Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Menstrual Cycle: मासिक पाळीच्या अचूक वेळापत्रकासाठी Apps चा वापर करताय? डोक्याला होऊ शकतो त्रास

Menstrual Cycle: तुम्ही मासिक पाळीच्या अचूक वेळापत्रकासाठी जर Apps चा वापर करत असाल तर कदाचित हे तुमची चिंता वाढवू शकते. म्हणजे नक्की काय हेच आपण जाणून घेऊया.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 27, 2026 | 08:01 PM
मासिक पाळी ट्रॅक करण्यासाठी वापरत असाल अ‍ॅप, तर नक्की वाचा (फोटो सौजन्य - iStock)

मासिक पाळी ट्रॅक करण्यासाठी वापरत असाल अ‍ॅप, तर नक्की वाचा (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • तुम्हीही मासिक पाळीसाठी एखादे App वापरत आहात का?
  • असे करत असल्यास तुमच्यासाठी हे चिंतेचं कारण ठरू शकतं 
  • नक्की कसं याबाबत तज्ज्ञांनी दिली माहिती  
Menstrual Cycle: मासिक पाळीच्या बदलत्या तारखा, मासिक पाळीची लक्षणं, ओव्ह्युलेशन आणि गर्भधारणेसाठी योग्य दिवस समजून घेण्यासाठी अनेक महिला मोबाईल अ‍ॅप्सचा वापर करतात. काहींसाठी ही अ‍ॅप्स शरीरातील बदल समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरत असली, तरी अ‍ॅपने दाखवलेल्या प्रत्येक तारखेवर आणि अंदाजावर अवलंबून राहिल्याने मानसिकरित्या चिंता वाढू शकते. मासिक पाळीचा प्रत्येक चक्र एकसारखा नसतो, त्यामुळे अ‍ॅपचा अंदाज हा मार्गदर्शक असू शकतो.

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये गरम पाणी पिणे योग्य आहे का? वेदनांपासून आराम मिळण्यासोबतच शरीराला होतील भरमसाट फायदे

काय म्हणतात तज्ज्ञ 

डॉ. बुशरा खान, फर्टिलिटी एक्सपर्ट , नोवा आयव्हीएफ फर्टिलिटी, खराडी, पुणे यांनी सांगितले की, आज अनेक महिला मासिक पाळी, अंडोत्सर्जन, ओव्ह्युलेशन डे, मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना, मनःस्थिती आणि इतर लक्षणांची नोंद ठेवण्यासाठी या अ‍ॅप्सचा वापर करतात. दीर्घकाळ नोंदी ठेवल्यामुळे मासिक पाळीच्या चक्रातील बदल आणि ठराविक लक्षणांचे स्वरूप समजण्यास मदत होऊ शकते. गर्भधारणेचा प्रयत्न करणाऱ्या महिलांना अ‍ॅपच्या माध्यमातून फलनक्षम कालावधीचा अंदाजही मिळू शकतो.

अ‍ॅप्समुळे शरीरातील बदल समजण्यास मदत

 मासिक पाळी नियमितपणे नोंदवल्यामुळे मासिक पाळीचे चक्र किती दिवसांचे आहे, ते नियमित आहे का, पाळी चुकते आहे का किंवा नेहमीपेक्षा जास्त अथवा कमी दिवसांची होत आहे का, याची माहिती मिळू शकते. वारंवार जाणवणाऱ्या वेदना किंवा इतर लक्षणांची नोंदही ठेवता येते. डॉक्टरांशी प्रजनन आरोग्याबाबत चर्चा करताना ही माहिती उपयुक्त ठरू शकते.

ओव्ह्युलेशन डे चा मिळतो अंदाज

अनेक अ‍ॅप्स मागील मासिक पाळीच्या नोंदी आणि मासिक पाळीच्या कालावधीवर आधारित अंडोत्सर्जनाचा काळ ठरवला जातो. गर्भधारणेची शक्यता अधिक असलेल्या दिवसांचा साधारण अंदाज मिळू शकतो. मात्र,  यामुळे तणाव, आजारपण, संप्रेरकांमधील बदल आणि अनियमित मासिक पाळी अशा असे अनेक परिणाम होऊ शकतात. त्यामुळे ओव्ह्युलेशन कालावधीदेखील दर महिन्याला बदलू शकतो.

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या का जातात? वारंवार गाठी जाणे बेतू शकते जीवावर, ब्लड क्लॉट्स कमी करण्यासाठी उपाय

ॲप्समध्ये वर्तविलेला अंदाज म्हणजे वैद्यकीय निदान नाही

अ‍ॅपच्या माध्यमातून अंडोत्सर्जन प्रत्यक्षात झाले आहे की नाही, हे निश्चितपणे सांगता येत नाही. विशेषतः अनियमित मासिक पाळी, पीसीओएस, थायरॉईडचे विकार किंवा इतर संप्रेरकांशी संबंधित समस्या असलेल्या महिलांमध्ये अ‍ॅपचे अंदाज मर्यादित ठरू शकतात. त्यामुळे अ‍ॅपवर दिसणाऱ्या तारखा या केवळ अंदाज म्हणून पाहाव्यात; त्यांना वैद्यकीय निदान किंवा गर्भधारणेची हमी समजू नये.

सतत ट्रॅकिंगमुळे वाढू शकते चिंता

मासिक पाळीची तारीख, लक्षणं ओव्ह्युलेशनचा अंदाज किंवा प्रजननासंबंधित माहिती तपासत राहिल्याने काही महिलांमध्ये चिंता वाढू शकते. गर्भधारणेचा प्रयत्न करताना अ‍ॅपने दर्शवलेला एखादा ओव्ह्युलेशन दिवस चुकला, तर अनावश्यक काळजी निर्माण होऊ शकते. प्रत्यक्षात गर्भधारणा केवळ एका विशिष्ट दिवसावर अवलंबून नसते.

माहितीचा उपयोग करा, दबाव निर्माण करू नका

मासिक पाळीचे ट्रॅकिंग करण्यामागचा उद्देश शरीरातील बदल समजून घेणे हा असावा त्याचे अनावश्यक ताण घेणे टाळा. प्रत्येक मासिक पाळी, लक्षण किंवा ओव्ह्युलेशनचा अंदाज अगदी अचूक असलाच पाहिजे, असा दबाव महिलांनी घेऊ नये. अ‍ॅप वापरल्यामुळे ताण वाढत असल्यास त्याचा वापर काही काळ थांबवणे किंवा ते वारंवार तपासण्याची सवय कमी करणे फायदेशीर ठरू शकते.

कधी घ्यावा डॉक्टरांचा सल्ला?

मासिक पाळी वारंवार अनियमित होणे, तीव्र वेदना होणे, खूप जास्त रक्तस्राव होणे, कारण न समजता पाळी चुकणे किंवा गर्भधारणेस अडचण येणे अशा परिस्थितीत केवळ अ‍ॅपवर अवलंबून न राहता स्त्रीरोगतज्ज्ञ किंवा प्रजनन तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

मासिक पाळीचे अ‍ॅप्स प्रजनन आरोग्याबाबत जागरूकता वाढवण्यासाठी उपयुक्त साधन ठरू शकतात. मात्र, त्यातून मिळणारे अंदाज अंतिम किंवा अचूक मानता येत नाहीत. वय, संप्रेरके, एकूण आरोग्य आणि इतर अनेक घटकांचा प्रजननक्षमतेवर परिणाम होत असतो, ज्याचे पूर्ण मूल्यमापन हे अ‍ॅप करू शकत नाही हे लक्षात असू द्या. त्यामुळे मासिक पाळीचे ट्रॅकिंग चिंतेचे कारण न बनवता शरीराचे चक्र समजून घेण्याचे साधन म्हणून वापरणे अधिक योग्य ठरेल.

Web Title: Using apps to track your menstrual cycle will increase worries

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 08:01 PM

Topics:  

  • Health Tips
  • Menstrual health

संबंधित बातम्या

पोटाच्या समस्यांनी हैराण? तुमच्या ‘या’ रोजच्या सवयीच बिघडवतायत ‘गट हेल्थ’; पाहा काय टाळावं
1

पोटाच्या समस्यांनी हैराण? तुमच्या ‘या’ रोजच्या सवयीच बिघडवतायत ‘गट हेल्थ’; पाहा काय टाळावं

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये गरम पाणी पिणे योग्य आहे का? वेदनांपासून आराम मिळण्यासोबतच शरीराला होतील भरमसाट फायदे
2

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये गरम पाणी पिणे योग्य आहे का? वेदनांपासून आराम मिळण्यासोबतच शरीराला होतील भरमसाट फायदे

Health Tips: गाड्यावरचा चहा किती वेळाने प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी ठरू शकतो धोकादायक?
3

Health Tips: गाड्यावरचा चहा किती वेळाने प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी ठरू शकतो धोकादायक?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.