थेंबभर तेलाचा वापर न करता झटपट बनवा चविष्ट टोमॅटो सूप, १० मिनिटांत तयार होईल सकाळचा नाश्ता
हिवाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये शरीराला संतुलित आहार आणि पौष्टिक पदार्थांची आवश्यकता असते. आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन केल्यास तुम्ही कायमच निरोगी राहाल. थंडीच्या दिवसांमध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते आणि कायमच शरीरात थकवा, अशक्तपणा जाणवतो. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात सूप किंवा सहज पचन होणाऱ्या हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला थेंबभर तेलाचा वापर न करता टोमॅटो सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं सूप प्यायला खूप जास्त आवडते. कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारे पदार्थ बनवायला सगळ्यांचं आवडते. टोमॅटो सूप बनवताना तुम्ही त्यात दुधी भोपळ्याचा सुद्धा वापर करू शकता. यामुळे शरीराला पोषण मिळते. वाढलेले वजन कमी करताना सकाळच्या नाश्त्यात तेलाचा वापर न करता बनवलेले सूप पिणे उत्तम पर्याय आहे. दुधी भोपळ्यात पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे शरीर हायड्रेट राहते. तसेच टोमॅटोमध्ये असलेले अँटी ऑक्सिडंट्स आणि जीवनसत्वे शरीरासाठी वरदान ठरतात. चला तर जाणून घेऊया टोमॅटोचे सूप बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
विकतचा कशाला? घरीच बनवा मऊ, जाळीदार बेसनाचा ‘ढोकळा’, रेसिपी आहे फार सोपी






