फोटो सौजन्य- pinterest
दिवाळीचा सण जवळ येत आहे. त्यासाठी सर्वच घरामध्ये साफसफाईची लगबग सुरु झालेली आहे. दरवर्षी कार्तिक महिन्याच्या अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते. देशभरात दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. दिवाळीला देवी लक्ष्मी आणि गणपती बाप्पाची देखील पूजा केली जाते. यावेळी दिवाळीची सुरुवात सोमवार, 20 ऑक्टोबरपासून होत आहे.
धार्मिक मान्यतेनुसार, देवी लक्ष्मी स्वच्छ ठिकाणी राहते. या काळात दिवाळीच्या आधी आणि दिवाळीमध्ये स्वच्छता करण्याला खूप महत्त्व आहे. दिवाळीत काही वस्तू पाहणे खूप शुभ मानले जाते, अशी धार्मिक मान्यता आहे. जर तुम्हाला साफसफाईदरम्यान या वस्तू दिसण्याचा अर्थ म्हणजे देवीचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर आहे आणि तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे असा होतो. साफसफाई करताना कोणत्या गोष्टी दिसण्याचा काय आहे अर्थ जाणून घ्या
लाल कापड खूप शुभ मानले जाते. घराची स्वच्छता करताना लाल कापड मिळणे खूप शुभ मानले जाते. घर स्वच्छ करताना लाल कापड शोधणे कुटुंबातील सदस्यांसाठी शुभ काळ दर्शवते.
दिवाळीआधी घराची स्वच्छता करताना मोरपंख दिसण्याचा अर्थ म्हणजे लक्ष्मी आणि भगवान विष्णून यांचा घरातील कुटुंबातील सदस्यांवर आशीर्वाद आहे असा त्याचा अर्थ होतो. तसेच आर्थिक समस्या लवकरच दूर होतील, असा देखील त्याचा अर्थ होतो.
दिवाळीसाठी घराची स्वच्छता करताना शंख किंवा कौडी शंख सापडणे खूप शुभ मानले जाते. हे दिसण्याचा अर्थ असा होतो की, तुम्हाला भविष्यात आर्थिक फायदा होणार आहे. कौडी शंख सापडणे म्हणजे तुम्हाला आयुष्यात संपत्ती मिळणार आहे, असा देखील त्याचा अर्थ होतो.
दिवाळीआधी घरात साफसफाई करताना घरामध्ये कुठेही पैसे दिसणे शुभ मानले जाते. म्हणजेच जुन्या कपड्यांच्या खिशात किंवा जुन्या पर्समध्ये पैसे सापडणे खूप शुभ मानले जाते. हे देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचे लक्षण मानले जाते.
घराची साफसफाई करताना तांदळाचे दाणे सापडणे खूप शुभ मानले जाते. याचा अर्थ जीवनामध्ये आर्थिक लाभ होणार असल्याचे दर्शवते. तसेच शुक्र ग्रहाचे देखील ते प्रतीक दर्शविते. जे तुमच्या घरात आनंद आणि समृद्धी आणते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)