Cashew Market: कोकण नव्हे तर 'हे' भारतातील हे ठिकाण आहे काजूंचं गाव; सगळ्यात स्वस्त सुका मेवा इथे मिळतो
सुका मेवा हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य आहे. सणावाराला गोड गोध करण्यासाठी सुका मेवा हा लागतोच. दिवाळीच्य़ा शुभेच्छा देण्यासाठी अनेकजण आपल्या प्रियजनांना भेटवस्तूंबरोबर सुका मेवा देतात. याचं कारण म्हणजे दिवाळीच्या दिवसात प्रचंड थंडी असते. त्यामुळे शरीरात उष्णता निर्माण व्हावी यासाठी फराळात जसा सुका मेवा वापरला जातो तसचं तो शुभेच्छा देण्यासाठी दिला जातो. असा सुका मेवा शरीरासाठी फायदेशीर असला तरी याचं उत्पादन भारतात खूप कमी ठिकाणी होेत असतं म्हणून सुक्या मेव्याला सोन्यासारखा भाव असतो. मात्र असं जरी असलं तरी भारतात असं एक ठिकाण आहे जिथे सर्वात स्वस्त सुका मेवा मिळतो. कोणतं आहे हे ठिकाण चला जाणून घेऊयात.
हेही वाचा- दिवाळीत खरेदी करताना जरा जपून, बनावट बदाम कसे ओळखाल जाणून घ्या
सुक्या मेव्याला बाजारात खुप मोठी मागणी आहे, मात्र त्याप्रमाणे पुरवठा होत नसल्याने सुका मेवा सर्वांत जास्त महाग आहे. साधारणपणे 1 किलो काजू रुपये 1 हजाराच्या आसपास मिळतात. त्यामुळे प्रत्येकाला किलोने काजू विकत घेणं परवड नाही. कोकणात जरी काजूचं पिक घेतलं जात असलं तरी देशात सर्वांत जास्त काजूंचा पुरवठा हा झारखंड राज्यातून होतो .झारखंड राज्यातील जामतारा जिल्हा हा काजूंचं गाव म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र,कर्नाटक आणि केरळच्या तुलनेत एकट्या जामतारा जिल्ह्यातून देशात आणि आंतरराष्ट्रीय स्ततावरदेखील सर्वांत जास्त काजूंची निर्यात होते. जामतारा जिल्हात देशातील सर्वात मोठा ओल्या काजूंचा व्यापार केला जातो. या ठिकाणी ओल्या काजूंच्या खरेदीसाठी देशाच्या कानारोपऱ्यातून व्यापारी येत असतात.
हेही वाचा- Viral Recipe: रात्रीच्या जेवणाला बनवा झणझणीत कांद्याचा झुणका
बाजारात कांदे जितक्या किंमतीत मिळतात अगदी त्याच किंमतीत किलोभर काजू जामतारा जिल्ह्यात मिळतात. महाराष्ट्रात हजार ते दीडहजार रुपयांना किलोभर मिळणारेे काजू जामतारामध्ये 45 ते 50 रुपये प्रतिकीलो मिळतात. तर प्रक्रिया केलेले काजूंची किंमत साधारणत: 150-200 रुपये प्रति किलो इतकी आहे. या ठिकाणी काजू,बदाम आणि इतर सुकामेवा देखील सर्वात स्वस्त मिळतो. त्यामुळे जामतारा जिल्ह्याला काजूंचं गाव म्हटलं जातं. त्याशिवाय झारखंड राज्याव्यतिरिक्त केरळच्या कोल्लम येथे देशातील 80 टक्के काजूची आयात निर्यात केली जाते. त्यामुळे केरळला देखील काजूचं शहर म्हटलं जातं.






