Panvel Municipal Corporation: पनवेलमध्ये राजकारण तापलं! दोन माजी नगरसेवक निलंबित
Panvel Municipal Corporation: इतरत्र निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलेले असताना पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १४ मध्ये चार उमेदवारांचा कमी फरकाने झालेला पराभव भाजपच्या अत्यंत जिव्हारी लागला आहे. काहींनी पक्षविरोधी भूमिका घेऊन विरोधी उमेदवारांना मदत केल्याच्या तक्रारी पुढे आल्या. त्यानुसार माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, आणि मुकित काझी यांच्यावर पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवून वर्षे कालवाचाची कारवाई करण्यात आली आहे. या दोघांनाही पक्षाने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. पनवेल महानगरपालिका निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व यश संपादन केले. ७८ पैकी ५५ जागा थेट कमळ चिन्हावर जिंकत आणि मित्रपक्षांच्या चार जागांसह एकूण ५९ जागांवर नियंत्रण मिळवत भाजपने स्पष्ट बहुमताचा विक्रम नोंदवला. परंतु, प्रभाग १४ मध्ये दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता.
प्रभाग क्रमांक १४ हा भाजपसाठी पूर्वी मजबूत मानला जाणारा भाग होता. २०१७ च्या निवडणुकीत या प्रभागातून भाजपला तीन जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे यावेळीही विजय निश्चित मानला जात होता. मात्र निकाल लागल्यानंतर चारही उमेदवार कमी फरकाने पराभूत झाल्याने पक्ष नेतृत्वाने या निकालाकडे केवळ पराभव म्हणून न पाहता, त्यामागील अंतर्गत कारणांचा शोध घेण्यास सुरुवात केली. स्थानिक पातळीवर प्रचार झाला असला, तरी अपेक्षित एकजूट दिसली नाही, काही भागात अधिकृत उमेदवारांना संघटनात्मक पाठबळ कमी पडले, तर काही ठिकाणी विरोधकांना अप्रत्यक्ष मदत झाल्याचे प्राथमिक अहवालातून समोर आले.
या निवडणुकीत भाजपने प्रभाग १४ मध्ये नव्या चेहऱ्यांवर मोठा विश्वास दाखवला होता. सतीश दत्तात्रेय पाटील, इकबाल हुसेन काझी, रेणुका मयुरेश नेतकर या तिन्ही नव्या उमेदवारांना संधी देण्यात आली. याशिवाय शेकापमधून भाजपमध्ये आलेल्या सारिका अतुल भगत यांनाही पक्षाने उमेदवारी दिली. परंतु, त्या तिघांनाही पराभव स्वीकारावा लागला होता.
निवडणुकीनंतर सर्वाधिक गंभीर आरोप मनोहर म्हात्रे आणि मुकित काझी या दोन माजी नगरसेवकांवर झाले. स्थानिक उमेदवारांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करताना आरोप केला की, या दोघांनी अधिकृत उमेदवारांसाठी अपेक्षित काम केले नाही. काही भागात विरोधी उमेदवारांच्या संपर्कात राहून अप्रत्यक्ष मदत केल्याचेही सांगण्यात आले. या तक्रारीनंतर जिल्हा भाजपने अंतर्गत पडताळणी सुरू केली. मतदान केंद्रनिहाय आकडे, पदाधिकाऱ्यांचे अहवाल आणि उमेदवारांची निवेदने तपासण्यात आली. त्यानंतर दोघांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी दोघांनाही सहा वर्षांसाठी निलंबित केले.
प्रभाग १४ मधून निवडणूक लढवलेल्य भाजप उमेदवारांनी या निर्णयाचे स्वाग केले आहे. पक्षासाठी प्रामाणिकपणे का करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाल अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मनोहर म्हात्रे हे पूर्वी शेकापमध्ये सक्रिय होते नंतर त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्य नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षा त्यांच्यावर विश्वास दाखवत मागीब कार्यकाळात स्थायी समिती सभापती सारख महत्त्वाचे पद दिले होते. त्यामुळे त्यांच्याव झालेली कारवाई राजकीयदृष्ट्या अधिव महत्त्वाची मानली जात आहे.






