Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हेलिकॉप्टरने फक्त इतक्या रुपयांत पोहचू शकता बाबा केदारनाथ यांच्या दरबारी, बुकिंगची संपूर्ण प्रोसेस जाणून घ्या

Char Dham Yatra Booking : चारधाम यात्रेला लवकरच सुरुवात होणार असून तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही हवाई मार्गानेही बाबा केदारनाथ यांचे दर्शन घेऊ शकता. यासाठीची बुकिंग प्रोसेस आणि तिकिटाची किंमत किती ते जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 14, 2026 | 08:46 AM
हेलिकॉप्टरने फक्त इतक्या रुपयांत पोहचू शकता बाबा केदारनाथ यांच्या दरबारी, बुकिंगची संपूर्ण प्रोसेस जाणून घ्या

हेलिकॉप्टरने फक्त इतक्या रुपयांत पोहचू शकता बाबा केदारनाथ यांच्या दरबारी, बुकिंगची संपूर्ण प्रोसेस जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:
  • यात्रेसाठी वेगवेगळ्या मंदिरांचे दरवाजे ठराविक तारखांना उघडले जाणार आहेत
  • प्रवाशांच्या सोयीसाठी हवाई सेवेद्वारे जलद आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध आहे
  • बुकिंग करताना काही महत्त्वाचे नियम पाळणे आणि फसवणुकीपासून सावध राहणे आवश्यक आहे
उत्तराखंडमधील चारधाम यात्रा ही एक जगप्रसिद्ध धार्मिक यात्रा आहे. फक्त देशभरातीलच नाही तर जगभरातील भाविक या यात्रेची उत्सुकतेने वाट पाहत असतात. ही एक पवित्र यात्रा आहे जी यंदा १९ एप्रिलपासून सुरु होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तुम्हीही जर यंदा बाबा केदारनाथ यांना भेट देण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला वेळघालू प्रवास नको हवा असेल तर आजचा हा लेख तुमच्या कामाचा ठरणार आहे. तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही बाबा केदारनाथ यांचे दर्शन हवाई मार्गानेही करु शकता. यात तुमचा बराच वेळ वाचेल तसेच प्रवास फार आरामदायी आणि सुखकर होईल. आम्ही तुम्हाला या लेखात आज हवाई मार्गासाठी हेलिकाॅप्टरची बुकिंग कशी करायची यासाठी संपूर्ण प्रोसेस समजावून सांगणार आहोत. चला कोणत्याही फसवणुकीशिवाय हेलिकाॅप्टरचे बुकिंग कशी करायची ते जाणून घेऊया.

भक्तांसाठी आनंदाची बातमी! लवकरच खुले होणार बद्रीनाथ धामचे कपाट… या दिवसापासून घेता येणार दर्शन

कोणत्या दिवशी कोणते दरवाजे उघडतील?

माहितीनुसार, १९ एप्रिल रोजी यमुनोत्री आणि गंगोत्री या मंदिरांचे दरवाजे उघडले जातील. यानंतर २२ एप्रिल रोजी केदारनाथ मंदिराचे दरवाजे आणि २३ एप्रिल रोजी बद्रिनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडले जातील. शिखांचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या हेमकुंड साहिबचे दरवाजे २३ मे रोजी उघडले जातील.

हेलिकॉप्टर सेवा केव्हा आणि कुठे बुक करावी?

  • केदारनाथला येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी, फोटो, गुप्तकाशी आणि सिरसी या तीन मुख्य ठिकाणांहून शटल हेलिकाॅप्टर सेवा पुरवण्यात येतात.
  • तिकिटांचे ऑनलाईन बुकिंग ११ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून सुरु करण्यात येणार आहे.
  • हे बुकिंग २२ एप्रिल ते ११ मे दरम्यान भेट देणाऱ्या प्रवाशांसाठी वैध मानले जाईल.
  • तुम्ही या हेलिकाॅप्टरची बुकिंग RCTC ची अधिकृत वेबसाईट heliyatra.irctc.co.in वर जाऊन करता येईल.
हेलिकाॅप्टरने जाण्यासाठी किती पैसे आकारले जातील?
  • सिरसी मार्ग : अंदाजे ₹६,३९०
  • फाटा मार्ग : अंदाजे ₹१०,१६४
  • गुप्तकाशी मार्ग : अंदाजे ₹१२,७६२
बुकिंग प्रक्रिया आणि नियम
  • हेलिकाॅप्टरमध्ये आपली जागा निश्चित करण्यासाठी तुम्हाला काही नियमांचे पालन करण्याची आवश्यकता आहे.
  • तिकिट बुक करण्यासाठी तुम्हाला प्रथम उत्तराखंड पर्यटन पोर्टलवर तुमची चारधाम यात्रा बुकिंग करावी लागेल.
  • बुकिंग पूर्ण झाल्यानंतर heliyatra.irctc.co.in या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला तुमच्या अकाऊंटमध्ये जाऊन लाॅग इन करायचे आहे.
  • तुम्ही आपल्या सोयीनुसार स्लाॅट बुक करु शकता.
  • एका यूजर आयडीवर एका वेळी जास्तीत जास्त ६ तिकिटे बुक करता येतात, अशात तुम्हाला जर याहून अधिक
  • तिकिटे हवे असल्यास तुम्ही दोन वेगवेगळ्या आयडीवरुन लाॅग इन करुन तुम्ही अधिकची तिकिटे बुक करु शकता.
  • तिकिटे बुक करुनही जर तुम्हाला प्रवास करता येत नसेल किंवा तिकिट कॅन्सल करायचे असेल तर चिंता करु
  • नका. बुकिंगच्या ५ ते ७ दिवसांच्या आत तुमचे पैसे तुमच्या खात्यात परत केले जातील.
Iran-US Peace Talks : पाकिस्तानच्या या लग्झरी हॉटेलमध्ये पार पडली इराण अमेरिकेची बैठक, जाणून घ्या इथे काय आहे खास…

सायबर फसवणूक करणाऱ्यांपासून कसे वाचावे?

दरवर्षी भाविकांची तिकिटांसाठी गर्दी असल्याने या परिस्थितीचा फायदा घेत स्कॅमर्स या संधीचा फायदा घेत भाविकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात. हे फसवणूक करणारे आयआरसीटीसीच्या (IRCTC) हुबेहूब दिसणाऱ्या बनावट वेबसाइट्स तयार करतात. इतकेच नाही तर व्हॉट्सॲप आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जलद तिकिटे किंवा स्वस्त दरात तिकिटे देण्याचे आमिष दाखवून लोकांच्या कष्टाच्या पैशांची लूट केली जाते.

उत्तराखंड पोलिस या फसवणूक करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करत आहे. सातत्याने अशा फसवणूक केल्या जाणाऱ्या लोकांवर कारवाई केली जात आहे. आतापर्यंत अनेक बनावट फोन नंबर आणि बनावट वेबसाइट्स ब्लॉक करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी विशेष मार्गदर्शक तत्त्वेही तयार केली आहेत. यापासून बचावासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे अधिकृत वेबसाइटवरूनच (heliyatra.irctc.co.in) तिकिटे बुक करावीत. अनोळख्या व्यक्तींच्या मेसेजला किंवा काॅलला कोणताही रिप्लाय देऊ नये.

Web Title: Uttarakhand char dham yatra 2026 helicopter booking process travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 08:46 AM

Topics:  

  • Religious Places
  • travel news
  • Uttarakhand

संबंधित बातम्या

Iran-US Peace Talks : पाकिस्तानच्या या लग्झरी हॉटेलमध्ये पार पडली इराण अमेरिकेची बैठक, जाणून घ्या इथे काय आहे खास…
1

Iran-US Peace Talks : पाकिस्तानच्या या लग्झरी हॉटेलमध्ये पार पडली इराण अमेरिकेची बैठक, जाणून घ्या इथे काय आहे खास…

भक्तांसाठी आनंदाची बातमी! लवकरच खुले होणार बद्रीनाथ धामचे कपाट… या दिवसापासून घेता येणार दर्शन
2

भक्तांसाठी आनंदाची बातमी! लवकरच खुले होणार बद्रीनाथ धामचे कपाट… या दिवसापासून घेता येणार दर्शन

भूलभुलैयापासून बॅटमॅनपर्यंत… हॉलिवूड-बॉलिवूड चित्रपटांचं फेव्हरेट स्पॉट आहे हे ठिकाण
3

भूलभुलैयापासून बॅटमॅनपर्यंत… हॉलिवूड-बॉलिवूड चित्रपटांचं फेव्हरेट स्पॉट आहे हे ठिकाण

बजेटमध्ये ट्रिप होईल पूर्ण! फक्त 10,000 रुपयांत फिरता येतात भारतातील ही ठिकाणे
4

बजेटमध्ये ट्रिप होईल पूर्ण! फक्त 10,000 रुपयांत फिरता येतात भारतातील ही ठिकाणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.