हातापायांवरील केस काढण्यासाठी कॉफी पावडरचा वापर करून घरीच करा वॅक्सिंग
शरीर कायम सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी अंगाला बॉडी मास्क लावला जातो तर कधी वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून घेतल्या जातात. याशिवाय हात, पाय आणि शरीरावर वाढलेले अनावश्यक केस काढून टाकण्यासाठी वॅक्सिंग केले जाते. वॅक्सिंग करून शरीरावरील केस काढले जातात. वॅक्सिंग सोबतच अनेक महिला थ्रेडिंग आणि शेव्हिंग इत्यादी पर्याय निवडतात. मात्र काहीवेळा या ट्रीटमेंटमुळे त्वचेचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे बाजारातील कोणत्याही ट्रीटमेंट करताना योग्य खात्री करूनच ट्रीटमेंट करून घ्याव्यात.(फोटो सौजन्य – iStock)
ओठ फाटून ओठांमधून सतत रक्त येतं? जाणून घ्या उन्हाळ्यात ओठ फाटण्याची कारणे आणि घरगुती उपाय
केस काढून टाकण्यासाठी बाजारात अनेक वेगवेगळ्या ट्रीटमेंट केल्या जातात. त्यामध्ये रेझर, स्ट्रीप किंवा हॉट वॅक्स इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. मात्र काहीवेळा या ट्रीटमेंटसाठी खूप जास्त पैसे मोजावे लागतात. वॅक्सिंग करताना अनेक वेदना होऊ लागतात. या वेदनांमुळे काहीवेळा त्वचेचे नुकसान होण्याची जास्त शक्यता असते. सॉफ्ट- हार्ड वॅक्स, फ्रुट वॅक्स, चॉकलेट वॅक्स, शुगर वॅक्स इत्यादी अनेक वॅक्सचे वेगवेगळे प्रकार आहेत. वॅक्स केल्यामुळे त्वचेवर जळजळ होऊ लागते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरावर वाढलेले अनावश्यक केस काढून टाकण्यासाठी कॉफी पावडरचा वापर कशा पद्धतीने करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.