
संत्री हे व्हिटॅमिन C चे सर्वाेत्तम स्रोत मानले जाते. त्यातील अँटीऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. लिंबू देखील व्हिटॅमिन C ने भरपूर असते. लिंबूपाणी किंवा आहारात लिंबाचा नियमित वापर केल्यास शरीराला त्याचा चांगला लाभ मिळू शकतो.
आवळा हा व्हिटॅमिन C चा उत्कृष्ट नैसर्गिक स्रोत आहे. तो रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याबरोबरच केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठीही उपयुक्त ठरतो. पेरूमध्येही भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन C आणि फायबर असते, ज्यामुळे पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते. कीवी हे पोषक फळ असून त्यातील व्हिटॅमिन C आणि इतर पोषकतत्त्वे शरीराला ऊर्जा देण्यास आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यास सहाय्य करतात.
ढोबळी मिरची ही व्हिटॅमिन C चा उत्तम स्रोत असून ती सॅलड, भाजी किंवा इतर पदार्थांमध्ये सहज वापरता येते. स्ट्रॉबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन C मुबलक असल्याने त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. पपई पचनक्रिया सुधारण्यासोबतच शरीराला आवश्यक असलेले व्हिटॅमिन C देखील पुरवते.
याशिवाय ब्रोकोली, टोमॅटो आणि इतर ताज्या फळभाज्यांचाही नियमित आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेसे पाणी पिणे यांसोबत व्हिटॅमिन C युक्त पदार्थांचे सेवन केल्यास शरीर अधिक निरोगी राहण्यास, रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास आणि एकूणच आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.