Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali Tips: पुरुषांनो! यंदाच्या दिवाळीत फ्रेश दिसण्यासाठी वापरा तज्ज्ञांची ‘ही’ खास टीप, दिसाल क्लासी आणि Handsome

दिवाळीत केवळ महिलांनीच का बरं सुंदर दिसावं? पुरुषांनाही सुंदर आणि क्लासी दिसण्याचा हक्क आहे आणि या दिवाळीत पुरुषांनी याची काळजी कशी घ्यावी यासाठी काही सोप्या टिप्स तज्ज्ञांकडून जाणून घेऊ

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 14, 2025 | 01:27 PM
पुरुषांसाठी खास टिप्स, दिवाळीत कसे दिसाल सुंदर (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

पुरुषांसाठी खास टिप्स, दिवाळीत कसे दिसाल सुंदर (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • या दिवाळीत पुरुषांनीही दिसा सुंदर 
  • सोप्या आणि साध्या टिप्स 
  • पुरुषांनी कशी घ्यावी स्वतःची काळजी 

दिवाळी म्हणजे आप्तेष्टांना हक्काने भेटण्याचा काळ. या पाच दिवसांच्या उत्साहात मोठमोठ्या पार्ट्यांचे आयोजन केले जाते. सामाजिक भेटीगाठी घडतात. कौटुंबिक सभारंभ ते सणांच्या उत्सवांचा सण म्हणजे दिवाळीचा सण. दिवाळीच्या सणवारीत नवनव्या पोषाखांसह आकर्षक स्टाईल, रुबाबदारपणा अगदी दिमाखाने मिरवता येतो. पाच दिवसांच्या या उत्सवात दीर्घकाळ ताजेतवाने राहणेही आवश्यक असते. 

या दिवसांत ज्या पुरुषांना आत्मविश्वासापूर्वक उत्साहाने सुगंधित राहायचे असेल त्यांच्यासाठी ही सविस्तर आणि सोप्पी मार्गदर्शिका देत आहोत. या मार्गदर्शिकेच्या मदतीने आधुनिक ग्रुमिंग उत्पादने आणि सुगंधित उत्पादने वापरण्याच्या टीप देत आहोत. दिवसभर उत्साही आणि सुगंधित राहण्यासाठी या टीप तुम्हांला मदत करतील. डॉ. रीना शेख, जागतिक प्रमुख, रिसर्च एण्ड डेव्हलपमेंट फॉर प्रीमियम पर्सनल केअर, गोदरेड कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड यांनी काही सोप्या टिप्स दिल्या असून उपयोग करून घ्या. 

आंघोळीने दिवसाची सुरुवात करा

साबण किवा शॉवर जेलने सकाळी आंघोळ करा. साबणात किंवा शॉवर जेलमध्ये लिंबू तसेच लिंबुयुक्त घटकांचा समावेश असलेले घटक असूदेत. पुदिना, पॅचोलीसारखे उत्साहवर्धक सुगंधही चालतील. या सुगंधीयुक्त घटकांच्या मदतीने त्वचेवरील घाम निघून जातो. शरीर टवटवीत होते. शरीराला ताजेपणा येतो. शरीरातील घाम निघून गेल्याने आकर्षक सुगंध येतो. हा सुगंध दिर्घकाळ टिकतो. शरीर स्वच्छ केल्यानंतर डोक्यावरील टाळू स्वच्छ धुवा. हायड्रेटिंग शॅम्पू वापरुन टाळू व्यवस्थित धुवा. सणासुदीच्या वातावरणात दमटपणा असतो. लोकांची सतत भेट होत असल्याने घाम साचू शकतो. 

तज्ज्ञांचा सल्ला – काही दिवस थंडपणा देणारे बॉडी वॉश वापरा. इतर दिवशी त्वचा साफ करणारे स्क्रब वापरुन पाहा. या दोन्ही पद्धतींचा अवलंब केल्यास तुमची त्वचा स्वच्छ राहते. सणासुदीत तासनतास उत्सव साजरा करताना शरीराला घाम येतो. शरीराची दुर्गंधी दूर करण्यासाठी या दोन्ही टीप महत्त्वाच्या ठरतात. 

Diwali 2025: दिवाळीपूर्वी घरामध्ये साफसफाई करताना या गोष्टी दिसण्याचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या

सुगंधी द्रव्यांचा वापर करा

शरीर दीर्घकाळ टवटवीत राहावे यासाठी सुगंधी द्रव्ये लावण्याची पद्धत लक्षात घ्यावी. आंघोळीनंतर त्वचेला पूरक असा बॉडी मिस्ट किंवा डिओडोरंट लावून घ्यावा. ही सुगंधी द्रव्ये हाताच्या मनगटाला, कोपराच्या आतील भागांत तसेच मानेवर लावून घ्या. या भागांवर उष्णता उत्सर्जित होत असते. या भागांवर सुगंधी द्रव्ये लावल्याने सुगंध दरवळू लागतो. हा सुगंध जास्त काळ टिकतो. 

तज्ज्ञांचा सल्ला – शरीरावर अत्तर किंवा कोलोन लावल्यावर लगेचच चोळू नये. यामुळे सुगंधाचे वरचे नाजूक थर तुटतात. फक्त हलका स्प्रे मारा. अत्तर किंवा कोलोनमधील सुगंधी द्रव्ये हवेत आपोआप सुकतात. सुगंधाची रचना जपली जाते. सुगंध जास्त काळ टिकतो. 

निवडक सुगंधी द्रव्यांची खरेदी करा

सणवारांमध्ये सुगंधी द्रव्यांची निवड विचारपूर्वक करा. हलक्या सुवासांचे आणि उत्साहपूर्वक वातावरण निर्मितीला साजेशी सुगंधी द्रव्ये निवडा. सुगंधी द्रव्ये निवडताना त्यात लिंबूवर्गीय तसेच सुगंधी फुलांचे घटक आहेत हे तपासा. दिर्घकाळ टिकाणा-या पार्क अव्हेन्यू व्हॉयेज डिओटरंट स्प्रेचा वापर करा. पार्क अव्हेन्यू व्हॉईज डिओडरंट स्प्रेचा सुगंध फार तीव्र नसतो. हा सुगंध दीर्घकाळ दरवळतो. दिवाळी पार्टी, कार्ड खेळताना तसेच सणासुदीच्या जेवणसभारंभात हा डिओडरंट स्प्रे उत्तम ठरतो. जड किंवा तीव्र सुगंधी अत्तरांचा वापर टाळा. या अत्तरांच्या तीव्र वासामुळे नजीकची माणसे अस्वस्थ होतात. 

तज्ज्ञांचा सल्ला – तुम्हांला आकर्षक दरवळणारा सुगंध हवा असेल तर शरीरावर बॉडी मिस्टर लावल्यावर खास टीप वापरा. बॉडी मिस्टर लावल्यानंतर हलक सुगंध असलेले कोणतेही केसांचे उत्पादन लावा. आंघोळीचा साबण, डिओडरंट, बॉडी मिस्ट तसेच केसांचा शॅम्पू लावल्याने अनेक सुगंधी थर शरीरावर एकत्र येतात. या थरांचा आकर्षक आणि सुगंधित वास सगळीकडे दरवळतो. 

स्वतःचे ग्रुमिंग कीट राखा

दिवाळी आणि इतर कार्यक्रमांच्या धामधुमीतही ताजेतवाने राहण्यासाठी एक छोटीसी ग्रुमिंग कीट स्वतःसोबत ठेवा. तुमच्या बॅगेमध्ये किंवा गाडीत छोट्या आकाराचा साबण, वाईप्स, रोन ऑन डिओडरंट, छोटी बॉडी मिस्ट किंवा परफ्यूम असू द्या. या किटमुळे तुम्हांला दोन कार्यक्रमांदरम्यान किंवा डान्य केल्यानंतर लगेच टप करण्यासाठी ग्रुमिंग कीट वापरता येईल. यामुळे पुन्हा फ्रेश लुक येतो. आजकाल अनेक आधुनिक किट्समध्ये मॅट-फिनिश फेशियल वाईप्स आणि स्कॅल्प स्प्रेदेखील मिळतात. या फेशियल वाईप्स आणि स्कॅल्प स्प्रेमुळे घामावर नियंत्रण मिळवता येते. चेह-यावरील अतिरिक्त तेल पुसता येते. 

तज्ज्ञांचा सल्ला – दिवाळी किंवा सणवारीतील उत्साही नृत्यानंतर शरीरावरील घाम पुसण्यासाठी तुमच्याजवळ ब्लॉटिंग पेपर्स किंवा छोटा टॉवेल ठेवा. घाम पुसल्यानंतर जास्तीत जास्त फ्रेशनेससाठी बॉडी मिस्ट किंवा डिओडरंट लावा. शक्यतो बॉडी मिस्ट किंवा डिओडंरंट गळा किंवा छातीवर लावा.   

Diwali 2025: दिवाळीला घराची सजावट करण्यासाठी वापरा या भन्नाट आयडिया

पुरेसा सकस आहार आणि पाणी प्या

सणासुदीच्या दमट वातावरणात शरीराला पुरेसे पाणी मिळणे गरजेचे असते. काही ठराविक काळानंतर पाण्याचे सेवन करत राहा. घराबाहेर पडण्यापूर्वी फळ, सुकामेवा किंवा दही आदी हलका आहार घ्या. शरीरीत पाण्याचे संतुलित प्रमाण ,पोषक आहाराचे सेवन झाल्यास शरीरातील तापमान नियंत्रित राहते.परिणामी फारसा घाम येत नाही. थकवा निघून जातो. 

तज्ज्ञांचा सल्ला – पाण्याच्या बाटलीत लिंबूचा किंवा पुदिन्याचा रस मिसळा. लिंबू आणि पुदीन्याची चव जीभेचा लागताच शरीरातील इंद्रिये ताजीतजवानी होतात. पाण्याचे सेवन करणेही सोयीस्कर होते. पाण्याऐवजी ताजा रस पोटात गेल्याने ताजेतवाने होता येते. 

शर्ट, स्कार्फ आणि दागिन्यांवर हलका स्प्रे मारा

समारंभाला तयार होताना शर्ट, स्कार्फ तसेच दागिन्यांवर हलका स्प्रे मारा. कपड्यांवर स्प्रे मारताना थोडी काळजी घ्या. कपड्यांवर स्प्रे थेट मारु नका. स्प्रे थोड्या अंतरावरुन कपड्यांवर मारा. कपड्यांपासून काहीसे अंत दूर राखत स्प्रे मारल्याने मंद सुगंध दरवळतो. केशरचनेसाठी तेलकट नसलेला हेअर सीरम वापरावा. हलक्या होल्डचा पोमेड वापरणे कधीही सोयीस्कर. दाढी-मिशीसाठी सुवासिक दाढीचे तेल वापरावे. 

तज्ज्ञांचा सल्ला – घड्याळ किंवा धातूचे ब्रेसलेट घालण्यापूर्वी मनगटाच्या आतल्या भागावर सुगंधी द्रव्ये शिंपडा. धातूच्या उष्णतेमुळे सुगंध फार काळ टिकतो. हा एक सोप्पा आणि प्रभावी मार्ग आहे. ही टीप फायदेशीर ठरते. 

दिवाळीच्या सणासुदीत पुरुषांच्या दमदार व्यक्तिमत्त्वात ताजेतवाने राहणे गरजेचे ठरते. याकरिता योग्य उत्पादनांची निवड करायला हवी. यासाठी काही टीप्सही वापरता येईल. प्रत्येक दिवाळी पार्टीत उत्तम दिसण्यासाठी योग्य सुगंधी द्रव्ये निवडा. शॉवर जेल, मिस्ट्स, डिओडरंट तसेच ग्रुमिंग किट्स यांचा वापर करा. दिवाळी हा सण ऊर्जा, आनंद यांचा सुरेश मिलाफ असतो. आप्तस्वकीयांच्या एकत्रित येण्याने प्रत्येक क्षण अधिक आत्मविश्वासाने जगता यावा याकरिता आकर्षक व्यक्तिमत्त्वाकडे लक्ष द्या.

Web Title: Use this special tip from experts to look fresh this diwali you will look classy and handsome tips for men

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2025 | 01:27 PM

Topics:  

  • Diwali
  • fashion tips
  • lifestyle news
  • skin care tips

संबंधित बातम्या

दिवाळीनिमित्त खरेदी करा सुंदर आणि आकर्षक डिझाईनच्या मीनाकारी बांगड्या! हातांची वाढेल शोभा
1

दिवाळीनिमित्त खरेदी करा सुंदर आणि आकर्षक डिझाईनच्या मीनाकारी बांगड्या! हातांची वाढेल शोभा

जया किशोरी त्वचा कायमच हायड्रेट ठेवण्यासाठी चेहऱ्यावर लावतात ‘हा’ ब्युटी स्प्रे, दीर्घकाळ दिसाल तरुण
2

जया किशोरी त्वचा कायमच हायड्रेट ठेवण्यासाठी चेहऱ्यावर लावतात ‘हा’ ब्युटी स्प्रे, दीर्घकाळ दिसाल तरुण

मनीष मल्होत्राच्या पार्टीत नीता अंबानींचा रॉयल लुक! १५ कोटीच्या बॅगने वेधले साऱ्यांचे लक्ष
3

मनीष मल्होत्राच्या पार्टीत नीता अंबानींचा रॉयल लुक! १५ कोटीच्या बॅगने वेधले साऱ्यांचे लक्ष

अनारसे बनवताना चुका होतात? ‘या’ सोप्या टिप्स फॉलो करून बनवा हलके- कुरकुरीत जाळीदार अनारसे, नोट करून घ्या पारंपरिक रेसिपी
4

अनारसे बनवताना चुका होतात? ‘या’ सोप्या टिप्स फॉलो करून बनवा हलके- कुरकुरीत जाळीदार अनारसे, नोट करून घ्या पारंपरिक रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.