रात्रीच्या जेवणाला अशाप्रकारे बनवा मसालेदार अन् खमंग ‘भरलेलं कारलं’, चव अशी की कडू पदार्थाचेही फॅन व्हाल
Stuffed Bittergourd Recipe : कारल्यात अनेक पोषक घटक असल्याने याची चव आरोग्यासाठी फायद्याची ठरते. तुम्हाला याची भाजी खायला आवडत नसेल तर यंदा गावराण स्टाइलमध्ये भरलेली कारली बनवून खा.
कारल्यात अनेक असे पोषक घटक आढळतात जे आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरू शकतात.
याच्या कडू चवीमुळे अनेकांना कारलं खायला आवडत नाही.
पण हटके पद्धतीने बनवून तुम्ही याची चव चाखू शकता, भरलेलं कारलं चवीला फार अप्रतिम लागतं.
भारतीय स्वयंपाकात कारल्याला खास स्थान आहे. चवीला कडू असलं तरी योग्य पद्धतीने बनवलं तर कारलं औषधी गुणांनी भरलेलं आणि अप्रतिम चविष्ट लागतं. विशेषतः भरलेली कारली ही पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी अनेक घरांमध्ये सणावाराला, उपवासानंतर किंवा खास जेवणात आवर्जून केली जाते. कारल्यातील कडूपणा कमी करून त्यात मसाल्याचं समतोल मिश्रण भरल्यामुळे ही भाजी केवळ पौष्टिकच नाही तर अत्यंत रुचकरही होते. पोटासाठी फायदेशीर, रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणारी आणि पचन सुधारणारी ही भाजी आरोग्याच्या दृष्टीनेही खूप उपयुक्त आहे. चला तर मग गावराण पद्धतीमध्ये भरलेलं कारलं कसं बनवायचं याची सोपी रेसिपीते जाणून घेऊया.
सर्वप्रथम कारली धुवून पुसून घ्या. मध्ये उभी चीर देऊन बिया काढा. थोडं मीठ लावून 20–30 मिनिटं बाजूला ठेवा आणि नंतर पाण्याने धुवून पिळून घ्या, यामुळे कडूपणा कमी होतो.
एका पॅनमध्ये थोडं तेल घालून कांदा परतून घ्या. त्यात शेंगदाण्याची पूड, नारळाचा कीस, धणे-जिरे पूड, हळद,
लाल तिखट, आमचूर, गूळ आणि मीठ घालून नीट परतून घ्या.
तयार मसाला थंड झाल्यावर प्रत्येक कारल्यात नीट भरून घ्या.
मसाला बाहेर येऊ नये म्हणून दोऱ्याने हलकं बांधू शकता.
कढईत तेल गरम करून मोहरी घाला. मोहरी फुटल्यावर हिंग घाला.