Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यात केसगळती थांबवण्यासाठी ‘या’ औषधी तेलाचा करा वापर, जाणून घ्या केसांना तेल लावण्याची सोपी पद्धत

पावसाळ्यात दिवसांमध्ये केस गळतीची समस्या वाढू लागते. या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी एरंडेलक तेलात कढीपत्ता, मेथी दाणे आणि कांद्याचा रस मिक्स करून लावल्यास केस अतिशय मजबूत होतील.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 29, 2025 | 02:30 PM
पावसाळ्यात वाढलेली केसगळती थांबवेल 'हे' औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेले तेल

पावसाळ्यात वाढलेली केसगळती थांबवेल 'हे' औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेले तेल

Follow Us
Follow Us:

वर्षाच्या बाराही महिने महिलांसह पुरुषांचे सुद्धा केस गळतात. केस गळणे किंवा केसांमध्ये कोंडा इत्यादी अनेक समस्या दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर महिला बाजारातील वेगवेगळ्या हेअर केअर प्रॉडक्टचा वापर करतात. कोणत्याही हेअर केअर क्रीम किंवा सीरम लावण्याआधी ते केसांना व्यवथित सूट होईल की नाही याची योग्य ती खात्री करून घ्यावी. बाजारात उपलब्ध असलेल्या हेअर केअर प्रॉडक्टमध्ये हानिकारक केमिकलयुक्त पदार्थांचा वापर केला जातो. मात्र यामुळे केस चांगले होण्याऐवजी आणखीनच खराब आणि निस्तेज होऊन जातात. केसांच्या मुळांना पोषण देण्यासाठी महिला नेहमीच हेअरपॅक किंवा वेगवेगळे प्रॉडक्ट वापरतात.(फोटो सौजन्य – istock)

नियमित करा ‘या’ लाल फळाच्या रसाचे सेवन! केसांच्या वाढीसाठी ठरेल वरदान, कायमच दिसतील सुंदर केस

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये केस गळणे, केसांमध्ये कोंडा होणे किंवा टाळूवरील इन्फेक्शन वाढण्याची जास्त शक्यता असते. कारण पावसाचे पाणी केसांमध्ये गेल्यानंतर केस ओले राहतात आणि कोंडा वाढतो. कोंडा झाल्यानंतर केस गळू लागतात. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये केसांची जास्त घ्यावी. पावसाळ्यात केस गळतीच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी एरंडेल तेलाचा वापर करावा. केसांच्या निरोगी वाढीसाठी केमिकल प्रॉडक्ट वापरण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करावा. एरंडेल तेल केसांच्या मुळांना पोषण देते, ज्यामुळे केस मजबूत आणि चमकदार होतात. पावसाळ्यात वाढलेली केस गळती थांबवण्यासाठी एरंडेल तेलाचा वापर करावा.

वातावरणातील आर्द्रतेचा पाणी केसांवर लगेच दिसून येतो. ज्यामुळे केस मोठ्या प्रमाणावर गळतात. केस गळती थांबवण्यासाठी एरंडेल तेलात कांद्याचा रस. मेथी दाणे आणि कढीपत्त्याची पाने मिक्स करून तेल तयार करावे. तयार केलेले तेल हलकेसे गरम झाल्यानंतर केसांच्या मुळांना लावून हलक्या हाताने मसाज करून घ्यावा. रात्री झोपण्याआधी नियमित तेलाचा वापर केल्यास महिनाभरात चांगला फरक दिसून येईल. रात्रभर तेल केसांमध्ये व्यवस्थित मुरल्यानंतर सकाळी उठून शँम्पूने केस स्वच्छ करून घ्यावे.

Anti-Aging Treatment: अँटी एजींग ट्रिटमेंटसाठी पाच कोटींचा खर्च; पण पुढे जे झालं ते…..

केसांसाठी एरंडेल तेल वापरण्याचे फायदे:

केसांच्या मुळांना वरून पोषण देण्यासोबतच आतून पोषण देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. यामुळे केसांची मूळ मजबूत होतात. तसेच एरंडेल तेलाचा वापर केल्यामुळे केसांच्या मुळांना खोलवर पोषण मिळते आणि केस गळत सुद्धा नाहीत. मागील अनेक वर्षांपासून केसांच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कांद्याच्या रसाचा वापर केला जात आहे. मेथीचे दाणे केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी करतात आणि केसांवरील नैसर्गिक चमक वाढवतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Use this medicated oil to stop hair loss during monsoons know the easy way to apply oil on hair

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2025 | 02:30 PM

Topics:  

  • hair care tips
  • hair fall reason
  • home remedies

संबंधित बातम्या

महागड्या Anti-Aging क्रिम लावण्यापेक्षा स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा करा वापर, सुरकुत्या- काळे डाग होतील कायमचे गायब
1

महागड्या Anti-Aging क्रिम लावण्यापेक्षा स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा करा वापर, सुरकुत्या- काळे डाग होतील कायमचे गायब

घनदाट आणि मजबूत केसांसाठी भारतीय राण्या वापरायच्या ‘हे’ प्राचीन आयुर्वेदिक हेअर मास्क, जाणून घ्या निरोगी केसांचे रहस्य
2

घनदाट आणि मजबूत केसांसाठी भारतीय राण्या वापरायच्या ‘हे’ प्राचीन आयुर्वेदिक हेअर मास्क, जाणून घ्या निरोगी केसांचे रहस्य

केस विंचरताना खूप जास्त गुंता होतो? मग खोबरेल तेलात मिक्स करा ‘ही’ हिरवी पाने, केस गळती थांबून झपाट्याने होईल वाढ
3

केस विंचरताना खूप जास्त गुंता होतो? मग खोबरेल तेलात मिक्स करा ‘ही’ हिरवी पाने, केस गळती थांबून झपाट्याने होईल वाढ

ओठांवरील त्वचा काळी आणि निस्तेज झाली आहे? मग ‘हा’ घरगुती उपाय केल्यास ओठ होतील गुलाबी, ८ दिवसांमध्ये दिसेल बदल
4

ओठांवरील त्वचा काळी आणि निस्तेज झाली आहे? मग ‘हा’ घरगुती उपाय केल्यास ओठ होतील गुलाबी, ८ दिवसांमध्ये दिसेल बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.