व्हॅलेंटाईन वीक (Valentine Week 2022) सुरु झाला आहे. या वीकच्या दुसऱ्या दिवशी ८ फेब्रुवारीला प्रपोज डे (Propose Day 2022) आहे. असे म्हटले जाते की आपल्या मनातली प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी हा एक चांगला दिवस आहे. जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल आणि प्रेमाची (Love) कबुली तुम्हाला द्यायची असेल तर आजचा दिवस चांगला आहे.
आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रत्येकजण काहीतरी खास करण्याचा प्रयत्न करत असतं. गुडघ्यावर बसून, ग्रीटींग कार्ड देऊन तुम्ही आपलं प्रेम व्यक्त करु शकता. काहीजण शेरोशायरी करुन प्रेम व्यक्त करतात.प्रपोज करण्याच्या आणखी कोणत्या वेगळ्या पद्धती आहेत ते आपण जाणून घेऊयात.
लॉन्ग ड्राइव्ह (Long Drive)
तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता त्याला लॉन्ग ड्राइव्हवर नेऊन प्रपोज करु शकता.
गाणे गा (Sing A Song)
जर तुमचा आवाज चांगला असेल आणि तुम्हाला आणि तुमच्या पार्टनरला गाणं आवडत असेल तर तुम्ही तुमच्या पार्टनरला गाणं गाऊन प्रपोज करु शकता.
आवडीचा पदार्थ (Cooking)
जर तुमचा पार्टनर फुडी असेल तर एखादा छान पदार्थ बनवून तुम्ही त्याला खूश करु शकता आणि त्यानंतर प्रपोज करु शकता.
गिफ्ट्स (Gifts)
तुम्ही गिफ्ट्स म्हणजेच भेटवस्तू देऊनही तुमच्या पार्टनरला प्रपोज करु शकता.
डिनर डेट (Dinner Date)
जर तुम्ही खरंच एखाद्यावर मनापासून प्रेम करत असाल आणि त्याच्यासोबत संपूर्ण आयुष्य घालवण्याची तुमची इच्छा असेल तर त्याला तुम्ही डिनर डेटवर घेऊन जाऊ शकता.