणवत्ता खराब होऊ लागते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सुंदर त्वचेसाठी काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्स फॉलो केल्यास त्वचा अतिशय सुंदर राहील.
त्वचा स्वच्छ करण्यासाठी फेस क्लिन्सरचा वापर करावा. यामुळे त्वचेची गुणवत्ता सुधारून डेड स्किन निघून जाईल आणि चेहरा फ्रेश दिसू लागेल. क्लिन्सरचा वापर केल्यामुळे त्वचेवरील सर्व घाण स्वच्छ होते आणि चेहरा उठावदार सुंदर दिसू लागतो. यासाठी वाटीमध्ये एक चमचा मध, दूध आणि ग्लिसरीन टाकून मिक्स करून घ्या. त्यानंतर तयार करून घेतलेले मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ करून घ्या.यामुळे चेहऱ्यावर साचून राहिलेले अतिरिक्त तेल कमी होईल आणि चेहरा सुंदर दिसू लागेल.
सर्वच महिलांना नेहमीच सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असते. हायड्रा फेशिअल केल्यामुळे त्वचेवर चमक येते. मात्र ही चमक तुम्ही घरगुती उपाय करूनसुद्धा मिळवू शकता. यासाठी टोमॅटोच्या रसात कॉफी पावडर घालून मिक्स करून घ्या. त्यानंतर केलेले मिश्रण मान आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करून घ्या. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. हा उपाय नियमित केल्यास चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन कायमची निघून जाईल.
ओठ फाटून ओठांमधून सतत रक्त येतं? जाणून घ्या उन्हाळ्यात ओठ फाटण्याची कारणे आणि घरगुती उपाय
बाजारातील महागड्या स्क्रब क्रीम विकत घेण्यापेक्षा घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये स्क्रब तयार करा. यासाठी नारळाच्या तेलात साखर मिक्स करून मिश्रण तयार करा. त्यानंतर तयार करून घेतलेले मिश्रण चेहऱ्यावर लावून हातानी मसाज करा. यामुळे तुमची त्वचा अतिशय सुंदर आणि उठावदार दिसू लागेल. त्वचेवर जमा झालेली घाण आणि पिंपल्स निघून जातील.