फोटो सौजन्य- pinterest
दिवाळी उजेड आणि आनंदाचा पवित्र असा सण आहे. दिवाळीच्या काळामध्ये घर सजवण्यासाठी आपल्याला मिळतो. यंदा दिवाळीची सुरुवात 20 ऑक्टोबरपासून होत आहे. दिवाळी सुरू होण्यापूर्वी सर्वजण घराची साफसफाई करून घरामध्ये सजावट करतात. या सजावटी दरम्यान फुल, रांगोळी आणि रंगीबेरंगी दिवे इत्यादी गोष्टींची घरात सजावट केली जाते. यामुळे घरामध्ये आनंद आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. जाणून घ्या दिवाळीच्या सजावटीसाठी सुंदर कल्पना
घराचा मुख्यप्रवेशद्वार, खिडकी आणि बाल्कनीमध्ये दिवे आणि एलईडी लाईट्स लावावे. यासाठी तुम्ही रंगीबेरंगी दिवे देखील वापरू शकता.
ताज्या फुलांच्या माळा बनवून त्या दरवाजाच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ आणि देव्हाऱ्याजवळ लावाव्यात.
यासाठी तुम्ही सणांसाठी उपलब्ध असलेले लाइट्स, फेयरी लाइट्स आणि स्ट्रिंग लाइट्स या गोष्टींचा समावेश करू शकता. या गोष्टी तुम्ही लिविंग रूम, बाल्कनी आणि इतर वेगवेगळ्या ठिकाणी लावू शकता.
दिवाळीला घरामध्ये प्रत्येक ठिकाणी दिवा लावावा. यासाठी तुम्ही घरामध्ये मातीचे दिवे, कॅलेंडर स्टॅन्ड आणि एलईडी दिव्यांनी घराचे दरवाजे, हॉल आणि खिडकीवर ठेवू शकता.
दिवाळीला रांगोळी बनवण्यासाठी तुम्ही तांदळाचे पीठ, फुलांच्या पाकळ्या किंवा रांगोळीचे स्टिकर इत्यादी गोष्टींचा वापर करू शकता. हे तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या किंवा दिव्यांच्या मधोमत ठेवू शकता.
पुजेच्या थाळीमध्ये रांगोळी, फुले आणि दिवे लावून ही थाळी तुम्ही सजवू शकता. थाळीला शाही लूक देण्यासाठी त्यात काचेचे छोटे तुकडे किंवा मणी लावू शकता.
भिंतीवर दिवे लावण्यासाठी लाकडी किंवा पुठ्ठ्याचे स्टँड बनवा. दिवे रंगीत रंगवा आणि त्यांना व्यवस्थितरित्या ठेवा.
पारंपारिक रांगोळीमध्ये एलईडी स्ट्रिप्स किंवा दिवे लावू शकता. यामुळे रात्रीच्या वेळीही रांगोळी चमकत राहील.
दिवाळीच्या थीमशी जुळणारे नारिंगी, पिवळे किंवा सोनेरी रंगाचे गादी कव्हर आणि पडदे तुम्ही घरामध्ये लावू शकता. यामुळे संपूर्ण खोलीचे वातावरण बदलू शकते.
तुमच्या घरामध्ये सुगंध वाढविण्यासाठी सुगंधित मेणबत्त्या आणि अगरबत्तीचा वापर करा. यामुळे एक शांत आणि दिव्य वातावरण निर्माण होईल. यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा देखील प्रवेश करेल आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर जाण्यास मदत होते.